DOMS IPO: GMP jumps as issue opens next week. Date, price, other details  Sakal
Share Market

IPO News: डोम्स इंडस्ट्रीजच्या आयपीओला ग्रे मार्केटमध्ये जबरदस्त मागणी, 'या' तारखेला खुला होणार आयपीओ

Doms Industries IPO: कंपनीचे शेअर्स अनलिस्टेड मार्केटमध्ये 460 रुपयांच्या प्रीमियमवर ट्रेड करत आहेत.

राहुल शेळके

Doms Industries IPO: डोम्स इंडस्ट्रीजचा (Doms Industries) आयपीओ 13 डिसेंबरला खुला होणार आहे. यात गुंतवणूकदारांना 15 डिसेंबरपर्यंत पैसे गुंतवण्याची संधी असेल. दरम्यान, ग्रे मार्केटमध्ये कंपनीच्या शेअर्सना मोठी मागणी आहे.

कंपनीने इश्यूसाठी प्रति शेअर 750-790 रुपये प्राईस बँड निश्चित केला आहे. आयपीओच्या माध्यमातून 1200 कोटी रुपये उभारण्याचा कंपनीचा मानस आहे. अँकर गुंतवणूकदारांसाठी ही ऑफर 12 डिसेंबरपासून खुली होईल.

ग्रे मार्केटमध्ये डोम्स इंडस्ट्रीजच्या शेअर्सना मोठी मागणी आहे. सध्या कंपनीचे शेअर्स अनलिस्टेड मार्केटमध्ये 460 रुपयांच्या प्रीमियमवर ट्रेड करत आहेत. याचा अर्थ अप्पर प्राइस बँडनुसार कंपनीचे शेअर्स 1250 रुपयांवर लिस्ट होण्याची शक्यता आहे. असे झाल्यास गुंतवणूकदारांना 58 टक्के बंपर नफा मिळेल.

आयपीओमध्ये 18 इक्विटी शेअर्सच्या लॉटमध्ये बोली लावता येईल. डोम्स द्वारे 350 कोटी रुपयांचे नवीन शेअर्स जारी केले जातील. प्रमोटर्सकडून 850 कोटींची ऑफर फॉर सेल (OFS) असेल.

कॉर्पोरेट प्रमोटर्स FILA म्हणजेच Fabbrica Italiana Lapized Affini Spa या ओएफएसमध्ये 800 कोटींचे शेअर्स विकणार आहे. प्रमोटर संजय मनसुखलाल राजानी आणि केतन मनसुखलाल राजानी यात प्रत्येकी 25 कोटीचे शेअर्स विकतील.

डोम्स नवीन मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटीसाठी आयपीओतून मिळणाऱ्या पैशांचा वापर करेल. नवीन प्लांटच्या मदतीने कंपनी रायटिंग इंस्ट्रूमेंट्स, वॉटर कलर पेन्स, मार्कर्स आणि हायलाइटर्ससाठी उत्पादन क्षमता वाढवणार आहे.

याशिवाय, सामान्य कॉर्पोरेट उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठीही ही रक्कम वापरली जाईल. डोम्सचा निव्वळ नफा 2022-23 या आर्थिक वर्षात वार्षिक 567.2 टक्क्यांनी वाढून 95.8 कोटी झाला आहे. ऑपरेशन्समधून मिळणारा महसूल वार्षिक आधारावर 77.3 टक्क्यांनी वाढून 1,212 कोटी झाला आहे आणि एबिटदा वार्षिक आधारावर 149 टक्क्यांनी वाढून 186.7 कोटी झाला आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पूरग्रस्तांसाठी ५ रुपये मागितले तर..., शेतकऱ्यांकडून वसुलीच्या टीकेवर मुख्यमंत्री फडणवीस कडाडले; कारखान्यांना इशारा

महावितरणचा दरवाढीचा शॉक! वीज होणार महाग, प्रति युनिट 'इतके' पैसे द्यावे लागणार जास्त

Kolhapur Accident : संतोष आणि मोहम्मद जिवलग मित्र पण नियतीच्या मनात वेगळ होतं..., दुचाकींच्या धडकेत दोघे मित्र ठार

Latest Marathi News Live Update: छत्रपती संभाजीनगर ते जळगाव महामार्गावर अर्धा तास रस्ता रोको आंदोलन

Bachchu Kadu : 'शेतकरी एकत्र येत नाही, हाच सर्वांत मोठा शोक'; बच्चू कडूंचा सरकारवर घणाघात

SCROLL FOR NEXT