Cholamandalam Finance Sakal
Share Market

Cholamandalam Finance: गेल्या 6 महिन्यांत चोलामंडलमच्या शेअर्समध्ये 60% वाढ, तेजी कायम राहील का, काय सांगतात तज्ज्ञ?

चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्स कंपनीचे शेअर्स गेल्या 6 महिन्यांत 60 टक्क्यांनी वाढले आहेत.

राहुल शेळके

Cholamandalam Finance Share Price: चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्स (Cholamandalam Finance) कंपनीचे शेअर्स गेल्या 6 महिन्यांत 60 टक्क्यांनी वाढले आहेत.

सध्या त्याचे शेअर्स 0.70 टक्क्यांच्या वाढीसह 1158.95 रुपयांवर ट्रेड करत आहे. कंपनीचा आतापर्यंतचा फोकस ऑटो लोनवर होता. व्यवसाय वाढीमुळे नवीन विभागांत ऑपरेटिंग मार्जिन वाढले आहे, जे क्रेडिट कॉस्ट ऑफसेट करेल आणि परतावा वाढवेल असे जेफरीजचे म्हणणे आहे.

चोलामंडलम फायनान्सच्या एकूण लोन पोर्टफोलिओमध्ये ऑटो लोनचा हिस्सा सध्याच्या 63 टक्क्यांवरून 53 टक्क्यांवर येईल. चोलामंडलम फायनान्स ऑटो लोनच्या प्रमुख विभागांमध्ये आपला बाजारातील हिस्सा वाढवत आहे.

कंपनीला लहान बेस आणि डायवर्सिफाइड ऑटो पोर्टफोलिओचा फायदा होत आहे. यूज्ड व्हेहिकल्सचे हेल्दी मिक्स आणि लेस सायकलिक लाईट कमर्शियल व्हेहिकल्स या क्षेत्रातील वाढती मागणी यामुळे कंपनीचा ऑटो लोन पोर्टफोलिओ वाढला आहे.

चोलमंडलम फायनान्स पुढे लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी आणि एसएमई लोनमध्ये विस्तार करेल तसेच नॉन-व्हेहिकल लोनमध्ये वाढ करण्यासाठी नवीन बिझनेस ब्रांच उघडणार असल्याचे समजतंय.

बिझनेस लोनची ग्रोथ 2023-2026 या आर्थिक वर्षात 46 टक्के सीएजीआरने वाढेल असा विश्वास ब्रोकरेज फर्म जेफरीजला आहे.

यासह, आर्थिक वर्ष 2026 पर्यंत टोटल लोन बुकमधील त्यांचा वाटा 14 टक्क्यांवर पोहोचेल. जेफरीजने चोलामंडलमच्या शेअर्समध्ये 15% टक्क्यांच्या वाढीसह 1,350 रुपयांचे टारगेट निश्चित केले आहे.

नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयचा मोठा खुलासा; कोर्टात उघड झाले धक्कादायक तपशील, मनिषा मांढरेचा घटनाक्रम सांगितला

Night Heat Reason : सूर्य मावळला तरी घरात उकडतंय? रात्रीसुद्धा एवढं गरम का वाटतं? वैज्ञानिकांनी सांगितलं आश्चर्यकारक कारण

Shaktipeeth Highway Protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात सोलापुरातील शेतकरी संतप्त, पुणे-सोलापूर महामार्ग ठप्प; राजू शेट्टी पोलिसांत शाब्दिक चकमक

“लोकसंख्या कमी करायची जबाबदारी आहे माझ्यावर…” शंशाक केतकर व्हिडिओ शेअर करत म्हणाला... 'हिंदू आहे आणि...'

Latest Marathi News Live Update : चांदीच्या आयातीवर केंद्र सरकारचे निर्बंध; दरवाढीची शक्यता

SCROLL FOR NEXT