Akshata Murty Sakal
Share Market

Akshata Murty: ऋषी सुनक यांच्या पत्नी अक्षता मूर्तींचे एका तासात सुमारे 412 कोटींचे नुकसान, काय आहे कारण?

अक्षता मूर्ती यांचे सुमारे 412 कोटींंचे मोठे नुकसान झाले आहे.

राहुल शेळके

Infosys Share Fall: ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या पत्नी अक्षता मूर्ती यांचे सुमारे 412 कोटींंचे मोठे नुकसान झाले आहे. अक्षता यांचे इन्फोसिसमध्ये अंदाजे 0.94 टक्के शेअर्स आहे. भारतातील सर्वात मोठी आयटी कंपनी इन्फोसिसची स्थापना त्यांचे वडील नारायण मूर्ती यांनी केली होती.

इन्फोसिसच्या शेअर्सच्या घसरणीत, पैसे गमावलेल्या इन्फोसिसच्या शेअरहोल्डर्सच्या यादीत यूकेचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या पत्नी अक्षता मूर्ती यांचाही समावेश आहे.

मनीकंट्रोलच्या वृत्तानुसार अक्षता मूर्तीकडे 3,89,57,096 इन्फोसिसचे शेअर्स आहेत, दलाल स्ट्रीटवरील शुक्रवारच्या एका तासाच्या सत्रानंतर अक्षता मूर्तींच्या निव्वळ संपत्तीत सुमारे 412 कोटी रुपयांची घसरण झाली.

शेअर्समधील घसरणीचे कारण

आयटी क्षेत्रातील कंपनी इन्फोसिसने कमकुवत जागतिक वातावरणाच्या पार्श्वभूमीवर महसूल वाढीशी संबंधित अंदाज कमी केला आहे. त्यामुळे इन्फोसिसच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आणि आयटी क्षेत्रातील शेअर्सच्या विक्रीमुळे देशांतर्गत शेअर बाजारात घसरण झाली.

एप्रिल-जून 2023 तिमाहीत कंपनीने कमावलेला निव्वळ नफा देखील बाजाराच्या अपेक्षेपेक्षा कमी होता. यामुळे इन्फोसिसबाबतचे शेअर बाजारातील वातावरण बिघडले आहे.

आजच्या शेअर्स स्थितीबद्दल बोलायचे झाले तर, सध्या ते बीएसईवर 7.64 टक्क्यांनी घसरून 1338.10 रुपयांवर व्यवहार करत आहेत. इंट्रा-डेमध्ये शेअर 1311.60 रुपयांपर्यंत खाली आला होता.

काय आहे तज्ज्ञांचा सल्ला?

सीएनआय रिसर्चचे सीईओ किशोर पी. ओस्तवाल म्हणतात की इन्फोसिसने महसूल वाढीशी संबंधित अंदाज कमी केला आहे हा बाजारासाठी एक मोठा धक्का आहे.

कारण बाजारपेठ त्यासाठी तयार नव्हती. हा धक्का अल्प कालावधीचा असून गुंतवणूकदारांना शेअर कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळाली आहे.

गुंतवणूकदार रु. 1250-1300 च्या जवळ खरेदी करू शकतात. गेल्या आठवड्यात आणि 3 महिन्यांत आयटी शेअर्समध्ये सतत खरेदी होत आहे. इन्फोसिसच्या शेअर्सनी तीन महिन्यांत 25% झेप घेतली आहे. सध्या या क्षेत्रात अशी कोणतीही चिंता नाही.

गार्टनरचे वरिष्ठ संचालक विश्लेषक डीडी मिश्रा यांचे मत आहे की, गेल्या काही वर्षांत मोठ्या डील मिळाल्यामुळे इन्फोसिसची कामगिरी चांगली होती.

परंतु कंपनीला सध्याचे जागतिक मागणीचे वातावरण आणि मार्जिन राखण्यासाठी खूप लक्ष द्यावे लागेल. कंपनीतून अनेक वरिष्ठ कर्मचारी निघून जाणे आणि वाढती स्पर्धा याकडेही लक्ष देण्याची गरज आहे. इन्फोसिसलाही काही क्षेत्रात ऑटोमेशन स्वीकारण्याची गरज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar Health Update : शरद पवार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज ! चार दिवसाच्या विश्रांतीनंतर घरी परतणार

Latest Marathi News Live Update : आदिवासी बांधवांचा नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

आई झाल्यावर पहिल्यांदाच दिसली कतरिना, चाहत्यांना बघत क्यूट स्माइल देत केलं असं काही की... VIRAL VIDEO

Stock Market Today : शेअर बाजाराची हिरव्या रंगात सुरुवात! सेन्सेक्स 500 अंकांनी वाढला; IT शेअर्समध्ये वाढ; कोणते शेअर्स तेजीत?

Donald Trump : कोट्यवधी लोकांचा बळी गेला असता, भारत-पाक अणुयुद्ध मी थांबवले; ट्रम्प यांचा पुनरूच्चार

SCROLL FOR NEXT