HMA Agro shares hit upper circuit; company announces record date for stock split  Sakal
Share Market

Multibagger Stock: लिस्टिंगनंतर 5 महिन्यातच स्टॉक स्प्लिटची घोषणा; कंपनीचा शेअर अप्पर सर्किटवर

Multibagger Stock: कंपनीने बीएसईला नुकतीच ही माहिती दिली.

राहुल शेळके

Multibagger Stock: एचएमए अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज लिमिटेडच्या (HMA Agro Industries) शेअर्समध्ये नुकतेच 10 टक्क्यांच्या वर अप्पर-सर्किट पाहायला मिळाले. कंपनीने लिस्टिंगच्या 5 महिन्यांनंतर स्टॉक स्प्लिटची घोषणा केली आहे. कंपनीने बीएसईला नुकतीच ही माहिती दिली.

सध्या हा शेअर 687.10 रुपयांवर ट्रेड करत आहे. एचएमए अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज ही पोल्ट्रीसह मांस उत्पादन उद्योगातील एक कंपनी आहे. भारतातून गोठवलेल्या म्हशीचे मांस निर्यात करणारी ही सर्वात मोठी कंपनी आहे. कंपनी जगातील 40 देशांमध्ये मांस निर्यात करते.

एचएमए अ‍ॅग्रो इंडस्ट्रीजने 1.10 च्या प्रमाणात स्टॉक स्प्लिटची घोषणा केली. कंपनीने शेअर बाजाराला दिलेल्या एक्सचेंज फायलिंगमध्ये म्हटले आहे की, भागधारकांची पात्रता निश्चित करण्यासाठी कंपनीने 29 डिसेंबर 2023 ही रेकॉर्ड डेट निश्चित केली आहे.

एचएमए अ‍ॅग्रोचे 10 रुपये फेस व्हॅल्यू असलेला प्रत्येक शेअर 1 रुपया फेस व्हॅल्यूच्या 10 इक्विटी शेअर्समध्ये विभागले जातील, ज्याला कंपनीच्या भागधारकांनी मान्यता दिली आहे. सोमवारी 1 जानेवारी 2024 पासून स्टॉक एक्स-स्प्लिट ट्रेड करेल.

स्टॉक स्प्लिटच्या घोषणेमुळे, एचएमए अ‍ॅग्रो इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये 10 टक्क्यांचे अप्पर-सर्किट दिसले आणि शेअरची किंमत 687.10 रुपये झाली. कंपनीचे मार्केट कॅप 3,440.79 कोटी आहे.एचएमए ऍग्रोचा 480 कोटीचा आयपीओ यावर्षी जूनमध्ये आला होता.

आयपीओची किंमत 585 रुपये प्रति शेअर होती. हा शेअर 4 जुलै 2023 रोजी बीएसई आणि एनएसईवर लिस्ट झाला. एचएमए अ‍ॅग्रोचे शेअर्स बीएसईवर 5.13 टक्के प्रीमियमसह 615 रुपयांवर लिस्ट झाले.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Silver Price Impact War : सोने चांदी दरावर अद्याप युद्धाचा परिणाम, आठवड्यातील दराची आकडेवारी आली समोर

Maharashtra: महसूल विभागात प्रतिनियुक्तीबाबत कडक निर्बंध लादले; महायुती सरकारचा मोठा निर्णय, कोणत्या अधिकाऱ्यांना लागू होणार?

‘फार थोडे दिवस राहिलेत’ आशा भोसले यांचं भावूक वक्तव्य पुन्हा चर्चेत, म्हणालेल्या...'आता माझं वय झालय'

Asha Bhosle Favorite Leader : आशा भोसलेंचा आवडता नेता कोण? भारदस्त आवाज असणारा नेता अत्यंत जिवलग मित्र...

Breaking News Live Update: शेतात लागलेल्या आगीत सालदाराचा संसार जळून खाक, तळवेल फाट्या जवळील घटना

SCROLL FOR NEXT