Share Market Investment Tips Sakal
Share Market

Share Market Today: कालच्या घसरणीनंतर आज शेअर बाजारात तेजीचे संकेत? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

Share Market Investment Tips: मंगळवारी सर्व सेक्टर्समधील विक्रीमुळे भारतीय इक्विटी इंडेक्स 1 टक्क्यांनी घसरून बंद झाले. निफ्टी 21800 वर पोहोचला. ट्रेडिंग सत्राच्या शेवटी सेन्सेक्स 736.37 अंकांनी अर्थात 1.01 टक्क्यांनी घसरून 72,012.05 वर बंद झाला.

राहुल शेळके

Share Market Investment Tips (Marathi News): मंगळवारी सर्व सेक्टर्समधील विक्रीमुळे भारतीय इक्विटी इंडेक्स 1 टक्क्यांनी घसरून बंद झाले. निफ्टी 21800 वर पोहोचला. ट्रेडिंग सत्राच्या शेवटी सेन्सेक्स 736.37 अंकांनी अर्थात 1.01 टक्क्यांनी घसरून 72,012.05 वर आणि निफ्टी 238.20 अंकांनी म्हणजेच 1.08 टक्क्यांनी घसरून 21,817.50 वर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

सुरुवातीच्या व्यापारात टीसीएसच्या नेतृत्वाखालील आयटी शेअर्सची विक्री निफ्टीला 21,900 च्या सपोर्टच्या खाली ढकलल्याचे प्रोग्रेसिव्ह शेअर्सचे संचालक आदित्य गग्गर म्हणाले. इतर मोठ्या शेअर्समध्ये विक्री झाल्याने निफ्टीवरील दबाव आणखी वाढला.

आशियाई बाजारांमध्ये जोरदार सुरुवात झाली आहे, सोमवारी अमेरिकेतही बाजार चांगल्या वाढीसह बंद झाला. गिफ्टी सिटीमध्येही चांगली वाढ होण्याची चिन्हे दिसत आहेत. (Investment Tips in marathi Which 10 shares perform today BPCL CIPLA PFC 20 March 2024)

21,900 वर सपोर्ट तोडल्यानंतर, निफ्टी 21,740 वर एडवान्स हार्मोनिक पॅटर्न तयार करण्याच्या मार्गावर आहे ज्याला बुलीश सायफर म्हणून ओळखले जाते. पण पॅटर्न रिव्हर्सलची पुष्टी झाल्यानंतर निफ्टी 22,000 नंतर 22,200 च्या टारगेटची आशा करू शकतो.

बँक निफ्टीमध्ये साइडवेज ट्रेडिंग दिसून आले. बुल्स आणि बेअर्स यांच्यात सुरू असलेल्या अनिश्चिततेचे हे लक्षण आहे.

बँक निफ्टीसाठी 46000 वर सपोर्ट दिसत आहे आणि 47000 वर रझिस्टंस दिसत आहे. बँक निफ्टीची दिशा स्पष्ट होण्यासाठी ही रेंज तोडणे आवश्यक आहे. व्यापाऱ्यांना 46000 च्या स्टॉप-लॉससह घसरणीवर खरेदीचे धोरण वापरण्याचा सल्ला त्यांनी दिला.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

  • टीसीएस (TCS)

  • बीपीसीएल (BPCL)

  • सिप्ला (CIPLA)

  • ब्रिटानिया (BRITANNIA)

  • इंडसइंड बँक (INDUSINDBK)

  • हिंदुस्थान पेट्रोलियम (HINDPETRO)

  • पीएफसी (PFC)

  • एम फॅसिस (MPHASIS)

  • एमआरएफ (MRF)

  • ऑरो फार्मा (AUROPHARMA)

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd T20I: टीम इंडियाचे घालीन लोटांगण! इंग्लंडने ७६ धावांवर श्रेयस अय्यरच्या संघाला गुंडाळले; फलंदाज तोंड लपवताना दिसले

IND vs ENG 3rd T20I: २० चेंडूंत ५ विकेट्स! वैभव सूर्यवंशी बघा कसा OUT झाला! इंग्लंडने सापळा रचून करेक्ट कार्यक्रम केला.. Video

Argentina vs Egypt: थरार, थरार, थरार... मेस्सीची पेनल्टी हुकली तरीही अर्जेंटिनाने पिछाडीवरून मुसंडी मारली; १३ मिनिटांत मॅच फिरवली

IND vs ENG 3rd T20I: फिल सॉल्टची तुफान फटकेबाजी, इंग्लंडचे भारतासमोर तगडे लक्ष्य... प्रिंस यादव, हर्षित राणा चमकले पण...

FDA Raid : दूग्ध प्रक्रिया उद्योगावर FDAचा छापा; भेसळयुक्त दूध केले जप्त

SCROLL FOR NEXT