dixon technologies india limited share stock analysis share market investment option  Sakal
Share Market

Dixon Technologies (india) ltd : डिक्सन टेक्नॉलॉजीज (शुक्रवारचा बंद भाव ः रु. ५,९५१)

डिक्सन टेक्नॉलॉजीज (इंडिया) लि. ही सुनील वाचानी यांनी १९९३ मध्ये स्थापन केलेली इलेक्ट्रॉनिक वस्तू उत्पादक कंपनी

भूषण गोडबोले

डिक्सन टेक्नॉलॉजीज (इंडिया) लि. ही सुनील वाचानी यांनी १९९३ मध्ये स्थापन केलेली इलेक्ट्रॉनिक वस्तू उत्पादक कंपनी आहे. या कंपनीमार्फत ग्राहकोपयोगी इलेक्ट्रॉनिक्स, प्रकाशयोजना, गृह उपकरणे, क्लोज सर्किट टेलिव्हिजन कॅमेरे (सीसीटीव्ही), सुरक्षा पाळत ठेवणारी उपकरणे,

एसी-पीसीबी, मोबाईल फोन यासारखी इलेक्ट्रॉनिक उत्पादने तयार केली जातात. अलीकडेच कंपनीने ‘इमॅजिन मार्केटिंग ’कंपनीसोबत भारतात वायरलेस ऑडिओ सोल्युशन्स डिझाइन व निर्मितीत प्रवेश केला आहे. गुडगावमध्ये मुख्यालय असलेल्या, या कंपनीकडे नोएडा, डेहराडून, लुधियाना आणि चित्तूरमध्ये सुमारे २१ उत्पादन सुविधा आहेत.

गेल्या काही वर्षांत, कंपनीला सरकारच्या उत्पादन निगडित प्रोत्साहन (पीएलआय) योजनेअंतर्गत मोबाईल फोन, लाइटनिंग, टेलिकॉम आणि नेटवर्किंग उत्पादने, एअर कंडिशनरसाठी इन्व्हर्टर कंट्रोलर बोर्ड, आयटी हार्डवेअर आदी पाच विभागांसाठी मंजुरी मिळाली आहे.

गेल्या १२ ते १८ महिन्यांमधील वाढत्या ऑर्डरी व ग्राहकर्वग विस्ताराच्या पार्श्‍वभूमीवर आगामी काळात कंपनीच्या व्यवसायात आणि नफ्यात मोठी वाढ अपेक्षित आहे. गेल्या १८ महिन्यांत, कंपनीने सॅमसंगसारख्या विद्यमान ग्राहकांशी आपले नाते अधिक घट्ट केले आहे;

तसेच रिलायन्स जिओ आणि शाओमी (मोबाइल), व्होल्टास व बॉश (घरगुती उपकरणे), एसर, लेनोवो (आयटी हार्डवेअर) आदी अनेक नवे क्लायंट मिळविले आहेत. अनुकूल धोरण, देशांतर्गत मागणी, जागतिक उत्पादकांचे चीन प्लस वन धोरण, कंपनीची क्षमताविस्तारासाठी केली जात असलेली गुंतवणूक फायदेशीर ठरणे अपेक्षित आहे.

जाहीर झालेल्या तिमाही निकालानुसार, कंपनीने ११३ कोटी रुपयांपेक्षा अधिक नफा मिळविला असून, कर्जाचे प्रमाण कमी ठेऊन कंपनी गुंतविलेल्या भांडवलावर १५ टक्क्यांपेक्षा जास्त परतावा मिळवित व्यवसायवृद्धी करत आहे.

दीर्घावधीच्या आलेखानुसार, ऑक्टोबर २०२१ मध्ये ६,२४३ रुपयांचा उच्चांक नोंदविल्यानांतर या शेअरने मर्यादित पातळ्यांमध्येच चढ-उतार दर्शविला. आगामी काळात ६,२४३ रुपये या पातळीच्यावर शेअरने बंद भाव दिल्यास आलेखानुसारदेखील तेजीचे संकेत मिळू शकतील.

किमतीच्या दृष्टीने हा शेअर सध्या महाग वाटत असला, तरी दीर्घावधीमधील व्यवसायवृद्धीची शक्यता व क्षमता लक्षात घेता दीर्घावधीसाठी या शेअरमध्ये मर्यादित प्रमाणात गुंतवणूक करण्याचा गुंतवणूकदारांनी जरूर विचार करावा.

(या लेखातील माहिती अभ्यासाच्या दृष्टिकोनातून दिली गेली आहे. प्रत्यक्ष व्यवहार करताना जोखीम ओळखून वैयक्तिक गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

(लेखक ‘सेबी’ नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray: आता महाराष्ट्र बंद पाडणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा; थेट पोलीस व्हॅनवर चढून...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माची १८ चेंडूत फिफ्टी अन् रचले तब्बल तीन विश्वविक्रम; सूर्यकुमारलाही टाकलं मागे

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

Maharashtra Live News : जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी; २ नोव्हेंबरला भारत बंदचा निर्णय

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT