Share Market Update esakal
Share Market

Top Shares Today: बाजार सुरु होण्याआधी जाणून घ्या आज कोणते 10 शेअर्स असतील अ‍ॅक्शनमध्ये?

आज कशी असेल शेअर बाजाराची स्थिती?

सकाळ डिजिटल टीम

सोमवारी सलग दुसऱ्या दिवशी बाजार तेजीसह बंद झाला. बाजारातील खरेदीमुळे निफ्टी 19500 च्या वर बंद झाला. व्यवहाराच्या शेवटी, सेन्सेक्स 240.98 अंकांच्या अर्थात 0.37 टक्क्यांच्या वाढीसह 65628.14 वर बंद झाला. त्याच वेळी, निफ्टी 93.50 अंकांच्या म्हणजेच 0.48 टक्क्यांच्या वाढीसह 19528.80 वर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती ?

एफएमसीजी वगळता सर्व क्षेत्रांनी सोमवारच्या वाढीमध्ये भाग घेतला. ब्रॉडर मार्केटने चांगला परफॉर्मन्स सुरू ठेवला आहे. डेली चार्टवर, निफ्टी 50 इंडेक्सने एक डोजी कॅंडलस्टिक पॅटर्न तयार केला आहे जो ट्रेंडमधील बदल दर्शविणारा मानला जातो. 19430 वर स्थित 20 आणि 50 डीएमए लेव्हल आता निफ्टीला सपोर्ट म्हणून काम करेल. तर त्यासाठी पहिला रझिस्टंस 19580 वर असेल.

निफ्टीने 20 इएमएवर त्याच्या शॉर्ट एव्हरेजचा सपोर्ट घेत ट्रेंडलाइन रेझिस्टन्स ओलांडल्याचे रेलिगेअर ब्रोकिंगचे अजित मिश्रा म्हणाले. इथून बाजारात आणखी तेजी येण्याची चिन्हे आहेत. तथापि, निफ्टीसाठी 19650 च्या आसपास रझिस्टंस आहे. याच्या आसपास पुन्हा प्रॉफिट बुकींग दिसू शकते. अशा परिस्थितीत, निवडक स्टॉक्सचा विचार करावा, शिवाय लाँग टर्ममसाठी ऑटो, आयटी आणि मेटल स्टॉकवर फोकस करा असेही ते म्हणाले.

आजचे टॉप 10 अ‍ॅक्शन शेअर्स कोणते ?

कोल इंडिया (COALINDIA)

विप्रो (WIPRO)

अल्ट्राटेक सिमेंट (ULTRACEMCO)

एचसीएल टेक (HCLTEC)

जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड (JIOFIN)

आयडीएफसी फर्स्ट बँक (IDFCFIRSTB)

पर्सिस्टंट (PERSISTENT)

पीएनबी (PNB)

एमफॅसिस (MPHASIS)

हिंदुस्थान पेट्रोलियम (HINDPETRO)

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe Transfer : तुकाराम मुंढेंची राजस्थानला बदली? सोशल मीडियावरील मेसेजबाबत स्वत: मुंढे यांनी दिलं स्पष्टीकरण

'मी ज्या मैदानावर खेळले तिथेच माझं मुलही...' जेनिलिया देशमुखची भावुक पोस्ट, म्हणाली...

Meta AI on WhatsApp: इमेज जनरेशन ते ट्रॅव्हल प्लॅनिंग! 'मेटा AI' ची ५ भन्नाट फीचर्स जी तुम्ही व्हॉट्सॲपवर वापरू शकता!

Rickshaw-Taxi Fare Hike: रिक्षा-टॅक्सीचा प्रवास महागणार, 1 सप्टेंबरपासून नवे दर लागू होणार; किती भाडे वाढणार?

Marathi News Live Updates : जयपूरमध्ये CJP पथकावर हल्ल्यानंतर भाजप आमदाराची खोचक टीका; म्हणाले, ‘घरात झुरळाचा काही उपयोग नसतो’

SCROLL FOR NEXT