Share Update sakal
Share Market

Share Update : सीजी पॉवरच्या शेअर्समध्ये एका दिवसात तब्बल 11% टक्के वाढ

सीजी पॉवर आणि इंडस्ट्रियल सोल्युशन्सच्या शेअर्समध्ये नुकतीच 11 टक्क्यांपर्यंत वाढ झाली. कंपनीने आउटसोर्स सेमीकंडक्टर असेंब्ली आणि टेस्ट फॅसिलिटी तयार करण्यासाठी आणि ऑपरेट करण्यासाठी रेनेसास मायक्रोइलेक्ट्रॉनिक आणि स्टार्स मायक्रोइलेक्ट्रॉनिकसोबत संयुक्त उपक्रम करार केला आहे.

सकाळ वृत्तसेवा

सीजी पॉवर आणि इंडस्ट्रियल सोल्युशन्सच्या शेअर्समध्ये नुकतीच 11 टक्क्यांपर्यंत वाढ झाली. कंपनीने आउटसोर्स सेमीकंडक्टर असेंब्ली आणि टेस्ट फॅसिलिटी तयार करण्यासाठी आणि ऑपरेट करण्यासाठी रेनेसास मायक्रोइलेक्ट्रॉनिक आणि स्टार्स मायक्रोइलेक्ट्रॉनिकसोबत संयुक्त उपक्रम करार केला आहे. त्याचा परिणाम शेअरच्या किमतीवर दिसून आला. शुक्रवारी सकाळी बीएसईवर शेअर 484 रुपयांवर उघडला, पण थोड्याच वेळात तो 11.38 टक्क्यांनी वाढून 494.40 रुपयांवर पोहोचला. बीएसईवर स्टॉकचा 52 आठवड्यांचा उच्चांक 501.75 रुपये आहे. सध्या हा शेअर त्याच्या उच्चांकाजवळ आहे.

गेल्या एका वर्षात सीजी पॉवरचे शेअर्स 44 टक्क्यांनी वाढले आहेत. डिसेंबर 2023 च्या अखेरीस, कंपनीतील प्रमोटर्सचा हिस्सा 58.11 टक्के होता आणि लोकांचा हिस्सा 41.89 टक्के होता. बीएसईच्या आकडेवारीनुसार, डिसेंबर 2023 च्या तिमाहीत कंपनीचा महसूल 1,860.22 कोटी होता. तर निव्वळ नफा 216.47 कोटी नोंदवला गेला.

सीजी पॉवर (CG Power) भारतात सेमीकंडक्टर क्षमता आणि इकोसिस्टम तयार करण्यास उत्सुक आहे. जपानची आघाडीची सेमीकंडक्टर कंपनी 'रेनेसास' एडवांस्ड टेक्नोलॉजी आणि एक्सपर्टीज प्रदान करेल. थायलंडची OSAT स्टार्स मायक्रोइलेक्ट्रॉनिक टेक्नोलॉजी प्रदान करेल, असे कंपनीने म्हटले आहे. जॉइंट वेंचरमध्ये सीजी पॉवरची 92.3 टक्के मालकी असेल. रेनेसास आणि स्टार्स मायक्रोइलेक्ट्रॉनिकची हिस्सेदारी अनुक्रमे सुमारे 6.8 टक्के आणि 0.9 टक्के असेल.

संयुक्त उपक्रमाने 5 वर्षांच्या कालावधीत 7,600 कोटीची गुंतवणूक करण्याची योजना आहे, ज्याला आवश्यकतेनुसार सबसिडी, इक्विटी आणि संभाव्य बँक कर्जाच्या कॉम्बिनेशनद्वारे फायनान्स केले जाईल. हा संयुक्त उपक्रम गुजरातमधील साणंद इथे उभारण्यात येणार असून, त्याची क्षमता दररोज 1.5 कोटी युनिट्सपर्यंत असेल. या संयुक्त उपक्रमामध्ये ऑटोमोटिव्ह, कंझ्युमर, इंडस्ट्रियल आणि 5G सारख्या उद्योगांचा समावेश असेल.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT