Dividend Stock info edge announces 100 percent interim dividend check record date  Sakal
Share Market

Dividend Stock: 100 टक्के डिव्हिडेंड देतेय 'ही' कंपनी; खात्यात पैसे कधी येणार?

Dividend Stock: कंपनीचा महसूल 593 कोटीवर पोहोचला आहे.

राहुल शेळके

Dividend Stock: रिटेलिंग कंपनी इन्फो एजने (INFO EDGE) आर्थिक वर्ष 2024 साठी भागधारकांना अंतरिम डिव्हिडेंड जाहीर केला आहे. मंगळवारी कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत भागधारकांना प्रति शेअर 100 टक्के डिव्हिडेंड जाहीर करण्यात आला.

कंपनीने जुलै-सप्टेंबर 2023 तिमाही निकाल जाहीर केले आहेत. चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीचा कंसोलिडेट नेट प्रॉफिट 209 कोटी आहे.

इन्फो एजने आर्थिक वर्ष 2024 साठी गुंतवणूकदारांना प्रति इक्विटी शेअर 10 रुपये अंतरिम डिव्हिडेंड जाहीर केला आहे. कंपनीच्या शेअरची फेस व्हॅल्यू 10 रुपये आहे. म्हणजेच गुंतवणूकदारांना प्रति शेअर डिव्हिडेंडमधून 100 टक्के उत्पन्न मिळेल. अंतरिम डिव्हिडेंडची रेकॉर्ड डेट 17 नोव्हेंबर 2023 आहे. डिव्हिडेडं 29 नोव्हेंबर 2023 रोजी किंवा नंतर दिला जाईल.

इन्फो एजने जुलै-सप्टेंबर 2023 तिमाहीत 209 कोटी रुपयांचा नफा कमावला. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीला 200 कोटीचा नफा झाला होता. सप्टेंबर तिमाहीत कंपनीचा महसूल 593 कोटीवर पोहोचला आहे.

जो मागील वर्षी याच तिमाहीत 584 कोटी होता. सप्टेंबर तिमाहीत कंपनीचा एबिटदा वार्षिक आधारावर 241 कोटीपर्यंत वाढला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत तो 226.4 कोटी होता. त्याच वेळी, मार्जिन 38.8% वरून 40.7% पर्यंत वाढले आहे.

नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT