Bharat Dynamics Shares esakal
Share Market

Bharat Dynamics Sharesमध्ये दमदार तेजी, 2,100 कोटीच्या एक्सपोर्ट ऑर्डरचा परिणाम

गेल्या एका महिन्यात कंपनीच्या शेअर्समध्ये सुमारे 1.83% ने घसरण झाली आहे.

सकाळ डिजिटल टीम

Bharat Dynamics Shares : डिफेन्स सेक्टरमधील कंपनी भारत डायनॅमिक्सला (Bharat Dynamics) 2,108.12 कोटी रुपयांची एक्सपोर्ट ऑर्डर मिळाली आहे. या बातमीनंतर सोमवारी कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी तेजी दिसून आली आणि ट्रेडिंगच्या शेवटी सुमारे 4.64% वाढीसह 913.20 रुपयांवर बंद झाला. गेल्या एका महिन्यात कंपनीच्या शेअर्समध्ये सुमारे 1.83% ने घसरण झाली आहे. मात्र, गेल्या एका वर्षात त्याच्या शेअर्सची किंमत सुमारे 98.65% वाढली आहे.

भारत डायनामिक्स ही मिसाइल्स आणि त्याच्याशी संबंधित संरक्षण उपकरणे बनवणारी आघाडीची कंपनी आहे. कंपनीकडे आधीच अनेक मोठ्या ऑर्डर्स आहेत आणि नोव्हेंबरच्या शेवटी तिची एकूण ऑर्डर-बुक 11,906 कोटी रुपये होती आणि आता त्यात आणखी वाढ झाली आहे.

अलीकडच्या काळात अनेक सकारात्मक बातम्यांमुळे भारत डायनॅमिक्सच्या शेअर्सचा चांगली परिणाम दिसून येतो आहे. यामध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या 'एअरो इंडिया 2023' कार्यक्रमादरम्यान विदेशी आणि भारतीय कंपन्यांसोबत दहा सामंजस्य करारांवर स्वाक्षरी केल्याच्या बातम्यांचाही समावेश आहे. 'एअरो इंडिया 2023' कार्यक्रमादरम्यान, भारत डायनामिक्सने त्यांच्या उत्पादनांचे आतापर्यंतचे सर्वात मोठे प्रदर्शन केले होते. यामध्ये मिसाईल्स, रडार आणि इतर संरक्षण उपकरणांचा समावेश होता.

भारत डायनॅमिक्सने थॅलेस, अल तारिक आणि बाल्टेकप्रो यांसारख्या अनेक मोठ्या कंपन्यांसोबत सामंजस्य करार केले आहेत. याशिवाय आयआयटी-मद्रास आणि तामिळनाडू इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनसारख्या देशांतर्गत कंपन्यांच्या नावांचा समावेश आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather : महाराष्ट्रात आज पावसाचा जोर वाढणार; पुणे,साताऱ्यासह 'या' जिल्ह्यांना येलो अलर्ट, तुमच्या भागात कसे असेल हवामान?

Landowners Compensation Hike: जमीनमालकांसाठी नुकसानभरपाईत वाढ, ४० वर्षांनंतर उच्च न्यायालयाचा निर्णय

TB मुक्तीसाठी 'सरपंचां'ना साकडं! गावागावांत 'हँड हेल्ड एक्स-रे'द्वारे स्क्रीनिंग; लक्षणे नसलेल्या रुग्णांना शोधून मोफत उपचार

आजचे राशिभविष्य - 16 ऑगस्ट 2026

Aries Weekly Horoscope: मेष राशीसाठी मोठी खुशखबर! जुने वाद मिटणार, नवी दारे उघडणार; 'या' दिवसांत मिळेल भाग्याची साथ

SCROLL FOR NEXT