Share Market Today Sakal
Share Market

Share Market Today: कच्चे तेल पुन्हा वाढले; जागतिक संकेत सुस्त, आज कशी असेल बाजाराची स्थिती?

Share Market Today: गुरुवारी मोठ्या चढ-उतारांदरम्यान भारतीय बेंचमार्क इंडेक्स तेजीत राहिले आणि निफ्टी 25,000 च्या आसपास व्यवहार करताना दिसला. ट्रेडिंग सत्राच्या शेवटी सेन्सेक्स 144.31 अंकांनी अर्थात 0.18 टक्क्यांनी वाढून 81,611.41 वर बंद झाला.

राहुल शेळके

Share Market Investment Tips: गुरुवारी मोठ्या चढ-उतारांदरम्यान भारतीय बेंचमार्क इंडेक्स तेजीत राहिले आणि निफ्टी 25,000 च्या आसपास व्यवहार करताना दिसला. ट्रेडिंग सत्राच्या शेवटी सेन्सेक्स 144.31 अंकांनी अर्थात 0.18 टक्क्यांनी वाढून 81,611.41 वर बंद झाला. त्याच वेळी, निफ्टी 16.50 अंकांनी म्हणजेच 0.07 टक्क्यांनी वाढून 24,998.50 वर बंद झाला.

आज कशी असेल शेअर बाजाराची स्थिती?

शेअरखानचे जतिन गेडिया म्हणाले की, निफ्टी नफ्यासह उघडला, पण नफा कायम ठेवू शकला नाही आणि एका रेंजमध्ये व्यवहार झाला. तो 25 अंकांच्या किंचित वाढीसह बंद झाला. निफ्टी डेली चार्टवर 1500 ची घसरण मागे घेण्याच्या प्रक्रियेत आहे.

अशा परिस्थितीत, पुढील ट्रेडिंग सत्रांमध्ये निफ्टी 25350-25500 च्या दिशेने जाताना दिसू शकतो. हे लक्षात घेऊन सध्याच्या कंसोलीडेशन फेज खरेदीची संधी म्हणून वापरला जावा. निफ्टीला 24900-24850 वर मजबूत सपोर्ट आहे.

आज बाजारासाठी महत्त्वाचे ट्रिगर
अमेरिकेत किरकोळ महागाई अपेक्षेपेक्षा जास्त आहे. डाऊ 57 अंकांनी तर नॅस्डॅक 9 अंकांनी घसरले. US मध्ये क्रूड वाढून4% ने 79 डॉलरच्या जवळ पोहोचले आहेत. टीसीएसचे कमजोर निकाल, नफा आणि मार्जिन घसरले. FII ने सलग 9व्या दिवशी 8165 कोटी रुपयांची विक्री केली.
आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?
  • कोटक बँक (KOTAKBANK)

  • जेएसडब्ल्यू स्टील (JSWSTEEL)

  • एचडीएफसी बँक (HDFCBANK)

  • बीईएल (BEL)

  • इंडसइड बँक (INDUSINDBK)

  • इंडियन हॉटेल (INDHOTEL)

  • अशोक लेलँड (ASHOKLEY)

  • आयडीएफसी फर्स्ट बँक (IDFCFIRSTB)

  • आयडिया (IDEA)

  • युनायटेड फॉस्फरस लिमिटेड (UPL)

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : कर्नाटक-तामिळनाडूमधील कावेरी वादावर सुप्रीम कोर्टात सोमवारी सुनावणी

Alien Star Reels Viral: इंस्टावर व्हायरल झालेला ‘एलियन स्टार’ कोण? आधी लोकांनी उडवली थट्टा, आता प्रत्येक व्हिडिओला मिलियन व्ह्यूज

Dangerous River Stunts: पावसाळ्यात अशी चूक करू नका! खवळलेल्या नदीत ३ तरुणांची जीवघेणी स्टंटबाजी; पोलिसांचा VIDEO VIRAL

मुलांनो! राजकारणात पडू नका; भ्रष्टाचाराच्या आरोपांनी व्यथित माजी मंत्र्याची 'शेवटची चिट्ठी', कार्यालयात आढळला मृतदेह

Congress Leader Murder : काँग्रेस नेत्याची मुलासह निर्घृणपणे हत्या ! कारला घेरलं, गोळ्या झाडल्या अन् धारदार शस्त्रांनी बाप-लेकाला संपवलं

SCROLL FOR NEXT