Bonus Shares Once India's most subscribed IPO to issue four free shares  Sakal
Share Market

Bonus Share: नवीन वर्षाची भेट! 'ही' कंपनी देणार एका शेअरच्या बदल्यात 4 शेअर्स

Bonus Share News: एका शेअरमागे चार शेअर्स देण्याचा प्रस्ताव कंपनीच्या संचालक मंडळाने मंजूर केल्यापासून त्याचे शेअर्स रॉकेट बनले आहेत. कंपनीने एक्सचेंज फाइलिंगमध्ये ही माहिती दिली. यामुळेच बीएसईवर शेअर्स 6.84 टक्क्यांनी वाढून 68.99 रुपयांवर पोहोचले.

राहुल शेळके

Bonus Share: सालसार टेक्नो इंजिनीअरिंगने या वेळी आपल्या भागधारकांना नवीन वर्षाच्या आधी एक मोठी भेट दिली आहे. टेलिकॉम टॉवर्स, पॉवर ट्रान्समिशन लाइन टॉवर्स, स्मार्ट लाइटिंग पोल आणि गॅल्वनाइज्ड स्टील प्रोडक्ट्स बनवणाऱ्या सालासर टेक्नो इंजिनिअरिंगचे शेअर्स (Salasar Techno Engineering) दोन दिवसांत 15 टक्क्यांहून अधिक वाढलेत.

एका शेअरमागे चार शेअर्स देण्याचा प्रस्ताव कंपनीच्या संचालक मंडळाने मंजूर केल्यापासून त्याचे शेअर्स रॉकेट बनले आहेत. कंपनीने एक्सचेंज फाइलिंगमध्ये ही माहिती दिली. यामुळेच बीएसईवर शेअर्स 6.84 टक्क्यांनी वाढून 68.99 रुपयांवर पोहोचले. मात्र, प्रॉफिट बुकींगमुळे किंमती काहीशा खाली आल्या आहेत. सध्या तो 59.65 रुपयांवर ट्रेड करत आहे.

कंपनीने एक्सचेंज फाइलिंगमध्ये बोर्डाकडून बोनस शेअर्सच्या प्रस्तावाला मंजुरी दिल्याची माहिती दिली. या अंतर्गत, कंपनी 1 रुपयाच्या फेस व्हॅल्यूचे चार शेअर्स गुंतवणूकदारांना देईल. मात्र, त्यासाठीची रेकॉर्ड डेट अद्याप निश्चित करण्यात आलेली नाही.

कंपनीच्या सिक्युरिटीज प्रीमियम खात्यातून भागधारकांना बोनस शेअर्स जारी केले जातील आणि त्याची किंमत 126 कोटी असेल.

सालसार टेक्नो इंजिनिअरिंगचा आयपीओ सुमारे सहा वर्षांपूर्वी 2017 मध्ये आला होता. त्याचा 35.87 कोटीचा आयपीओ 273.05 वेळा सबस्क्राइब झाला, जो त्यावेळेपर्यंत सर्वात जास्त सबस्क्राइब केलेला आयपीओ ठरला होता.

त्यावेळी, प्रत्येकी 10 रुपये फेस व्हॅल्यू असलेले 33.21 लाख शेअर्स आयपीओ गुंतवणूकदारांना 108 रुपयांना जारी करण्यात आले होते. 25 जुलै 2017 ला लिस्टिंगच्या दिवशी, या शेअर्सने बीएसईमध्ये 259.15 च्या किंमतीवर एन्ट्री केली आणि 272.10 रुपयांवर वाढत दिवसाच्या शेवटी 259.15 रुपयांवर बंद झाला होता.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT