Share Market Closing Bell eSakal
Share Market

Closing Bell : रेड मार्कवर बंद झाला आजचा व्यवहार; मिडकॅप अन् स्मॉल कॅप शेअर्समध्ये खरेदीचा जोर

Share Market : आज व्यवहार बंद होताना सेन्सेक्स 130 अंकांनी कोसळून 65,826 अंकांवर स्थिरावला.

Sudesh

मंगळवारी सकाळी ग्रीन मार्कमध्ये सुरू झालेला शेअर बाजार बंद होताना मात्र रेड मार्कवर आला. त्यामुळे आजचं व्यवहारांचं सत्र निराशाजनक ठरलं आहे. आज एफएमजीसी आणि मेटल्स सेक्टरमध्ये पडझड दिसून आली.

सेन्सेक्स-निफ्टी कोसळले

आज व्यवहार बंद होताना सेन्सेक्स 130 अंकांनी कोसळून 65,826 अंकांवर स्थिरावला. तर, निफ्टीदेखील 27 अंकांनी कोसळून 19,570 अंकांवर स्थिरावला. सेन्सेक्समधील 30 पैकी 10 शेअर्स ग्रीन मार्कवर बंद झाले, तर 20 शेअर्समध्ये मंदी दिसून आली. निफ्टीच्या 50 पैकी 19 शेअर्समध्ये तेजी दिसून आली, तर 31 शेअर्स रेड मार्कवर बंद झाले.

सेक्टोरल अपडेट

आजच्या व्यवहारांमध्ये बँकिंग, आयटी, फार्मा, मीडिया, कंझ्यूमर ड्यूरेबल्स या शेअर्समध्ये तेजी दिसून आली. तर, ऑईल अँड गॅस, हेल्थकेअर, इन्फ्रास्ट्रक्चर कमोडिटी, मेटल्स, एफएमजीसी आणि ऑटो सेक्टरच्या शेअर्समध्ये पडझड दिसून आली. मिडकॅप आणि स्मॉल कॅप शेअर्समध्ये खरेदीचा जोर दिसून आला. (Share Market News)

गुंतवणुकदारांच्या संपत्तीत किरकोळ वाढ

शेअर बाजारात थोडीफार पडझड झाली असली, तरीही गुंतवणुकदारांच्या संपत्तीत काहीशी वाढ झाल्याचं दिसून आलं. बीएसईवर लिस्ट असणाऱ्या कंपन्यांचं मार्केट कॅप हे 305.39 लाख कोटी रुपयांवर पोहोचलं आहे. मागच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हे 305.35 लाख कोटी रुपये होतं. म्हणजे आजच्या सेशनमध्ये गुंतवणुकदारांच्या संपत्तीत 4,000 कोटी रुपयांची वाढ झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrashekhar Bawankule : मुख्यमंत्री फडणवीस केंद्रीय मंत्री तर बावनकुळे मुख्यमंत्री? स्वत: मंत्री बावनकुळेंनींच दिलं स्पष्टीकरण

NGO साठी सुवर्णसंधी! HCL Foundation देणार 24 कोटी रुपयांचे अनुदान; अर्ज प्रक्रिया सुरू, पाहा सविस्तर

Latest Marathi News Update: पालखी सोहळ्यात भाविकांचे लाखोंचे दागिने, मोबाईल चोरीस

Horoscope : उद्या बनतोय दुर्मिळ दशकीर्ती योग! 'या' 5 राशी होणार मालमाल; करिअर-व्यवसायात भरभराट, आरोग्याची मोठी समस्या होणार दूर

Mansoon Romance : दहावी, करिअर, गोंधळलेलं मन आणि ‘गारवा’ अल्बम...

SCROLL FOR NEXT