Adani Group Sakal
Share Market

Adani Group: अदानी समूहाच्या शेअर्सची गाडी सुसाट! कंपन्यांचे मार्केट कॅप 10.9 लाख कोटींच्या पुढे

Adani Group: आज अदानी समूहाच्या कंपन्यांचे शेअर्स तेजीत आहेत.

राहुल शेळके

Adani Group: जानेवारी 2022 मध्ये भारतीय उद्योगपती गौतम अदानी यांना एका अहवालानंतर मोठे नुकसान सहन करावे लागले होते. अमेरिकन शॉर्ट सेलर फर्म हिंडेनबर्गने अदानी समूहा विरुद्ध केलेल्या संशोधन अहवालाच्या आधारे अदानी समूहावर शेअर्सच्या किंमतीत फेरफार केल्याचा आरोप करण्यात आला होता.

यानंतर, ते जगातील टॉप 20 अब्जाधीशांच्या यादीतून बाहेर पडले. या अहवालात अदानी समूहावर 88 गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.

(Big increase in shares of Adani Group, market cap of companies exceeds 10.9 lakh crores)

अदानी समूहावरील आरोपांचा परिणाम कंपन्यांच्या शेअर्सवरही दिसून आला. त्यानंतर कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. मात्र आता अदानी समूह या संकटातून बाहेर पडताना दिसत आहे कारण आज कंपन्यांचे शेअर्स तेजीत आहेत.

Adani Group Stocks List

बुधवारी अदानी समूहाच्या शेअर्सची नेत्रदीपक वाढ झाली आहे. समुहातील सर्व शेअर्सची जोरदार विक्री होताना दिसत आहे. शेअर्सच्या वाढीमुळे अदानी समूहाचे एकूण मार्केट कॅप 10.9 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले आहे. अदानी समूहाच्या शेअर्सनी इंट्राडे मार्केट कॅपमध्ये 20,241.5 कोटी जोडले आहेत.

आज, दुपारी 1:05 वाजता, ACC कंपनीचा शेअर 3% वाढीसह व्यवहार करत आहे. त्याच वेळी, अदानी ग्रीन एनर्जी 2.91% च्या वाढीसह व्यवहार करताना दिसत आहे.

अंबुजा सिमेंट्स, अदानी एनर्जी सोल्युशन्स, अदानी पॉवर आणि अदानी विल्मारचे शेअर्स 1% पेक्षा जास्त वाढीसह व्यवहार करत आहेत. एनडीटीव्ही, अदानी एंटरप्रायझेस, अदानी टोटल गॅस आणि अदानी पोर्ट्स या उर्वरित 4 शेअर्स तेजीसह व्यवहार करत होते.

नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cough-Based TB Detection Using AI: खोकल्याच्या आवाजावरूनच कळणार क्षयरोग! ‘AI’मुळे आरोग्य सेवेत मोठी क्रांती

Ashok kharat Case : भोंदूबाबा अशोक खरातचा तुरुंगातील मुक्काम वाढला ! न्यायालयाने सुनावली १ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

Kolhapur Tunnel Project : कोल्हापुरात भुयारी मार्ग होणार, शिवाजी स्टेडियम ते अंबाबाई मंदिरापर्यंत असणार भुयारी मार्ग

Call Scams : जर तुमच्या मोबाईलवर येत आहे सायलेंट फोन; तर सावध व्हा, नवा AI फ्रॉड करेल बँक खाते रिकामे, पाहा सुरक्षित कसे राहाल

"तो दारुडा, तुला सोडून देईल" प्रसिद्ध अभिनेत्रीच्या आईनेच केलेला लग्नाला विरोध; कोण आहे ही कलाकार ?

SCROLL FOR NEXT