Azad Engineering IPO Rs 740-crore public issue opens on December 20  Sakal
Share Market

Azad Engineering IPO: आझाद इंजिनीअरिंग आणणार 740 कोटींचा आयपीओ, सेबीकडून मिळाला ग्रीन सिग्नल

Azad Engineering IPO: आयपीओसाठी कंपनीला सेबीकडून मंजुरी मिळाली आहे.

राहुल शेळके

Azad Engineering IPO: तेलंगणातील कंपनी आझाद इंजिनीअरिंग लिमिटेडला (Azad Engineering Ltd) आयपीओसाठी बाजार नियामक सेबीकडून मंजुरी मिळाली आहे. कंपनीला तिच्या या आयपीओतून 740 कोटी उभारायचे आहेत.

आझाद इंजिनिअरिंगने या वर्षी सप्टेंबरमध्ये आयपीओ लॉन्च करण्यासाठी सेबीकडे कागदपत्रे दाखल केली होती. कंपनीला 5 डिसेंबरला सेबीकडून ऑब्झर्वेशन लेटर मिळाले. याचा अर्थ आता आयपीओ आणण्याची प्रक्रिया पुढे नेली जाऊ शकते.

आयपीओ मसुद्याच्या कागदपत्रांनुसार, कंपनीच्या पब्लिक इश्यूमध्ये 240 कोटीपर्यंतचे नवीन शेअर्स जारी केले जातील. तसेच, 500 कोटीपर्यंतचे शेअर्स प्रमोटर्स आणि विद्यमान गुंतवणूकदारांच्या वतीने ओएफएसद्वारे विकले जातील.

ओएफएसमध्ये प्रमोटर राकेश चोपदार 170 कोटी रुपयांपर्यंतचे शेअर्स विकतील, तर पिरामल स्ट्रक्चर्ड क्रेडिट अपॉर्च्युनिटीज फंड 280 कोटीपर्यंत आणि डीएमआय फायनान्स 50 कोटीपर्यंतचे शेअर्स विकतील.

आझाद इंजिनियरिंगमध्ये प्रमोटर्सची भागीदारी 86.51 टक्के आहे. उर्वरित 13.49 टक्के हिस्सा पब्लिककडे आहे. पिरामल स्ट्रक्चर्ड क्रेडिट अपॉर्च्युनिटीज फंडचा कंपनीत 11.56 टक्के हिस्सा आहे. ऍक्सिस कॅपिटल, आयसीआयसीआय सिक्युरिटीज, एसबीआय कॅपिटल मार्केट्स आणि आनंद राठी सल्लागार हे मर्चंट बँकर आहेत.

आझाद इंजिनिअरिंग एअरोस्पेस आणि डिफेन्स, एनर्जी आणि ऑईल अँड गॅस उद्योगांमध्ये ग्लोबल ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर्सना (OEMs) उत्पादनांचा पुरवठा करते. कंपनीच्या ग्राहकांमध्ये जनरल इलेक्ट्रिक, हनीवेल इंटरनॅशनल इंक., मित्सुबिशी हेवी इंडस्ट्रीज, सीमेन्स एनर्जी, ईटन एअरोस्पेस आणि मॅन एनर्जी सोल्युशन्स एसई यांचा समावेश आहे.

नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

Vijay Pawar: बीड लैंगिक छळ प्रकरणातल्या विजय पवारचे कारनामे! RTE कायद्याला जुमानत नव्हता, सरकारी कार्यालयात घातला होता गोंधळ

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

Latest Maharashtra News Updates : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश

SCROLL FOR NEXT