Share Market Investment Tips Sakal
Share Market

Share Market Today: शेअर बाजारातील तेजीच्या काळात कोणचे शेअर्स मिळवून देतील नफा? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

Share Market Investment Tips: बुधवारी सुरुवातीच्या तासात बाजारात घसरण झाली होती पण बाजार बंद होण्यापूर्वी शेवटच्या तासात चांगलीच रिकव्हरी झाली. या रिकव्हरीमुळे सेन्सेक्स 278 अंकांनी वाढून 71,833 वर बंद झाला

राहुल शेळके

Share Market Investment Tips: बुधवारी सुरुवातीच्या तासात बाजारात घसरण झाली होती पण बाजार बंद होण्यापूर्वी शेवटच्या तासात चांगलीच रिकव्हरी झाली. या रिकव्हरीमुळे सेन्सेक्स 278 अंकांनी वाढून 71,833 वर बंद झाला, तर निफ्टी 97 अंकांनी वाढून 21,840 वर बंद झाला. बँक निफ्टी 406 अंकांनी वाढून 45,908 वर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

कमकुवत जागतिक संकेतांच्या दरम्यान, बाजारात तेजी होती आणि सुमारे अर्धा टक्का बाजारात वाढ झाली असे रेलिगेअर ब्रोकिंगचे अजित मिश्रा म्हणाले. बुधवारी कंसोलिडेशनचे संकेत मिळाले, जे येत्या काळातही सुरू राहू शकतात. आणखी काही रिबाऊंड झाल्यास, 22,000-22,150 चा झोन निफ्टीसाठी रझिस्टंस म्हणून काम करत राहील.

निफ्टी लाल चिन्हाने उघडल्याचे शेअरखानचे जतीन गेडिया म्हणाले. इंडेक्सला सपोर्ट देण्यासाठी बुल्स वेगाने पुढे आले आणि निफ्टीला 97 अंकांच्या वाढीसह बंद करण्यास मदत केली. डेली चार्टवर, निफ्टीने 21550 - 21530 चा सपोर्ट कायम ठेवला.

बुधवारी दिवसभर खरेदीची लगबग पाहायला मिळाली. आवर्ली चार्टवर निफ्टी फॉलिंग चॅनेलच्या वरच्या टोकाला पोहोचला आहे. यामुळे बाजारामध्ये सकारात्मक कल दिसून येतो. वरच्या बाजूस, निफ्टीसाठी 22000 - 22020 वर रझिस्टंस आहे. तर, 21650 - 21670 च्या झोनमध्ये सपोर्ट दिसत आहे.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

  • बीपीसीएल (BPCL)

  • स्टेट बँक ऑफ इंडिया (SBIN)

  • ओएनजीसी (ONGC)

  • कोल इंडिया (COALINDIA)

  • टाटा स्टील (TATASTEEL)

  • हिंदुस्थान पेट्रोलियम (HINDPETRO)

  • पीएफसी (PFC)

  • ऍस्ट्रल (ASTRAL)

  • गोदरेज प्रॉपर्टीज (GODREJPROP)

  • ज्युबिलंट फूड (JUBLFOOD)

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबई लोकल प्रशासनाचा मोठा निर्णय! रात्री १२ ते सकाळी १० पर्यंत मेगाब्लॉक; अनेक गाड्या रद्द, पण कोणत्या मार्गावर?

Koyna Dam Water Release Update : शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठा दिलासा! कोयनेचा विसर्ग वाढला; पहा किती क्युसेक वेगाने येतंय पाणी?

"माझ्या घरी दोन चिक्स.."! अरे ए माईक सुरूय... ड्वेन ब्राव्होला KKR कॅप्टन अजिंक्य रहाणेने थांबवले... वादग्रस्त Video Viral

Gold Rate Today: सोन्याच्या भावात घसरण कायम! 10 दिवसांत 15 हजारांनी सोनं स्वस्त; पाहा महाराष्ट्रातील आजचे ताजे दर

IPS Aparna Kaushik Video: कोण आहेत IPS अपर्णा कौशिक? १८ लाखांचे पॅकेज सोडून बनल्या 'लेडी सिंघम'; 'बॉडी शेमिंग'मुळे नवा वाद!

SCROLL FOR NEXT