bajaj auto buyback plan announcement investment share market finance Sakal
Share Market

Bajaj Auto Ltd : ‘हमारा बायबॅक’

बजाज ऑटो या पुण्याच्या प्रसिद्ध कंपनीने नुकतीच त्यांच्या शेअरची पुन:र्खरेदी (बायबॅक) जाहीर केली आहे.

सुहास राजदेरकर

Bajaj Auto Ltd : बजाज ऑटो या पुण्याच्या प्रसिद्ध कंपनीने नुकतीच त्यांच्या शेअरची पुन:र्खरेदी (बायबॅक) जाहीर केली आहे. मूळ किंमत १० रुपये असलेल्या या शेअरची ‘बायबॅक’ची किंमत आहे एका शेअरमागे १०,००० रुपये. जुलै २०२२ मध्ये कंपनीने ‘बायबॅक’ योजना आणली होती, त्यावेळेला शेअरची किंमत होती साधारण ४००० रुपये आणि ‘बायबॅक’ किंमत होती ४६०० रुपये.

‘बायबॅक’ म्हणजे, कंपनी स्वतःच आपले शेअर खरेदी करून ते रद्द करते आणि भागभांडवल कमी करते. हा एका कंपनीच्या चांगल्या कामगिरीचा संकेत असून, कंपनीकडे भरपूर रोख गंगाजळी (रिझर्व्ह) आहे, हे दिसते.

त्याचप्रमाणे भागधारकांचा कंपनीमधील हिस्सा वाढतो आणि कालांतराने ‘अर्निंग पर शेअर’ म्हणजेच एका शेअरमागची मिळकतसुद्धा वाढते. बजाज ऑटोच्या शेअरचा शुक्रवारचा बंद भाव होता ७३०० रुपये.

म्हणजेच बाजारभावापेक्षा ‘बायबॅक’वर साधारणपणे ३७ टक्के प्रीमियम मिळत आहे. परंतु, याचा अर्थ असा नाही, की आज बजाज ऑटोचे कितीही शेअर ७३०० भावाला खरेदी करून लगेच १०,००० रुपयांना ‘बायबॅक’साठी देऊन, एका शेअरमागे २७०० रुपयांचा नफा होईल. नक्की काय पद्धत असते आणि किती फायदा होऊ शकतो, ते थोडक्यात पाहू या.

टेंडर ऑफर पद्धतीने ‘बायबॅक’

‘बायबॅक’च्या दोन पद्धती असतात. एक टेंडर ऑफर आणि दुसरी खुला बाजार खरेदी. बजाज ऑटोचे हे ‘बायबॅक’ टेंडर ऑफर पद्धतीने आहे. यामध्ये भागधारकांना ‘बायबॅक’साठी शेअर पाठविण्याचा पर्याय असतो आणि रिटेल गुंतवणूकदारांना थोडे झुकते माप मिळू शकते.

बजाज ऑटो एका शेअरला १०,००० रुपये या भावाने स्वतःचे ४० लाख शेअर खरेदी करणार आहे. म्हणजेच एकूण ४००० कोटी रुपये. परंतु, जर ४० लाख शेअरपेक्षा जास्त शेअर ‘बायबॅक’साठी आले, तर ते त्या प्रमाणात (रेशो) स्वीकारले जातात.

यामध्ये रिटेल गुंतवणूकदारांसाठी १५ टक्के राखीव कोटा आहे. अर्थात, ६०० कोटी रुपयांचे ६ लाख शेअर फक्त रिटेल गुंतवणूकदारांकडूनच खरेदी करण्यात येतील. रिटेल गुंतवणूकदार म्हणजे ज्यांच्याकडे बजाज ऑटोचे दोन लाख रुपयांपर्यंतचेच शेअर आहेत.

