Coal India  Sakal
Share Market

Coal India : कोल इंडियाकडून रेकॉर्ड डेटची घोषणा, प्रत्येक शेअरमागे 5 रुपयांचा डिव्हिडेंड

Coal india latest news in marathi |कोल इंडिया आर्थिक वर्ष 2023-24 साठी तिच्या शेअरहोल्डर्सना प्रति शेअर 5 रुपये अंतिम लाभांश देणार आहे. कंपनीने अंतिम लाभांशासाठी 16 ऑगस्ट 2024 ही रेकॉर्ड डेट निश्चित केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

कोल इंडिया आर्थिक वर्ष 2023-24 साठी तिच्या शेअरहोल्डर्सना प्रति शेअर 5 रुपये अंतिम लाभांश देणार आहे. कंपनीने अंतिम लाभांशासाठी 16 ऑगस्ट 2024 ही रेकॉर्ड डेट निश्चित केली आहे. 2 मे 2024 रोजी कंपनीच्या बोर्डाची बैठक झाली, ज्यामध्ये अंतिम लाभांशाची शिफारस करण्यात आली. मात्र, आगामी वार्षिक सर्वसाधारण सभेत (एजीएम) मंजुरी मिळणे बाकी आहे.

चांगल्या तिमाही निकालानंतर कंपन्या सहसा त्यांच्या शेअरहोल्डर्सना बक्षीस म्हणून लाभांश देतात. कोल इंडियाने 2 मे 2024 रोजी मार्च तिमाही निकालांच्या घोषणेसह लाभांश जाहीर केला होता.

एकदा मंजूर झाल्यानंतर, लाभांश रेकॉर्ड तारखेनुसार इक्विटी शेअर्स धारक शेअरहोल्डर्सना इलेक्ट्रॉनिक किंवा फिजिकल स्वरूपात वितरित केला जातो. कोल इंडिया आयकर कायदा 1961 अंतर्गत निर्धारित दरांवर कर कपात करेल, जे शेअरहोल्डर्सच्या रेसिडेंशियल स्टेटसनुसार आणि डिविडेंड पेमेंटसाठी सादर केलेल्या कागदपत्रांवर अवलंबून असेल.

कोल इंडियाच्या शेअर्समध्ये शुक्रवारी 3.54 टक्क्यांनी वाढ झाली असून बीएसईवर सध्या हा शेअर 509.45 रुपयांवर ट्रेड करत आहे. कोल इंडियाच्या शेअर्सचा 52 आठवड्यांचा उच्चांक 527.20 रुपये आणि 52 आठवड्यांचा नीचांक 226.10 रुपये आहे.

गेल्या एका महिन्यात कंपनीच्या शेअर्समध्ये 9 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या 6 महिन्यांत स्टॉकने 24 टक्के परतावा दिला आहे. या वर्षात कंपनीचे शेअर्स आतापर्यंत 33 टक्क्यांनी वाढले आहेत. गेल्या एका वर्षात या शेअरने 122 टक्के मजबूत परतावा दिला आहे. गेल्या तीन वर्षांत या शेअरने 253 टक्के नफा कमावला आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: टिकणारे आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन सुरूच: मनोज जरांगे- पाटील; प्रमाणपत्र रद्द करून जातीयवादी भूमिका

Viral Video : नोकरी न सोडता 'या' पठ्ठ्याने वर्षभरात कमावले एक कोटी, डोकॅलिटी पाहून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

Nagpur Crime: नागपुरात संतापजनक प्रकार! १६ वर्षीय मुलीला डांबून मारहाण, सिगारेटचे चटके दिल्याचा आरोप

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींना या देशाबद्दल किंवा इथल्या लोकांबाबत अजिबात आदर नाही- भाजप खासदार प्रदीप कुमार सिंग

AUS vs BAN 1st Test: बांगलादेशचे निर्विवाद वर्चस्व; पण, मिचेल स्टार्कने नोंदवला वर्ल्ड रेकॉर्ड, ऑस्ट्रेलियन गोलंदाज 'डाव्यां'मध्ये सरस

SCROLL FOR NEXT