Dhaka Stock Exchange Sakal
Share Market

Bangladesh Stock Market: राजकीय अशांतता असूनही बांगलादेशच्या शेअर बाजारात तुफान तेजी; अनेक शेअर्स 10 टक्क्यांपर्यंत वाढले

Dhaka Stock Exchange: बांगलादेश गेल्या 2 महिन्यांपासून अशांततेशी झुंजत असून काल म्हणजेच सोमवारी 5 ऑगस्ट रोजी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांना राजीनामा देऊन देश सोडावा लागला. देशातील राजकीय पेचप्रसंग असताना शेअर बाजारात काय स्थिती आहे हे जाणून घेऊया.

राहुल शेळके

Dhaka Stock Exchange: बांगलादेश गेल्या 2 महिन्यांपासून अशांततेशी झुंजत असून काल म्हणजेच सोमवारी 5 ऑगस्ट रोजी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांना राजीनामा देऊन देश सोडावा लागला. शेख हसीना सध्या भारतात असून त्यांच्या बांगलादेशात अंतरिम सरकार स्थापन करण्यासंदर्भात लष्करप्रमुख वकार-उझ-झमान यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वाची बैठक झाली आहे. देशातील राजकीय पेचप्रसंग असताना बांगलादेशच्या शेअर बाजारात काय स्थिती आहे हे जाणून घेऊया.

बांगलादेशचा शेअर बाजार ढाका स्टॉक एक्सचेंज डीएसईएक्स 198.71 अंकांच्या किंवा 3.80 टक्क्यांच्या वाढीसह 5427.98 च्या पातळीवर व्यवहार करत होता.

सकाळचा व्यापार 5229.27 अंकांवर सुरू झाला आणि त्याने दिवसभरातील उच्चांक 5480.92 गाठला. यामध्ये एकूण 1,47,270 शेअर्सचे व्यवहार होत होते. दुपारी 1:52 वाजता, DSEX मधील 338 शेअर्स वर होते आणि 65 शेअर्स घसरले होते.

ACME पेस्टिसाइड्स लिमिटेडचा शेअर सर्वाधिक वाढला

ACME Pesticides Limited चा शेअर सर्वाधिक वाढला आहे आणि तो 10 टक्क्यांच्या अप्पर सर्किटसह 16.5 वर व्यापार करत आहे. बांगलादेश शेअर बाजारात बँक शेअर्सचा उत्साह जास्त आहे. सर्वाधिक तेजीत अनेक बँकिंग शेअर्स आहेत. डीएसईएक्सवरील टॉप 10 शेअर्सपैकी प्रत्येकी 10 टक्क्यांची वाढ होत आहे.

शेवटच्या ट्रेडिंग सत्रात 105 अंकांच्या घसरणीनंतर डीएसईएक्स 5229 च्या पातळीवर बंद झाला होता. देशभरात पसरलेल्या अराजकता आणि राजकीय अस्थिरतेचा थेट परिणाम बांगलादेशी शेअर बाजारावर झाला आणि गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणावर विक्री करून ढाका स्टॉक एक्स्चेंजमधून आपला पैसा बाहेर काढण्याचा प्रयत्न केला.

ढाका स्टॉक एक्सचेंज बांगलादेशची राजधानी ढाका येथील निकुंजा येथे आहे. हा बांगलादेशच्या दोन स्टॉक एक्सचेंजपैकी एक आहे. दुसरा निर्देशांक चितगाव स्टॉक एक्सचेंज आहे. गेल्या वर्षी जानेवारी 2023 मध्ये, DSE आणि Nasdaq ने ट्रेडिंग टेक्नॉलॉजीसह त्यांची भागीदारी जाहीर केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT