Inox Wind Energy Stock Price Sakal
Share Market

Stock Market: 'या' विंड पॉवर कंपनीला मिळाली मोठी ऑर्डर, 6 महिन्यांत दिला मोठा परतावा

Inox Wind Energy Stock Price: आयनॉक्स विंड लिमिटेड कंपनीला (Inox Wind Ltd) एका मोठ्या कमर्शियल आणि इंडस्ट्रियल कंपनी सी अँड आयकडून (C&I) मोठी ऑर्डर मिळाली आहे. ऑर्डर मिळाल्याच्या बातमीमुळे या शेअरमध्ये मोठी तेजी दिसून आली

राहुल शेळके

Inox Wind Energy Stock Price: आयनॉक्स विंड लिमिटेड कंपनीला (Inox Wind Ltd) एका मोठ्या कमर्शियल आणि इंडस्ट्रियल कंपनी सी अँड आयकडून (C&I) मोठी ऑर्डर मिळाली आहे. ऑर्डर मिळाल्याच्या बातमीमुळे या शेअरमध्ये मोठी तेजी दिसून आली आणि शेअरने 480 रुपयांचा 52 आठवड्यांचा नवा उच्चांक गाठला. आयनॉक्स विंडला 279 मेगावॅट प्रोजेक्टचे कंत्राट मिळाले आहे.

कंपनीने जारी केलेल्या निवेदनानुसार, यामध्ये 180 मेगावॅटसाठी मर्यादित स्कोप असणारे ईपीसी आणि 99 मेगावॅटसाठी एंड-टू-एंड टर्नकी एक्झिक्यूशनसह उपकरणांच्या पुरवठ्याचा समावेश आहे. हा करार आयडब्ल्यूएलच्या तीन मेगावॅट विंड टर्बाइन जनरेटरच्या (WTGs) पुरवठ्याशी संबंधित आहे.

आयनॉक्स विंड लिमिटेड ही गुजरात, हिमाचल प्रदेश आणि मध्य प्रदेशमध्ये चार अत्याधुनिक मॅन्युफॅक्चरिंग प्लांट्ससह विंड एनर्जी मार्केटमधील एक इंटिग्रेटेड कंपनी आहे, जिथे ब्लेड, ट्यूबलर टॉवर्स, हब आणि नेसेल्स तयार केले जातात.

आयनॉक्स विंड लिमिटेडच्या गुंतवणूकदारांना दमदार नफा मिळाला आहे. 6 महिन्यांत त्यांच्या गुंतवणूकदारांना तिप्पट नफा झाला आहे. 5 दिवसात हा शेअर 16 टक्क्यांनी वाढला आहे. 1 महिन्यात त्यात 65 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 6 महिन्यांत स्टॉकचा परतावा 201% होता. तर या वर्षी गुंतवणूकदारांना 325 टक्के इतका मजबूत परतावा दिला आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Fraud: मॅनेजरने पत्नी आणि मेव्हण्यासोबत उडवले ५९० कोटी; देशातील मोठ्या बँकेतून पैसे कसे गायब झाले?

Latest Marathi News Live Update : बाणेर पासपोर्ट कार्यालय बॉम्बने उडवण्याची धमकी

Somnath Suryawanshi Case: सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलली

What is the E20 Petrol Mandate 2026? पेट्रोलचे नियम बदलणार! तुमच्या गाडीत 'हे' इंधन भरण्यापूर्वी ही बातमी नक्की वाचा, अन्यथा...

श्रीदेवींच्या निधनामागे स्ट्रिक्ट डायट कारणीभूत? बोनी कपूरांचा खुलासा, म्हणाले...'ती मीठचं खात नव्हती'

SCROLL FOR NEXT