investment call rutvik jadhav global health medanta share price money management Sakal
Share Market

ग्लोबल हेल्थ-मेदांता

मेदांता कंपनी आरोग्यसेवा क्षेत्रातील एक महत्त्वाची कंपनी आहे. कंपनीचे भांडवली बाजारमूल्य १९,९११ कोटी रुपये

सकाळ वृत्तसेवा

- ऋत्विक जाधव

मेदांता कंपनी आरोग्यसेवा क्षेत्रातील एक महत्त्वाची कंपनी आहे. कंपनीचे भांडवली बाजारमूल्य १९,९११ कोटी रुपये आहे. ग्लोबल हेल्थ लिमिटेड (मेदांता) ही देशातील उत्तर आणि पूर्व भागात कार्यरत असलेल्या सर्वांत मोठ्या खासगी मल्टी-स्पेशालिटी केअर सेवा प्रदात्यांपैकी एक आहे.

कार्डिओलॉजी आणि कार्डियाक सायन्स, न्यूरोसायन्स, ऑन्कोलॉजी, डायजेस्टिव्ह आणि हेपॅटोबिलरी सायन्स, ऑर्थोपेडिक्स, लिव्हर, किडनी प्रत्यारोपण, यूरोलॉजी अशा सर्व महत्त्वाच्या क्षेत्रातील उपचार येथे उपलब्ध आहेत. मेदांताची गुरुग्राम, इंदूर, रांची, लखनौ आणि पाटणा येथे पाच रुग्णालये कार्यरत आहेत.

नोएडा येथे एका रुग्णालयाचे बांधकाम सुरू आहे. ही कंपनी ३०हून अधिक वैद्यकीय विभागांमध्ये आरोग्य सेवा प्रदान करते. मेदांताच्या सर्व रुग्णालयांमध्ये एकंदरीत २,४६७ खाटा असून, १३०० पेक्षा जास्त डॉक्टर सेवा देत आहेत. ही कंपनी गुरुग्राम येथील डीएलएफ सायबरसिटी, सुभाष चौक यासह दिल्ली विमानतळ, दक्षिण दिल्ली, दरभंगा, पाटणा येथे सहा मल्टी-स्पेशालिटी क्लिनिकदेखील चालवते.

कंपनीचे विभागवार उत्पन्न

  • हृदयरोग विभाग ः २४.३२ टक्के

  • न्यूरोसायन्स ः ११.८१ टक्के

  • ऑर्थोपेडिक्स ः ५.८३ टक्के

  • मूत्रविज्ञान संस्था ः ७.५५ टक्के

  • कर्करोग संस्था ः ११.९१ टक्के

  • हिपॅटोबिलरी सायन्सेस ः ११.६६ टक्के

  • यकृत प्रत्यारोपण ः ३.६९ टक्के

  • औषध विभाग ः ५.८८ टक्के

  • इतर ः १७.३६ टक्के

डॉक्टरांच्या हाती व्यवस्थापन

कंपनीकडे सहा हजारांहून अधिक वैद्यकीय व्यावसायिक आहेत. ज्यात १३०० हून अधिक डॉक्टर, ३७०० हून अधिक परिचारिका आणि एक हजार पॅरामेडिकल कर्मचारी आहेत. मेदांताने व्यवस्थापनाचे ‘डॉक्टर-नेतृत्व’ मॉडेल स्वीकारले आहे, जेथे रुग्णालयांच्या दैनंदिन कामकाजावर वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ संचालक, सीईओ, सीएमडी आदी पदांवरील प्रमुखांच्या समितीद्वारे देखरेख केली जाते.

तांत्रिक रचना

या शेअरचा चार्ट पॅटर्न इतरांच्या तुलनेत सर्वांत मजबूत आहे. गेल्या काही दिवसांपासून तो मजबूत होण्याची चिन्हे दाखवत असून, त्याने जोरदार ब्रेकआउट दिला आहे. यात जुलै २०२३ पासून तयार होत असलेल्या ‘ब्रेकआउट अबाव्हू मल्टीपल टॉप’ची निर्मिती दिसत असून, जानेवारी २०२३ पासून तो वाढत आहे.

अलीकडेच, शेअरमध्ये आणखी वाढ झाली असून, वाढीची चिन्हे दिसत आहेत. डेरिव्हेटिव्ह डेटादेखील तेजीचा कल दर्शवित आहे. भविष्यातील ‘ओआय’ मध्ये लाँग बिल्डअप दिसून येतो, अल्पावधीतही तो मजबुती दाखवत आहे.

या पार्श्‍वभूमीवर, हा शेअर ७४८ रुपयांच्या आसपास ट्रेडिंग करताना ७४० ते ७५० रुपयांच्या आसपास साप्ताहिक क्लोजिंग आधारावर ७२५ रुपयांचा स्टॉपलॉस लावून खरेदी करणे सुरू ठेवले पाहिजे. येत्या काही दिवसांत या शेअरमध्ये मोठी तेजी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. अल्पावधीसाठी, ८५० रुपये हे आमचे उद्दिष्ट आहे. मध्यम मुदतीसाठी ९०० रुपयांचे उद्दिष्ट आहे. अल्प-मुदतीच्या उद्दिष्टासाठी, ‘रिस्क टू रिवॉर्ड’ गुणोत्तर १:७ आहे. हा शेअर १४ टक्क्यांच्या आसपास नफ्याच्या अपेक्षेसह गुंतवणूक करण्यासाठी उत्तम पर्याय आहे.

शिफारस : खरेदी

सध्याचा भाव : रु. ७४८

स्टॉपलॉस : रु. ७२५

उद्दिष्ट : रु. ९००

(डिस्क्लेमर आणि डिस्क्लोजर ः वरील शिफारस पूर्णपणे तांत्रिक विश्लेषणावर आधारित आहे, जी भविष्यातील किमतीच्या हालचालीचा अंदाज लावण्याचा एक प्रकारचा वैज्ञानिक मार्ग आहे. सर्व गुंतवणूकदारांनी शेअर गुंतवणुकीतील जोखमींबद्दल योग्य माहिती घ्यावी. या शेअरमध्ये व कंपनीमध्ये लेखकाचे कोणतेही वैयक्तिक हितसंबंध नाहीत आणि या शेअरमध्ये गुंतवणूक नाही. तथापि, त्यांच्या क्लायंट्सची काही पोझिशन असू शकते.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India reaction to Sheikh Hasina death sentence : बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या फाशीच्या शिक्षेवर भारताची पहिली प्रतिक्रिया!

Kagal Nagarparishad Election : हसन मुश्रीफ-समरजित घाटगे एकत्र; कागल नगरपरिषद बिनविरोध करण्याचा संकल्प

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अर्ज भरायला जाताना ‘या’ उमेदवारास १०० पोलिसांचा बंदोबस्त; पहाटे ५.३० वाजता उमेदवार नगरपंचायतीत, अनगरची बिनविरोधाची ६५ वर्षांची परंपरा खंडीत

Ladki Bahin Yojana eKYC Deadline Extension: मोठी बातमी! लाडक्या बहिणींना सरकारकडून दिलासा; अखेर eKYC साठी जाहीर केली मुदतवाढ

Crime: सासरा आणि सूनेचं प्रेम जडलं; अडसर ठरणाऱ्या मुलाचा काटा काढला, मात्र एका चुकीनं बाप पोलिसांच्या जाळ्यात अडकला

SCROLL FOR NEXT