Nifty hits record high Sakal
Share Market

Nifty Record: आरबीआयच्या निर्णयानंतर बाजारात तुफान तेजी, NSE निफ्टीने प्रथमच पार केला 21,000चा टप्पा

Nifty Record High: आज NSE निफ्टी निर्देशांकाने नवा विक्रम केला आहे.

राहुल शेळके

Nifty Record High: आज 8 डिसेंबर रोजी NSE निफ्टी निर्देशांकाने नवा विक्रम केला आहे. निर्देशांकाने प्रथमच 21000 चा टप्पा गाठला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने रेपो दरात कोणताही बदल न करण्याची घोषणा करताच निफ्टीने विक्रमी उच्चांक गाठला.

केंद्रीय बँक आरबीआयच्या चलनविषयक धोरण समितीने सलग पाचव्यांदा रेपो दरात कोणताही बदल केला नाही. डिसेंबरच्या चलनविषयक धोरण बैठकीत रेपो दर 6.50 टक्के कायम ठेवला आहे.

आरबीआयची घोषणा होताच निफ्टी 21,005.05 वर पोहोचला. डिसेंबर MPC बैठकीत RBI ने आर्थिक वर्ष 2023-24 साठी सकल देशांतर्गत उत्पादन (GDP) वाढीचा अंदाज 6.5 टक्क्यांवरून 7.0 टक्क्यांपर्यंत वाढवला. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये सकारात्मक वातावरण आहे. जागतिक बाजारातून मिळालेल्या सकारात्मक संकेतांमुळेही देशांतर्गत शेअर बाजारात तेजी आहे.

सेन्सेक्सनेही केला नवा विक्रम

सेन्सेक्सने 69888.33 हा नवा उच्चांक गाठला. सकाळी 11 च्या सुमारास निफ्टी 20,952.45 वर आणि सेन्सेक्स 69,721.52 वर होता. एक दिवस आधी 7 डिसेंबर रोजी, सात ट्रेडिंग सत्रांपासून शेअर बाजारात सुरू असलेल्या तेजीच्या ट्रेंडला ब्रेक लागला होता आणि काल BSE सेन्सेक्स 132.04 अंकांनी घसरला आणि 69,521.69 वर बंद झाला. त्याचप्रमाणे निफ्टीही 36.55 अंकांच्या घसरणीसह 20,901.15 अंकांवर बंद झाला होता.

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले की, कोरोना संकटानंतर भारतीय बाजारपेठेत तरलता राखण्यासाठी रिझर्व्ह बँकेने बरेच प्रयत्न केले आहेत. तसेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले की, महागाई चार टक्क्यांच्या आत ठेवणे आतापर्यंत शक्य झालेले नाही आणि आम्ही त्यासाठी प्रयत्न करत आहोत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

SCROLL FOR NEXT