Share Market Today Sakal
Share Market

Share Market Today: आज कोणत्या शेअर्समध्ये गुंतवणूक कराल? काय आहे तज्ज्ञांचा सल्ला?

Share Market Today: काही दिवसांच्या रेंजबाउंड ट्रेडिंगनंतर सोमवारी बुल्सची घोडदौड दिसली आणि मेटल आणि मीडिया वगळता सर्व सेक्टर्समधील खरेदी दरम्यान निफ्टीने इंट्राडे 25,150 ओलांडला. व्यवहाराच्या अखेरीस सेन्सेक्स 591.69 अंकांनी अर्थात 0.73 टक्क्यांनी वाढून 81,973.05 अंकांवर बंद झाला.

राहुल शेळके

Share Market Investment Tips: काही दिवसांच्या रेंजबाउंड ट्रेडिंगनंतर सोमवारी बुल्सची घोडदौड दिसली आणि मेटल आणि मीडिया वगळता सर्व सेक्टर्समधील खरेदी दरम्यान निफ्टीने इंट्राडेने 25,150चा टप्पा ओलांडला. व्यवहाराच्या अखेरीस सेन्सेक्स 591.69 अंकांनी अर्थात 0.73 टक्क्यांनी वाढून 81,973.05 अंकांवर बंद झाला. त्याचप्रमाणे निफ्टी 163.70 अंकांनी म्हणजेच 0.66 टक्क्यांनी वाढून 25,128 वर बंद झाला.

आज कशी असेल शेअर बाजाराची स्थिती?

निफ्टीने गॅपअपसह खुला झाला आणि दिवसभर सकारात्मक ट्रेंडसह व्यवहार होताना दिसला. अखेर 164 अंकांच्या वाढीसह बंद झाला. डेली चार्टवर, तीन दिवसांच्या कंसोलीडेशननंतर निफ्टीने पुन्हा 25500 पर्यंत वाढ सुरू केली आहे, जो खरेदीचा सिग्नल आहे.

अशा स्थितीत, पुढील काही ट्रेडिंग सत्रांमध्ये 25234 - 25360 च्या दिशेने वाढ सुरू राहण्याची अपेक्षा आहे. डाउनसाइडवर 24920 च्या दिशेने सपोर्ट आहे.

बँक निफ्टीही तीन दिवसांच्या कंसोलीडेशनमधून बाहेर पडला आहे आणि आता 52500 च्या दिशेने जात आहे जो त्याच्या 20 दिवसांच्या सरासरीशी जुळतो. त्याचा सपोर्ट बेस 51400 - 51500 च्या दिशेने जात आहे.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?
  • विप्रो (WIPRO)

  • टेक महिन्द्रा (TECHM)

  • एचडीएफसी लाइफ (HDFCLIFE)

  • एचडीएफसी बँक (HDFCBANK)

  • एल अँड टी (LT)

  • फेडरल बँक (FEDERALBNK)

  • एम फॅसिस (MPHASIS)

  • पर्सिस्टंट (PERSISTENT)

  • गोदरेज प्रॉपर्टीज (GODREJPROP)

  • हिंदुस्थान पेट्रोलियम (HINDPETRO)

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Illegal Gender Test : नाव श्रद्धा पण काम अंधश्रद्धा, उमलणाऱ्या कळा खोडणारा डॉक्टर; एजंट ताब्यात, सोनोग्राफी मशीन, गोळ्या जप्त

Pandharpur Vitthal Online Puja Booking : सावळ्या विठ्ठलाची पूजा करायचीय? 'या' तारखेपासून सुरू होतेय ऑनलाईन नोंदणी; जाणून घ्या सविस्तर नियम!

Latest Marathi News Live Update : शरद पवार आज एक दिवसाच्या नागपूर दौऱ्यावर, काय आहे कारण?

'हा कसला फालतूचा अ‍ॅटिट्यूड' काजोल पापाराझींवर भडकल्याने नेटकरी संतापले, Viral Video

Maharashtra kerosene Supply: राज्य सरकारचा रॉकेल पुरवठ्याचा निर्णय; वितरण करणारी व्यवस्था नामशेष, रॉकेल येणार पण स्टोव्हच सापडेना!

SCROLL FOR NEXT