Share Market Investment Tips Sakal
Share Market

Share Market Today: शेअर बाजारात आजही 'प्रॉफिट बुकिंग' होणार? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

Share Market Investment Tips (Top Shares): मंगळवारी भारतीय बेंचमार्क इंडेक्स सपाट नोटवर बंद झाले. ट्रेडिंग सत्राच्या शेवटी सेन्सेक्स 56.99 अंकांच्या अर्थात 0.07 टक्क्यांच्या घसरणीसह 79,648.92 वर बंद झाला

राहुल शेळके

Share Market Investment Tips: मंगळवारी भारतीय बेंचमार्क इंडेक्स सपाट नोटवर बंद झाले. ट्रेडिंग सत्राच्या शेवटी सेन्सेक्स 56.99 अंकांच्या अर्थात 0.07 टक्क्यांच्या घसरणीसह 79,648.92 वर बंद झाला आणि निफ्टी 20.50 अंकांच्या म्हणजेच 0.08 टक्क्यांच्या घसरणीसह 24,347.00 वर बंद झाला. बीएसई मिडकॅप इंडेक्स सपाट बंद झाला.

तर स्मॉलकॅप इंडेक्स 0.5 टक्क्यांनी वाढून बंद झाला. एफएमसीजी, पॉवर, पीएसयू बँक आणि मीडिया 0.5-2 टक्क्यांनी घसरले. तर बँक, टेलिकॉम, आयटी, ऑइल अँड गॅस, मेटल आणि रियल्टी 0.3-1 टक्क्यांनी वाढून बंद झाले.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

बेंचमार्क इंडेक्समध्ये अस्थिर ट्रेडिंग सत्र दिसल्याचे कोटक सिक्युरिटीजचे श्रीकांत चौहान म्हणाले. निफ्टी 21 अंकांनी घसरून बंद झाला तर सेन्सेक्स 57 अंकांनी घसरला. तांत्रिकदृष्ट्या इंट्राडे विक्रीनंतर, बाजाराने 24200/79200 च्या जवळ सपोर्ट घेतला आणि तिथून जोरदार पुनरागमन केले. पण, ते 24400/79850 च्या रझिस्टंस क्षेत्राच्यावर बंद करण्यात अयशस्वी झाले.

सध्या इंट्राडे मार्केटची दिशा स्पष्ट नसल्याचे श्रीकांत चौहान यांचे मत आहे. त्यामुळे इंट्राडे ट्रेडर्ससाठी लेव्हल बेस्ड ट्रेडींग सर्वोत्तम धोरण असेल. बुल्ससाठी, 24400/79850 हा तात्काळ ब्रेकआउट झोन असेल.

याच्या वर गेल्यास बाजार 24500-24550/80100-80400 पर्यंत वाढू शकतो. दुसरीकडे 24300/79500 च्या खाली घसरण वाढू शकते. याच्या खाली गेल्यास बाजार पुन्हा 24200-24170/79200-79000 या पातळीला स्पर्श करू शकतो.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

  • बीपीसीएल (BPCL)

  • एचडीएफसी बँक (HDFCBANK)

  • एचडीएफसी लाइफ (HDFCLIFE)

  • श्रीराम फायनान्स (SHRIRAMFIN)

  • ओएनजीसी (ONGC)

  • आयडिया (IDEA)

  • पॉसीकॅब (POLYCAB)

  • भारतीय कंटेनर निगम (CONCOR)

  • हिंदुस्थान पेट्रोलियम (HINDPETRO)

  • युनायटेड फॉस्फोरस लिमिटेड (UPL)

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

SCROLL FOR NEXT