Innova Captab IPO Sakal
Share Market

Innova Captab IPO: इनोव्हा कॅपटॅबचा आयपीओ आजपासून खुला, 26 डिसेंबरपर्यंत आहे वेळ

Innova Captab IPO: आर्थिक वर्ष 2023 मध्ये कंपनीचा नफा 6.26 टक्क्यांनी वाढून 67.95 कोटी झाला आहे.

राहुल शेळके

Innova Captab IPO: इंटिग्रेटेड फार्मास्युटिकल कंपनी इनोव्हा कॅपटॅबचा (Innova Captab) आयपीओ 21 डिसेंबर अर्थात आजपासून खुला झाला आहे. या 570 कोटीच्या आयपीओसाठी त्यांनी 426-448 रुपये प्रति शेअर प्राइस बँड निश्चित केला आहे.

या आयपीओमध्ये 320 कोटीपर्यंतचे नवीन शेअर्स आणि 55.80 लाख इक्विटी शेअर्सच्या विक्रीसाठी OFS चा समावेश आहे. मनोज कुमार लोहरीवाला, विनय कुमार लोहरीवाला आणि ज्ञान प्रकाश लोहरीवाला ऑफर फॉर सेलमध्ये (OFS) शेअर्स विकतील. आयसीआयसीआय सिक्युरिटीज आणि जेएम फायनांन्शियल हे आयपीओचे बुक रनिंग लीड मॅनेजर आहेत.

इनोव्हा कॅपटॅब ही फार्मास्युटिकल कंपनी आहे ज्यामध्ये रिसर्च अँड डेव्हलपमेंट, मॅन्युफॅक्चरिंग, ड्रग डिस्ट्रीब्यूशन व मार्केटिंग शिवाय एक्सपोर्टही केले जाते. आर्थिक वर्ष 2023 मध्ये, कंपनीचा कंसोलिडेटेड रेव्हेन्यू 15.72 टक्क्यांनी वाढून 926.38 कोटी झाला.

गेल्या आर्थिक वर्षात तो 800.53 कोटी होता. आर्थिक वर्ष 2022 मधील 63.95 कोटीच्या तुलनेत आर्थिक वर्ष 2023 मध्ये कंपनीचा नफा 6.26% ने वाढून 67.95 कोटी झाला आहे.

आयपीओमधून येणाऱ्या रकमेपैकी 144.40 कोटी कर्ज परतफेडीसाठी, 23.60 कोटी कंपनीची उपकंपनी युएमएलमध्ये (UML) गुंतवले जातील आणि 72 कोटी खेळत्या भांडवलाच्या गरजा भागवण्यासाठी खर्च केले जातील. याशिवाय, काही रक्कम जनरल कॉर्पोरेट उद्देशांसाठी खर्च केली जाईल.

इश्यूचा अर्धा हिस्सा क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल बायर्ससाठी (QIBs) राखीव ठेवण्यात आला आहे. 35 टक्के किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव आहे आणि बाकी 15 टक्के गैर-संस्थात्मक खरेदीदारांसाठी (NIB) राखीव आहेत. गुंतवणूकदार किमान 33 इक्विटी शेअर्ससाठी आणि 33 इक्विटी शेअर्सच्या पटीत बोली लावू शकतात.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asha Bhosle Passes Away: दिग्गज गायिका आशा भोसले यांचं निधन! भारतीय संगीत क्षेत्रातील एक अजरामर आवाज हरपला

ASHA BHOSLE PASSES AWAY: बालपणीचा गोड क्षण, आशा भोसले आणि लता मंगेशकरांचा यांचा जुने फोटो Viral

Hormuz Strait: करार नाही, तणाव कायम… तरी होर्मुझमधून GOOD NEWS! जे घडलं ते जगाला थक्क करून गेलं! १६ जहाजांची धडाकेबाज एंट्री

Asha Bhosale: वयाच्या १० व्या वर्षी करिअरची सुरूवात ते २० भाषांत १२००० गाणी, गिनीज बुक मध्ये नोंद; 'असा' आहे आशाताईंचा संर्घषमयी जीवनप्रवास

Induction Safety Tips : इंडक्शन स्टोव्हजवळ अजिबात ठेऊ नका 'या' 5 वस्तू; नाहीतर लगेच होतील खराब, इंडक्शनही जळेल

SCROLL FOR NEXT