Bajaj Housing Finance: Sakal
Share Market

Bajaj Housing Finance: बजाज हाउसिंग फायनान्सच्या शेअर्समध्ये मोठी घसरण होणार; ब्रोकरेजने वर्तवला अंदाज

Bajaj Housing Finance: गेल्या महिन्यातच NBFC बजाज हाऊसिंग फायनान्स कंपनी शेअर बाजारात लिस्ट झाली. लिस्टिंगच्या वेळी गुंतवणूकदारांनी मोठा नफा कमावला होता, त्यानंतरही अनेक दिवस स्टॉकमध्ये वाढ होत राहिली.

राहुल शेळके

Bajaj Housing Finance: गेल्या महिन्यातच NBFC बजाज हाऊसिंग फायनान्स कंपनी शेअर बाजारात लिस्ट झाली. लिस्टिंगच्या वेळी गुंतवणूकदारांनी मोठा नफा कमावला होता, त्यानंतरही अनेक दिवस स्टॉकमध्ये वाढ होत राहिली.

पण आता स्टॉकच्या तेजीवर ब्रेक लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ब्रोकरेज फर्म HSBC ने बजाज हाऊसिंग फायनान्सच्या शेअर्सबाबत अहवाल प्रसिद्ध केला आहे. ज्यामध्ये भविष्यात स्टॉक 27 टक्क्यांनी घसरण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

बजाज हाउसिंग फायनान्सच्या शेअर्समध्ये 27% घसरण होणार?

ब्रोकरेज फर्म HSBC ने बजाज हाऊसिंग फायनान्सने शेअरची लक्ष्य किंमत प्रति शेअर 110 रुपये केली आहे. बीएसईवरील बजाज हाऊसिंग फायनान्सचा शेअर 3 ऑक्टोबर रोजी बंद झालेल्या किमतीपेक्षा ही घसरण 27 टक्के आहे.

Bajaj Housing Finance

4 ऑक्टोबर रोजी, बजाज हाऊसिंग फायनान्सचे शेअर्स BSE वर किंचित वाढीसह 150.65 वर बंद झाले. दरम्यान, जुलै-सप्टेंबर तिमाहीत, बजाज हाउसिंग फायनान्सच्या कंपनीच्या व्यवस्थापनाखालील मालमत्तेने (AUM) गेल्या वर्षीच्या तुलनेत 26% वाढीसह 1 लाख कोटींचा टप्पा ओलांडला आहे.

शेअर बाजार विश्लेषक काय म्हणाले?

शेअर बाजार विश्लेषक शरद अवस्थी म्हणाले की, बाजार मुख्य कंपनीपेक्षा सहयोगी कंपनीला अधिक प्राधान्य देत होता. हा बजाज समूह खूप मजबूत आणि विश्वासार्ह आहे. यासोबतच व्यवसायात कंपनीची पोहोच आणि स्थानही चांगले आहे.

परंतु कोणत्याही शेअरमध्ये पैसे गुंतवण्यापूर्वी त्याच्या मूल्यांकनावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. तसेच मला वाटत नाही की, कोणीही त्याच्या सध्याच्या मूल्यांकनानुसार मोठी रक्कम गुंतवेल. त्यामुळे, मला वाटते की एक ते दीड वर्षांत स्टॉकची किंमत सामान्य होईल.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : मराठी माणसाच्या आनंदाला 'रुदाली' म्हणणं ही हिणकस अन् विकृत प्रवृत्ती; उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना सुनावलं...

Latest Maharashtra News Updates : पुण्यात शिवसेना महानगर प्रमुखाचे पोस्टर फाडले

Guru Purnima: या गुहेत ऋषी वेदव्यासांचं वास्तव्य? पुराणकथांना मिळतोय पुरावा!

Video : अजगर आहे की खेळणं? 15 फुटाच्या अजगरासोबत गावकऱ्यांनी बनवल्या रील्स, थरारक व्हिडिओ व्हायरल..

Maharashtra Rain: पालघरला पावसाने झोडपले! नदीला पूर, धरणाचे 5 दरवाजे उघडले, हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा

SCROLL FOR NEXT