Share Market Today Sakal
Share Market

Share Market Today: आज कशी असेल शेअर बाजाराची स्थिती? टॉप 10 शेअर्स कोणते?

Share Market Today: भारतीय बेंचमार्क निर्देशांकांनी मंगळवारी त्यांची सहा दिवसांची घसरण मोडली आणि 8 ऑक्टोबर रोजी निफ्टी 25,000 च्या वर बंद करण्यात यशस्वी झाला. व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स 584.81 अंकांनी अर्थात 0.72 टक्क्यांवर वाढत 81,634.81 वर पोहोचला.

राहुल शेळके

Share Market Investment Tips: भारतीय बेंचमार्क निर्देशांकांनी मंगळवारी त्यांची सहा दिवसांची घसरण मोडली आणि 8 ऑक्टोबर रोजी निफ्टी 25,000 च्या वर बंद करण्यात यशस्वी झाला. व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स 584.81 अंकांनी अर्थात 0.72 टक्क्यांवर वाढत 81,634.81 वर पोहोचला आणि निफ्टी 217.40 अंकांनी म्हणजेच 0.88 टक्क्यांनी वाढून 25,013.20 वर बंद झाला.

आज कशी असेल शेअर बाजाराची स्थिती?

प्रोग्रेसिव्ह शेअर्सचे संचालक आदित्य गग्गर म्हणाले की, सध्या ओव्हरसोल्डची स्थिती आहे आणि या स्थितीमुळे सुरुवातीच्या सत्रात अचानक तेजीची लाट आल्यानंतर दिवसभर एकतर्फी वेग दिसला. व्यवहाराच्या शेवटी निफ्टी 217.40 अंकांच्या वाढीसह 25,013.15 वर बंद झाले. मेटल सोडून बाकी सर्व क्षेत्रांनी हिरव्या रंगात व्यापार बंद केला. मीडिया आणि ऑटो सेक्टरने सर्वोत्तम कामगिरी केली.

जागतिक बाजारातील मूड चांगला दिसत आहे. काल अमेरिकन बाजारात तेजी दिसून आली, तर कच्च्या तेलातही मोठी घसरण झाली. ब्रेंट क्रूड 4.5% घसरून 77 डॉलरवर आले. मध्यपूर्वेतील तणावामुळे तेल पुरवठ्यावर परिणाम होत असल्याची चिंता कमी झाली आहे. हिजबुल्लाह आणि इस्रायलमध्ये युद्धविराम होण्याची आशा आहे, त्यामुळे बाजारात तेजी आली. त्याचा परिणाम आज (9 ऑक्टोबर) भारतीय शेअर बाजारांवर दिसून येईल.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?
  • ट्रेंट (TRENT)

  • महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा (M&M)

  • भारती एअरटेल (BHARTIARTL )

  • आयटीसी (ITC)

  • बजाज फायनान्स (BAJFINANCE)

  • पर्सिस्टन्ट (PERSISTENT)

  • ए यू बँक (AUBANK)

  • कोफोर्ज (COFORGE)

  • आयडीएफसी फर्स्ट बँक (IDFCFIRSTB)

  • एम फॅसिस (MPHASIS)

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajya Sabha : भाजपचे राज्यसभेचे उमेदवार ठरले, १० नेत्यांची नावे चर्चेत; यादी दिल्लीला पाठवली, कुणाला संधी?

Krishnaraj Mahadik Political Journey : स्पोर्ट्समन, युट्यूबर ते राजकारणी खासदार धनंजय महाडिक पुत्र कृष्णराजचा राजकीय प्रवास

Latest Marathi News Live Update : लासलगावमध्ये शेतकऱ्यांनी कांदा लिलाव बंद पाडले

पवारांच्या राज्यसभेसाठी लेकीची फिल्डिंग! संजय राऊतांशी चर्चा, खर्गे आणि उद्धव ठाकरेंना भेटणार सुप्रिया सुळे

Toll tax on Indian Army: भारतात सैनिकांना टोल टॅक्समधून सूट मिळते का? जाणून घ्या नियम काय सांगतो

SCROLL FOR NEXT