‘बायबॅक’ किंमत १०,००० रुपये ठरविल्यामुळे, रिटेल विभागामध्ये येण्यासाठी एका डी-मॅट खात्यामध्ये बजाज ऑटोचे कमाल २० शेअर पाहिजेत. त्यावरील शेअरसाठी राखीव कोटा नाही. समजा, रिटेल गुंतवणूकदारांकडून २४ लाख शेअर आले,

तर स्वीकार रेशो २५ टक्के अर्थात १:४ असा होईल. अर्थात तुमच्याकडच्या २० शेअरपैकी फक्त ५ शेअर ‘बायबॅक’साठी स्वीकारले जातील आणि १५ शेअर तुमच्याकडे राहतील; ज्याची किंमत आता एका शेअरमागे ६४०० रुपये होईल. त्यामुळे बाजारात जर ६४०० रुपयांच्या वर भाव राहिला तर तुमचा फायदा होईल. जितके जास्त शेअर ‘बायबॅक’साठी येतील, तेवढे कमी शेअर स्वीकारले जातील.

कंपनीविषयी थोडक्यात...

बजाज ऑटो कंपनी ही दुचाकी आणि तीन चाकी वाहननिर्मिती; तसेच निर्यातीमधील देशातील सर्वांत मोठी कंपनी आहे. १९७२ मध्ये पुण्याच्या ज्या कारखान्यातून ‘चेतक’ डौलाने बाहेर पडली, त्यानंतर ४८ वर्षांनी त्याच कारखान्यातून त्याच डौलाने आज ‘चेतक ईव्ही’ बाहेर पडत आहे.

कंपनीची कामगिरी अत्यंत चांगली असून, त्यांचे सर्व तांत्रिक रेशो चांगले आहेत. (सोबतचा तक्ता पाहा). कंपनी लाभांश उत्तम देत आहे. मागील एका वर्षात हा शेअर १०० टक्के वाढला असून, त्याचे मूल्यांकन आता थोडे अधिक झाले आहे; तसेच प्रवर्तकसुद्धा या ‘बायबॅक’मध्ये भाग घेणार आहेत. हे लक्षात घेतले पाहिजे.

उत्तम तांत्रिक रेशो

२३.४८ टक्के संस्थात्मक हिस्सा (म्युच्युअल फंड, परकी गुंतवणूक कंपन्या आदी)

  • शून्य डेट-इक्विटी रेशो

  • २०.३९ टक्के रिटर्न ऑन इक्विटी

  • ६५.३७ टक्के डिव्हिडंड पे-आऊट रेशो

  • २२.७२ टक्के टॅक्स रेशो

  • ५४.९८ टक्के प्रवर्तक हिस्सा

तात्पर्य काय?

ज्यांची दीर्घकाळासाठी गुंतवणुकीची तयारी असेल, त्यांनी रेकॉर्ड तारखेपूर्वी (अजून जाहीर झालेली नाही) तज्ज्ञांच्या सल्ल्याने हा शेअर खरेदी करून ‘बायबॅक’साठी द्यायला हरकत नाही.

(डिस्क्लेमरः संबंधित लेखकांनी स्वतःच्या अभ्यासातून वरील मत व अंदाज व्यक्त केले आहेत. शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते. त्यामुळे वाचकांनी गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञ सल्लागाराची मदत घेणे हिताचे असते.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Chairman : माळेगाव कारखाना चेअरमनपदी अखेर अजितदादाचं! , विरोधकांच्या आक्षेपावर निवडणूक अधिकारी म्हणाले, आता...

ENGU19 vs INDU19 : १३ चौकार, १० षटकार! वैभव सूर्यवंशीचे विक्रमी शतक; फक्त २३ चेंडूंत चोपल्या ११२ धावा, निघाली इंग्लंडची हवा

Mumbai News: मुंबईत पावसामुळे रस्त्यांची दैना, खड्ड्यांची आकडेवारी समोर, पण पालिकेचा वेगळाच दावा

Cyber Fraud : जळगावात सायबर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार: 'सीबीआय'च्या नावाने निवृत्त डॉक्टरला ३१ लाखांना गंडवले

Top 5 Government Schemes: सरकारच्या तिजोरीतून तुमच्यासाठी खास! ‘पीएम किसान’सारख्या 'या' 5 योजना ठरतील तुमचं आर्थिक कवच

SCROLL FOR NEXT