HDFC Bank Block Deal Sakal
Share Market

HDFC Bank: HDFC बँकेचे शेअर्स वाढणार का? जगातील मोठ्या गुंतवणूकदारांनी खरेदी केले 755 कोटी रुपयांचे शेअर्स

HDFC Bank Block Deal: खाजगी क्षेत्रातील एचडीएफसी बँकेने तिची मूळ कंपनी एचडीएफसी लिमिटेडचे ​​विलीनीकरण केल्यापासून कंपनीच्या शेअर्समध्ये घसरण दिसून येत आहे. जर आपण 2024 च्या सुरुवातीपासून आजपर्यंत पाहिले तर एचडीएफसी बँकेचे शेअर्स सातत्याने घसरत आहेत.

राहुल शेळके

HDFC Bank Block Deal: खाजगी क्षेत्रातील एचडीएफसी बँकेने तिची मूळ कंपनी एचडीएफसी लिमिटेडचे ​​विलीनीकरण केल्यापासून कंपनीच्या शेअर्समध्ये घसरण दिसून येत आहे. जर आपण 2024 च्या सुरुवातीपासून आजपर्यंत पाहिले तर एचडीएफसी बँकेचे शेअर्स सातत्याने घसरत आहेत.

पण गुरुवारी जगातील दोन बड्या गुंतवणूकदारांनी एचडीएफसी बँकेतील सुमारे 755 कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले. अशा परिस्थितीत आता एचडीएफसीचे शेअर्स वाढणार का हे पाहावे लागेल.

मॉर्गन स्टॅनली आणि सिटी ग्रुपने एचडीएफसी बँकेत 755 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केली आहे. मात्र, यासाठी दोन्ही कंपन्यांनी शेअर बाजारात करार केला, म्हणजेच त्यांनी कंपनीत गुंतवणूक न करता शेअर बाजारातून एचडीएफसी बँकेचे शेअर्स खरेदी केले.

HDFC बँकेच्या किती शेअर्सची खरेदी-विक्री झाली?

बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) वर उपलब्ध आकडेवारीनुसार, अमेरिकन वित्तीय सेवा कंपनी मॉर्गन स्टॅनले आणि सिटी ग्रुपने त्यांच्या स्वतंत्र संस्थांद्वारे HDFC बँकेचे 43.75 लाख शेअर्स खरेदी केले आहेत. हा करार 1,726.29 रुपये प्रति शेअर या दराने झाला आहे. अशाप्रकारे, या मोठ्या कराराचे एकूण मूल्य 755.29 कोटी रुपये होते.

बीएनपी परिबाने एचडीएफसीचे शेअर्स विकले

बीएनपी परिबानेही गेल्या आठवड्यात एचडीएफसी बँकेतील हिस्सा कमी केला होता. त्यानंतर कंपनीने एचडीएफसी बँकेचे 543.27 कोटी रुपयांचे शेअर्स विकले होते.

मॉर्गन स्टॅनले आणि सिटी ग्रुपने एचडीएफसी बँकेत गुंतवणूक केल्यामुळे शुक्रवारी बँकेच्या शेअर्समध्ये सकारात्मक कल दिसून येत आहे. बाजारातील घसरणीचा कल असूनही, एचडीएफसी बँकेचे शेअर्स ग्रीन झोनमध्ये आहेत आणि 2.40 टक्क्यांनी वाढले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Pune Crime : उरुळी कांचनमध्ये पतीकडून पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड हल्ला; १५ दिवस घरात कैद

Pune Crime: पुणे-सोलापूर महामार्गावर मांगूर माशांची मोठी तस्करी उघड; उरुळीकांचन पोलिसांची कारवाई, पिकअप जप्त

Dried Fish Rush: पावसाळ्यापूर्वी सुक्या मासळीची धावपळ; रायगडात भाव स्थिर, खवय्यांची खरेदीला गर्दी

१०० च्या जागी ५०० तर ४०० च्या २०००... ATM मध्ये मोठी बिघाड, पैसे काढण्यासाठी लोकांची झुंबड!

SCROLL FOR NEXT