Canada India Tensions Sakal
Share Market

Canada India Tensions: भारत आणि कॅनडा वादाचा फटका शेअर मार्केटला? 'या' कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण

Canada India Tensions: भारत आणि कॅनडाचा प्रश्न सुटण्याऐवजी तो अधिकच गुंतागुंतीचा होत आहे.

राहुल शेळके

Canada India Tensions: गेल्या काही वर्षांपासून भारत आणि कॅनडादरम्यान तणाव वाढला आहे. त्यामुळे राजकीय वादानंतर आता आर्थिक युद्ध सुरू झाले आहे. ज्याचा परिणाम शेअर बाजारावर दिसून येत आहे. किंबहुना भारत आणि कॅनडाचा प्रश्न सुटण्याऐवजी तो अधिकच गुंतागुंतीचा होत आहे.

भारताची कॅनडामध्ये अब्जावधी रुपयांची गुंतवणूक आहे. त्याचा परिणाम आता शेअर बाजारावरही दिसून येत आहे. बुधवारी सकाळी शेअर बाजार उघडताच दोन्ही निर्देशांक काही वेळातच घसरले.

(लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये)


एकीकडे, बीएसईचा सेन्सेक्स 608 अंकांनी घसरून 66,988.77 वर व्यवहार करत होता, तर एनएसईचा निफ्टी निर्देशांक 173.80 अंकांनी घसरून 19,959.50 वर व्यवहार करत होता.

शेअर बाजारात व्यवहार सुरू होताच काही बँकिंग आणि आयटी कंपन्यांचे शेअर्स घसरले. यामध्ये विप्रो ते इन्फोसिस आणि कोटक महिंद्रा बँक ते आयसीआयसीआय बँकेपर्यंतच्या शेअर्सचा समावेश आहे.

विशेष बाब म्हणजे या सर्व कंपन्या आहेत ज्यात कॅनडा पेन्शन फंड इन्व्हेस्टमेंट बोर्ड (CPPIN) ने पैसे गुंतवले आहेत. मात्र, या कंपन्यांच्या शेअर्समध्ये सुरुवातीच्या घसरणीनंतर काहींमध्ये रिकव्हरी दिसून आली.

कॅनडा पेन्शन फंडाने गुंतवलेल्या कंपन्यांमध्ये पेटीएमची मूळ कंपनी One 97 Communications Ltd चा समावेश आहे. कंपनीचे शेअर्स 2 टक्क्यांनी घसरले, तर फॅशन ब्युटी ब्रँड Nykaa चे शेअर्सही सुरुवातीच्या व्यवहारात दीड टक्क्यांनी घसरले.

दोन्ही कंपन्यांच्या शेअरहोल्डिंग नुसार, कॅनडा पेन्शन फंडची पेटीएममध्ये सुमारे 970 कोटी रुपये आणि Nykaa मध्ये सुमारे 620 कोटी रुपयांची गुंतवणूक आहे.

कॅनडा पेन्शन फंड इन्व्हेस्टमेंट बोर्डने (CPPIN) अनेक भारतीय कंपन्यांमध्ये अंदाजे 1 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक केली आहे. सुमारे 30 भारतीय कंपन्या आहेत ज्यांचा व्यवसाय कॅनडामध्ये आहे आणि त्यांनी 40,000 कोटींहून अधिक गुंतवणूक आहे. अशा परिस्थितीत हा ताण वाढल्याने या कंपन्यांवरील संकटही वाढू शकते.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2025 Auction: कॅमेरॉन ग्रीनसाठी ऐतिहासिक बोली! KKR अन् CSK मध्ये जोरदार रस्सीखेच; बनला सर्वात महागडा परदेशी खेळाडू

Rupee Fall : ऐतिहासिक नीचांक! रुपया 91 पार; 1 डॉलर = 91.07 रुपये! कारण काय? महागाई वाढणार का?

IPL 2026 Auction : गडी पेटला... सर्फराज खानने २२ चेंडूंत चोपल्या ७३ धावा, ३३१.८२ चा स्ट्राईक रेट; सेलिब्रेशन तर भन्नाटच Video Viral

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगरच्या औरंगाबाद खंडपीठात सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज सुनावणी

प्रेक्षकांना कसा वाटला 'वचन दिले तू मला' मालिकेचा पहिला भाग? नेटकरी म्हणतात, 'एपिसोड छान होता पण...'

SCROLL FOR NEXT