Budget 2024 why railway shares rising tremendously before the budget  Sakal
Share Market

Budget 2024: अर्थसंकल्पापूर्वी रेल्वे कंपन्यांचे शेअर्स तुफान तेजीत; काय आहे कारण?

Railway Budget 2024: 2024-25 या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात रेल्वे क्षेत्रासाठी अधिक भांडवलाची तरतूद करणे अपेक्षित आहे. रेल्वेच्या पायाभूत सुविधा सुधारण्यावर मोदी सरकारचा भर अलिकडच्या वर्षांत वाढला आहे.

राहुल शेळके

Railway Budget 2024: मोदी सरकार 2024-25 या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात रेल्वे क्षेत्रासाठी अधिक भांडवलाची तरतूद करण्याची शक्यता आहे. रेल्वेच्या पायाभूत सुविधा सुधारण्यावर मोदी सरकारचा भर अलिकडच्या वर्षांत वाढला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आर्थिक वर्ष 2023 च्या अर्थसंकल्पात रेल्वेला विक्रमी 2.40 लाख कोटी रुपयांचे भांडवल दिले होते.

रेल्वे मंत्रालयाला मिळालेले हा आतापर्यंतचे सर्वाधिक भांडवल होते आणि आर्थिक वर्ष 2013 च्या अर्थसंकल्पात रेल्वेला मिळालेल्या रकमेच्या जवळपास नऊ पट ही रक्कम होती.

रेल्वेच्या शेअर्समध्ये मोठी वाढ

रेल्वेचे शेअर्स बर्‍याच काळापासून तेजीत आहेत पण या शेअर्समध्ये अजून वाढ होण्यास वाव असल्याचे दिसते. इंडियन रेल्वे केटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन (IRCTC), रेल विकास निगम लिमिटेड (RVNL), इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन (IRFC) आणि IRCON इंटरनॅशनलच्या शेअर्सनी शुक्रवारी 52-आठवड्यांच्या उच्चांक गाठला.

IRCTC शेअरची किंमत NSE वर 958.30 च्या नवीन 52 आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचली आहे, RVNL शेअरची किंमत प्रति शेअर 207 रुपयांच्या नवीन उच्चांकावर पोहोचली, IRFC शेअरची किंमत प्रति शेअर 114 वर पोहोचली तर IRCON च्या शेअरची किंमत आज NSE वर 114 च्या नवीन शिखरावर पोहोचली आहे.

वाढीचे मुख्य कारण काय?

शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते, या शेअर्समध्ये वाढ होण्याच्या कारणांमध्ये आगामी अर्थसंकल्प 2024 मध्ये पायाभूत सुविधा क्षेत्रावर लक्ष केंद्रित करणे, रेल्वेच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी भारत सरकारकडून नव्या गुंतवणुकीची घोषणा आणि तिसर्‍या तिमाहीचे चांगले निकाल यांचा समावेश आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump: ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वीचे अपशकुन अन् दुर्याेधनाच्या जन्माची वेळ; भारतावरचं सर्वात मोठं संकट?

Rain-Maharashtra Latest Live News Update: महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल जाहीर

CM Devendra Fadnavis : डेटा, एआय व क्वांटम कॉम्प्युटिंगमुळे उत्तम मनुष्यबळ निर्माण होणार

Selu News : पुरात वाहून गेलेल्या एकाचा मृतदेह सापडला; दुसऱ्याचा शोध सुरू

VIDEO : रेल्वे पुलासाठी खोदलेल्या खड्ड्यात चार मुलं बुडाली; चौघांची प्रकृती चिंताजनक...यवतमाळमधील घटना, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT