Share Market Today Sakal
Share Market

Share Market Today: आजही शेअर बाजार कोसळणार का? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज?

Share Market Today: गुरुवारी भारतीय इक्विटी इंडेक्स सर्व सेक्टर्सच्या विक्रीच्या दरम्यान घसरणीसह बंद झाले. ट्रेडिंग सत्राच्या शेवटी सेन्सेक्स 1,769.19 अंकांच्या अर्थात 2.10 टक्क्यांच्या घसरणीसह 82,497.10 वर बंद झाला.

राहुल शेळके

Share Market Investment Tips: गुरुवारी भारतीय इक्विटी इंडेक्स सर्व सेक्टर्सच्या विक्रीच्या दरम्यान घसरणीसह बंद झाले. ट्रेडिंग सत्राच्या शेवटी सेन्सेक्स 1,769.19 अंकांच्या अर्थात 2.10 टक्क्यांच्या घसरणीसह 82,497.10 वर बंद झाला आणि निफ्टी 546.80 अंकांच्या अर्थात 2.12 टक्क्यांच्या घसरणीसह 25,250.10 वर बंद झाला.

आज कशी असेल शेअर बाजाराची स्थिती?

प्रोग्रेसिव्ह शेअर्सचे संचालक आदित्य गग्गर म्हणाले की,फ्यूचर्स आणि ऑप्शन्स विभागातील बदल तसेच मॅक्रो अनिश्चितता यांचा एकूण बाजाराच्या भावनेवर परिणाम झाला. गॅप-डाउन ओपनिंगनंतर, बेअर्सने बाजारात वर्चस्व गाजवण्यास सुरुवात केली. यामुळे निफ्टीने महत्त्वाची सपोर्ट पातळी तोडली. 546.80 अंकांच्या घसरणीसह निफ्टी 50 इंडेक्स 25,250.10 वर बंद झाला.

मजबूत बियरिश कँडलसह हा इंडेक्स हायर टॉप हायर बॉटम फॉर्मेशन मालिकेतून ब्रेक डाउन झाला आहे. हे ट्रेंड रिव्हर्सलचे लक्षण आहे. पण खाल टाइम फ्रेमवर म्हणजे ऑवरली चार्टवर संपूर्ण बाजार खूपच ओवरसोल्ड दिसतो.

अशा स्थितीत पुलबॅक रॅलीची गरज आहे. आता निफ्टीला पुढील मोठा सपोर्ट 25,000 किंवा 50DMA च्या स्तरावर आहे. त्याच वेळी, वरच्या बाजूस, 25,550-25,600 च्या झोनमध्ये रजिस्टंस दिसून येतो.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?
  • बीपीसीएल (BPCL)

  • श्रीराम फायनान्स (SHRIRAMFIN)

  • लार्सन अँड टूब्रो (LT)

  • ऍक्सिस बँक (AXISBANK)

  • रिलायन्स (RELIANCE)

  • हिंदुस्तान पेट्रोलियम (HINDPETRO)

  • गोदरेज प्रॉपर्टीज (GODREJPROP)

  • कमिन्स इंडिया (CUMMINSIND)

  • पर्सिस्टन्ट (PERSISTENT)

  • जुबिलंट (JUBLFOOD)

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बिहार मतदानापूर्वी राहुल गांधींचा 'हायड्रोजन बॉम्ब', केंद्राने कसं मॅनेज केलं, धक्कादायक आरोप अन् पुरावे एका क्लिकवर

Uddhav Thackeray In Beed : ''फडणवीस दगाबाज, सत्तेबाहेर करणं हाच पर्याय''; ठाकरेंचा शेतकऱ्यांशी संवाद, बच्चू कडूंच्या आंदोलनावरही बोलले...

Solapur Crime: 'साेलारपुरात महिला डॉक्टरचा रुग्णाकडून विनयभंग'; न्यायालयाने सुनावली १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी..

कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका घेणार निरोप? अभिनेत्रीच्या पोस्टची रंगली चर्चा; म्हणाली- शेवटचा दिवस....

Pune Railway Station : दिवाळीत ३५ लाख नागरिकांचा रेल्वे प्रवास; पुण्यातून धावल्या नियमित अन्‌ विशेष ११०० गाड्या

SCROLL FOR NEXT