IPO Open  sakal
Share Market

IPO Open : ‘वी’चा ‘एफपीओ’ १८ एप्रिलला खुला

आर्थिक अडचणीत असलेली दूरसंचार कंपनी व्होडाफोन-आयडियाचा (वी) १८ हजार कोटी रुपयांची फॉलो-ऑन पब्लिक ऑफर (एफपीओ) योजना १८ एप्रिल ते २२ एप्रिल या कालावधीत गुंतवणुकीसाठी खुली होणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : आर्थिक अडचणीत असलेली दूरसंचार कंपनी व्होडाफोन-आयडियाचा (वी) १८ हजार कोटी रुपयांची फॉलो-ऑन पब्लिक ऑफर (एफपीओ) योजना १८ एप्रिल ते २२ एप्रिल या कालावधीत गुंतवणुकीसाठी खुली होणार आहे. या ‘एफपीओ’साठी १० ते ११ रुपयांचा किंमतपट्टा निश्चित केला आहे. कंपनीने शेअर बाजारांना ही माहिती दिली आहे.

अँकर गुंतवणूकदार १६ तारखेला बोली लावू शकतील. सर्वसामान्य गुंतवणूकदार किमान एक लॉट म्हणजेच १२९८ शेअरसाठी बोली लावू शकतात. त्यांना किमान १४,७२८ रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. कंपनीच्या भागधारकांनी अलीकडेच शेअर आणि शेअर संबंधित रोख्यांद्वारे २० हजार कोटी रुपयांचा निधी उभारण्यास मंजुरी दिली होती.

कंपनी १५ एप्रिलपासून ऑफर संपेपर्यंत या योजनेच्या प्रसिद्धीसाठी गुंतवणूकदार आणि विश्लेषकांशी संवाद साधेल. या योजनेतून मिळणारा निधी कंपनी फाइव्ह-जी सेवेचा विस्तार आणि फोर-जी सेवेतील सुधारणा करण्यासाठी वापरणार आहे. कंपनीला स्पर्धात्मक स्थिती सुधारण्यासाठी आणि ग्राहकांना चांगला अनुभव देण्याकरिता कार्यक्षमता वाढवण्यासाठी या निधीचा वापर केला जाईल, असेही कंपनीने म्हटले आहे. रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेलसारख्या मोठ्या स्पर्धकांशी स्पर्धा करण्याकरिता कंपनीला तिच्या सेवा आणि पायाभूत सुविधा सुधारणे आवश्यक आहे.

आतापर्यंतचा सर्वांत मोठा ‘एफपीओ’

व्होडाफोन आयडियाचा हा ‘एफपीओ’ देशातील आतापर्यंतचा सर्वांत मोठा ‘एफपीओ’ आहे. या आधी येस बँकेचा १५ हजार कोटी रुपयांचा एफपीओ सर्वांत मोठा होता. अदानी एंटरप्रायझेसने गेल्या वर्षी जानेवारीमध्ये २० हजार कोटी रुपयांचा ‘एफपीओ’ आणला होता. मात्र, नंतर कंपनीने तो मागे घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

Railway Accident: रेल्वे गेट ९६ जवळ स्विफ्ट गाडी २० फूट खड्ड्यात कोसळली; तीन पलट्यांनंतरही एअरबॅगमुळे पाच जणांचे प्राण वाचले

Asia Cup Final: स्मृती मानधना - शफली वर्माचे तब्बल तीन वर्ल्ड रेकॉर्ड! भारताचे श्रीलंकेसमोर भलंमोठं लक्ष्य

SCROLL FOR NEXT