Credit Suisse Bank Crisis
Credit Suisse Bank Crisis  Sakal
Share Market

American Bank Crisis : १६६ वर्षे जुनी क्रेडिट सुइस बँक बुडण्याच्या उंबरठ्यावर कशी पोहोचली? भारतावर परिणाम होणार का?

राहुल शेळके

Credit Suisse Bank Crisis : अमेरिकेच्या बँकांवरील संकट आता युरोपपर्यंत पोहोचले आहे. स्वित्झर्लंडची क्रेडिट सुइस बँक संकटाचा सामना करत आहे. 166 वर्षे जुन्या या बँकेवर असलेला धोका संपूर्ण जगासाठी संकट बनू शकतो.

क्रेडिट सुइस ही UBS AG नंतर स्वित्झर्लंडमधील दुसरी सर्वात मोठी बँक आहे. बुधवारी बँकेचे शेअर्स 25 टक्क्यांपर्यंत घसरले, त्यानंतर जगभरातील शेअर बाजारावर त्याचा परिणाम दिसून आला. जी बँक आतापर्यंत इतर बँका आणि वित्तीय संस्थांना मानांकन देत होती, तीच बँक बुडण्याच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे.

भारतात या बँकेची एकूण मालमत्ता 20,700 कोटी रुपये आहे. ही भारतातील 12वी सर्वात मोठी विदेशी बँक आहे. या बँकेची मुंबईत एक शाखा आहे. अशा स्थितीत क्रेडिट सुईसचे संकट भारतासाठी किती धोकादायक आहे, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

अमेरिकन बँकांनंतर आता क्रेडिट सुइस संकट भारताचे किती आणि कसे नुकसान करू शकते. या संपूर्ण संकटाबद्दल सविस्तर जाणून घेऊयात.

क्रेडिट सुइस संकट काय आहे?

क्रेडीट सुईसचा वार्षिक अहवाल आल्यानंतर या संकटाला सुरुवात झाली. अंतर्गत लेखापरीक्षणाच्या आधारे या वार्षिक अहवालात बँकेची आर्थिक स्थिती ठीक नसल्याचे समोर आले.

एवढेच नाही तर क्रेडिट सुईसचे गेल्या वर्षी मोठे नुकसान झाले होते. क्रेडिट सुईसला 2022 मध्ये 7.3 अब्ज स्विस फ्रँकचे नुकसान झाले आहे. हा अहवाल आल्यानंतर बँकेतील ठेवीदारांनी पैसे काढण्यास सुरुवात केली. त्यात बँकेच्या सर्वात मोठ्या गुंतवणूकदारांनी पैसे काढून घेतले.

बुधवारी, बँकेतील सर्वात मोठी गुंतवणूकदार सौदी नॅशनल बँकेने सांगितले की ते यापुढे बँकेला अतिरिक्त तरलता प्रदान करणार नाहीत. सौदी बँकेने क्रेडिट सुईसमध्ये आणखी गुंतवणूक करण्यास नकार दिला.

सौदी बँकेची क्रेडिट सुईसमध्ये 9.9 टक्के हिस्सेदारी आहे. ही बातमी आल्यानंतर क्रेडिट सुइसचे शेअर्स घसरायला सुरुवात झाली. एका झटक्यात बँकेचे शेअर्स 25 टक्क्यांनी घसरले.

बँकेवर गंभीर आरोप :

क्रेडिट सुइसवर गंभीर आरोप आहेत. सन 2008 मध्ये ब्राझीलमध्ये क्रेडिट सुइसच्या बँकर्सना अटक करण्यात आली होती. बँक कर्मचाऱ्यावर मनी लाँड्रिंग आणि करचुकवेगिरीचे आरोप होते.

क्रेडिट सुईसच्या 13 कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांनी 2006 मध्ये ऑपरेशन स्वित्झर्लंड सुरू केल्याचा आरोप आहे. त्यानंतर बँकेच्या कार्यालयावर छापा टाकण्यात आला.

इतकेच नव्हे तर गुन्हेगार, भ्रष्ट राजकारणी आणि वादग्रस्त लोकांना सुरक्षित आश्रयस्थानाची सुविधा उपलब्ध करून दिल्याचा आरोप बँकेवर करण्यात आला. स्वित्झर्लंडच्या स्विस बँकेप्रमाणे या बँकेवरही काळ्या पैशाचा आरोप करण्यात आले होते.

किती मोठे संकट?

क्रेडिट सुईसचे हे संकट किती मोठे आहे, याचा अंदाज बॉण्डमध्ये झालेल्या घसरणीवरून दिसून येते. मार्चमध्ये आतापर्यंत बँकेच्या बॉण्डच्या किंमती 38 टक्क्यांनी घसरल्या आहेत.

क्रेडिट सुइस बँकेचे 2027 मध्ये परिपक्व होणारे बेल-इन-बॉण्ड बुधवारी 1 डॉलरसाठी 55 सेंट्सवर ट्रेड झाले. त्याची बोली एक दिवस आधी 72 सेंट होती. तर मार्चच्या सुरुवातीला ते 90 सेंट्सवर होते. ही घसरण दर्शवते की जर बँक दिवाळखोर झाली तर या बॉण्डची किंमत शून्य असेल.

भारतासाठी किती धोकादायक आहे?

भारतातील या बँकेची एकूण मालमत्ता 20,700 कोटी रुपये आहे. भारताच्या बँकिंग व्यवस्थेत क्रेडिट सुईसचा हिस्सा फक्त 0.1 टक्के आहे. सिलिकॉन व्हॅली बँकेप्रमाणे क्रेडिट सुईस बँकही दिवाळखोर झाली, तर त्याचा भारतावर थेट फरक पडणार नाही.

क्रेडीट सुईसच्या संकटाचा भारतात थेट परिणाम झालेला दिसत नाही. कारण भारताच्या बँकिंग प्रणालीमध्ये क्रेडिट सुईसचा फक्त 0.1 टक्के हिस्सा आहे, जो किरकोळ आहे. डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये क्रेडिट सुइसचे अस्तित्व असल्याचे जेफरीजने आपल्या अभ्यासात म्हटले आहे.

डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये विदेशी बँका सक्रिय आहेत. डेरिव्हेटिव्ह मार्केटमधील 96 टक्के कर्जाची टाइमलाइन दोन वर्षांची आहे. क्रेडिट सुइसची मुंबईत फक्त एक शाखा आहे, तिची 70 टक्के मालमत्ता अल्पकालीन आहे.

बँकेचा ठेवी आधार 28 अब्ज रुपयांपेक्षा कमी आहे. म्हणजे भारताला फारसा धोका नाही. त्यांच्या अभ्यासात, जेफरीज तज्ञ प्रखर शर्मा आणि विनायक अग्रवाल यांनी सांगितले की रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया तरलता समस्या आणि क्रेडिट सुइसशी संबंधित जोखीम यांचे बारकाईने निरीक्षण करेल. मध्यवर्ती बँकेला गरज वाटल्यास तीही हस्तक्षेप करेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT