Share Market Today Sakal
Share Market

Share Market Today: मध्यपूर्वेतील तणाव आणि F&O वर निर्बंध; आज शेअर बाजारात मोठी विक्री होणार?

Share Market Today: मंगळवारी अस्थिर व्यापार सत्रात भारतीय इक्विटी इंडेक्स सपाट बंद झाले. व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स 33.49 अंकांच्या अर्थात 0.04 टक्क्यांच्या घसरणीसह 84,266.29 वर बंद झाला

राहुल शेळके

Share Market Investment Tips: मंगळवारी अस्थिर व्यापार सत्रात भारतीय इक्विटी इंडेक्स सपाट बंद झाले. व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स 33.49 अंकांच्या अर्थात 0.04 टक्क्यांच्या घसरणीसह 84,266.29 वर बंद झाला आणि निफ्टी 13.90 अंकांच्या म्हणजेच 0.05 टक्क्यांच्या घसरणीसह 25,796.90 वर बंद झाला. मंगळवारी सुमारे 2210 शेअर्स वाढले, 1587 शेअर्स घसरले आणि 90 शेअर्समध्ये कोणताही बदल झाला नाही.

आज कशी असेल शेअर बाजाराची स्थिती?

एलकेपी सिक्युरिटीजचे रुपक डे म्हणतात की, निफ्टीने डेली चार्टवर लॉन्ग अपर डोजी पॅटर्न तयार केला आहे. यावरून बाजाराची दिशाहीनता दिसून येते. 25800 वर हेवी कॉल रायटिंग सूचित करते की ही पातळी मजबूत रझिस्टन्स म्हणून कार्य करू शकते.

निफ्टीला 25750 वर सपोर्ट आहे. याच्या खाली गेल्यास निफ्टी 25600/25500 पर्यंत घसरू शकतो. त्याच वेळी, वरच्या बाजूला, यासाठी पहिली नोंदणी 25800 आहे. हा रझिस्टन्स पार केल्यावर निफ्टी 26050 च्या दिशेने जाऊ शकतो.

इस्रायल आणि इराणमधील वाढत्या संघर्षामुळे संपूर्ण मध्यपूर्वेत तणावाचे वातावरण आहे. याशिवाय मंगळवारी देशांतर्गत बाजारात एफ अँड ओ ट्रेडिंगबाबत सेबीच्या परिपत्रकावर काय प्रतिक्रिया येते हेही पाहावे लागेल. F&O च्या नियमांबाबत भीती आहे की आज बाजारात मोठी विक्री होऊ शकते.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

  • इंडसइंड बँक (INDUSINDBK)

  • ओएनजीसी (ONGC)

  • एशियन पेंट (ASIANPAINT)

  • बजाज ऑटो (BAJAJ-AUTO)

  • टाटा स्टील (TATASTEEL)

  • ज्युबिलंट फूड (JUBLFOOD)

  • आयडीया (IDEA)

  • ऑरो फार्मा (AUROPHARMA)

  • आयडिएफसी (IDFCFIRSTB)

  • अ‍ॅस्ट्रेल (ASTRAL)

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Case : भोंदू खरात प्रकरणानंतर राज्यभर कारवाईचा धडाका; महिन्यात 15 भोंदू बाबांवर गुन्हे दाखल, नाव-गावासह 'अंनिस'ने यादीच केली जाहीर

IPL 2026 : स्टार खेळाडूंसोबत शेवटचा'सेल्फी'! १४ वर्षीय अभव, २० वर्षीय क्रिकेटपटूचा जागीच मृत्यू; DC vs RCB सामन्यानंतर भयानक घडलं

ओबेन इलेक्ट्रिककडून Rs. 99,999 रूपये या सुरुवातीच्या किमतीत Rorr EVO सुपर बाइक लाँच; दमदार फीचर्स पाहा

Latest Marathi News Live Update : कोल्हापूर जिल्ह्यातील खुपिरे येथील सुरभी लॉजवर पोलिसांचा छापा

MLC Election: झीशान सिद्दीकींच्या उमेदवारीमुळे वाद पेटला; एक बडा नेता शिवसेनेकडे वळला? तर दुसरा दुखावला, राष्ट्रवादीत बंडाची चाहूल!

SCROLL FOR NEXT