Tata Motors  sakal
Share Market

Tata Motors : या शेअरची 4 वर्षात दमदार कामगिरी ; 65 रुपयांचा शेअर 950 रुपयांवर

शेअर मार्केटमध्ये असे अनेक स्टॉक्स आहेत ज्यांनी त्यांच्या गुंतवणूकदारांना उत्कृष्ट परतावा दिला आहे. आज आम्ही तुम्हाला अशा कंपनीबद्दल सांगणार आहोत जिच्या शेअरने मागील पाच वर्षात गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे.

सकाळ वृत्तसेवा

शेअर मार्केटमध्ये असे अनेक स्टॉक्स आहेत ज्यांनी त्यांच्या गुंतवणूकदारांना उत्कृष्ट परतावा दिला आहे. आज आम्ही तुम्हाला अशा कंपनीबद्दल सांगणार आहोत जिच्या शेअरने मागील पाच वर्षात गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. चार वर्षांपूर्वी शेअरची किंमत 70 रुपयांच्या खाली गेली होती, मात्र आता त्याची किंमत 900 रुपयांच्या पुढे गेली आहे. आता या स्टॉककडे मल्टीबॅगर स्टॉक म्हणून पाहिले जात आहे. हा स्टॉक आहे टाटा मोटर्सचा (tata motors). टाटा मोटर्सने गेल्या पाच वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना उत्कृष्ट परतावा दिला आहे आणि गुंतवणूकदारांच्या पैशात अनेक पटींनी वाढ केली आहे. पाच वर्षांत, टाटा मोटर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 400% पेक्षा जास्त परतावा दिला आहे.

1 मार्च 2019 रोजी टाटा मोटर्सच्या शेअरची किंमत 180.30 रुपये होती. यानंतर, शेअर घसरला आणि 3 एप्रिल 2020 पर्यंत शेअरची किंमत निम्म्याहून कमी झाली, जेव्हा शेअरची बंद किंमत एनएसईवर 65.30 रुपये होती. मात्र, त्यानंतर हा शेअर हळूहळू वाढू लागला. मार्च 2021 पर्यंत, शेअरच्या किंमतीत मजबूत वाढ झाली आणि 300 रुपयांची पातळीही ओलांडली. फेब्रुवारी 2022 पर्यंत या शेअरने 500 रुपयांचा टप्पा ओलांडला होता. मात्र, त्यानंतर शेअरमध्ये थोडीशी घसरण झाली.

गेल्या वर्षभरापासून हा शेअर पुन्हा वधारत असून, शेअरमध्ये चांगली तेजी दिसून येत आहे. 23 फेब्रुवारीला एनएसईवर शेअर 935.05 रुपयांवर बंद झाला. त्याचा 52 आठवड्यांचा उच्चांक 950 रुपये आहे आणि नीचांक 400.45 रुपये आहे. गेल्या एका वर्षात यी स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 123% पेक्षा जास्त परतावा दिला आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT