Investment Tips in marathi Which 10 shares perform today  Sakal
Share Market

Share Market Today: आज इंट्राडेमध्ये 'या' 10 शेअर्सवर ठेवा लक्ष; मिळेल चांगला नफा, काय आहे तज्ज्ञांचा अंदाज?

Share Market Investment Tips: सुरुवातीच्या ट्रेडिंग सत्रात विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर सोमवारी भारतीय इक्विटी इंडेक्स सपाट बंद झाले. बाजारात प्रचंड चढ-उतार पाहायला मिळाले. ट्रेडिंग सत्राच्या शेवटी सेन्सेक्स 19.89 अंकांनी अर्थात 0.03 टक्क्यांनी घसरून 75,390.50 वर बंद झाला.

राहुल शेळके

Share Market Investment Tips (Marathi News): सुरुवातीच्या ट्रेडिंग सत्रात विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर सोमवारी भारतीय इक्विटी इंडेक्स सपाट बंद झाले. बाजारात प्रचंड चढ-उतार पाहायला मिळाले. ट्रेडिंग सत्राच्या शेवटी सेन्सेक्स 19.89 अंकांनी अर्थात 0.03 टक्क्यांनी घसरून 75,390.50 वर आणि निफ्टी 24.60 अंकांनी म्हणजेच 0.11 टक्क्यांनी घसरून 22,932.50 वर आला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

भारतीय शेअर बाजाराने आठवड्याची सुरुवात 23,039 च्या नवीन उच्चांकाने केली आणि बँकिंग काउंटरच्या नेतृत्वाखाली झालेल्या रॅलीने इंडेक्सने नवीन उच्चांक गाठल्याचे प्रोग्रेसिव्ह शेअर्सचे संचालक आदित्य गग्गर म्हणाले. पण व्यवहाराच्या शेवटी प्रॉफिट बुकींगच्या दबावाने सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगात गेले. अखेर निफ्टी 24.65 अंकांच्या घसरणीसह 22,932.45 वर बंद झाला.

बँकिंग व्यतिरिक्त रिअल्टी सेक्टरने चांगली कामगिरी केली. तर मीडिया आणि पॉवर स्टॉकला सर्वाधिक फटका बसला. निफ्टी 50 इंडेक्सने विक्रमी पातळीवर बियरिश कँडल तयार केली आहे. आदित्य गग्गर यांना विश्वास आहे की निफ्टी 22,780 चा मजबूत सपोर्ट पुन्हा मिळवण्याची शक्यता आहे. तर 23,110 च्या पातळीवर त्याला रझिस्टंसचा सामना करावा लागू शकतो.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

  • अदानी एन्टरप्रायझेस (ADANIENT)

  • विप्रो (WIPRO)

  • ग्रासिम (GRASIM)

  • एसबीआय लाइफ (SBILIFE)

  • ओएनजीसी (ONGC)

  • ऑरो फार्मा (AUROPHARMA)

  • आयडिया (IDEA)

  • पीआय इंडस्ट्रीज लिमिटेड (PIIND)

  • भारत फोर्ज (BHARATFORG)

  • भारतीय कंटेनर निगम (CONCOR)

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पार्किंगपासून ते दुकानाच्या भाड्यापर्यंत...; विमानतळावर सर्व महाग होणार, टीडीएसएटीच्या मोठ्या निर्णयानं टेन्शन वाढवलं

Viral Video : प्रियकरासोबत वारंवार फरार व्हायची पत्नी; घटस्फोट होताच पतीने दुधाने आंघोळ करत जल्लोष साजरा केला अन्...

Latest Marathi News Updates: धुळे जिल्ह्यातील देशशिरवाडे येथे १.५ टन गोमांस जप्त

Pravin Gaikwad Attacked : 'माझ्या हत्येचा कट रचला गेला होता, अन् याला पूर्णपणे जबाबदार..'' ; 'संभाजी ब्रिगेड'च्या प्रवीण गायकवाडांचा मोठा दावा!

Sangli Crime : मोक्कातील सांगलीच्या गुन्हेगाराचा सपासप वार करून खून, अल्पवयीन मुलांचा समावेश; वर्चस्ववाद नडला

SCROLL FOR NEXT