Share Market Investment Tips Sakal
Share Market

Share Market Today: शेअर बाजारातील रेकॉर्ड ब्रेक तेजीत कोणते शेअर्स असतील ॲक्शमध्ये?

Share Market Investment Tips: गुरुवारी अस्थिर सत्रात भारतीय बेंचमार्क इंडेक्स सकारात्मक नोटवर बंद झाले. निफ्टी 22,200 च्या वर राहण्यात यशस्वी झाला. व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स 535.15 अंकांच्या अर्थात 0.74 टक्क्यांच्या वाढीसह 73,158.24 वर बंद झाला.

राहुल शेळके

Share Market Investment Tips In Marathi: गुरुवारी अस्थिर सत्रात भारतीय बेंचमार्क इंडेक्स सकारात्मक नोटवर बंद झाले. निफ्टी 22,200 च्या वर राहण्यात यशस्वी झाला. व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स 535.15 अंकांच्या अर्थात 0.74 टक्क्यांच्या वाढीसह 73,158.24 वर बंद झाला. त्याच वेळी, निफ्टी 162.50 अंकांच्या म्हणजेच 0.74 टक्क्यांच्या वाढीसह 22,217.50 वर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

बाजारातील तेजीचा कल कायम असल्याचे बाजारातील जाणकारांचे म्हणणे आहे. पुढे जाऊन, निफ्टी 22,700 चा नवीन सार्वकालिक उच्चांक स्थापित करताना दिसू शकतो. आयसीआयसीआय सिक्युरिटीजच्या विश्लेषकांचे म्हणणे आहे की, ब्रॉडर मार्केटमध्ये थोडा दीर्घकाळ करेक्शन कालावधी नकारात्मक मानला जाऊ नये. या घसरणीचा उपयोग दर्जेदार शेअर्स खरेदी करण्याची संधी म्हणून करावा. 21,600 च्या पातळीवर निफ्टीला सपोर्ट दिसत असल्याचे ते म्हणाले.

बँक निफ्टी गुरुवारी किंचित घसरणीसह बंद झाला. एलकेपी सिक्युरिटीजचे वरिष्ठ तांत्रिक आणि डेरिव्हेटिव्ह विश्लेषक कुणाल शाह यांचा असा विश्वास आहे की बँक निफी 46,500 च्या खाली येईपर्यंत तेजीची भावना कायम आहे.

डेली चार्टवर लॉन्ग लेग्ड डोजी कँडल तयार करणे हा तेजीचा सिग्नल मानला जातो. अशा स्थितीत निफ्टी बँक आता 48,000 पर्यंत जाण्याची शक्यता आहे.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

  • कोल इंडिया (COALINDIA)

  • बजाज ऑटो (BAJAJ-AUTO)

  • आयशर मोटर्स (EICHERMOT)

  • आयटीसी (ITC)

  • एचसीएल टेक (HCLTECH)

  • कमिन्स इंडिया (CUMMINSIND)

  • इंडियन हॉटेल (INDHOTEL)

  • भारतीय कंटनेर निगम (CONCOR)

  • गोदरेज प्रॉपर्टीज (GODREJPROP)

  • एम फॅसिस (MPHASIS)

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray: आता महाराष्ट्र बंद पाडणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा; थेट पोलीस व्हॅनवर चढून...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माची १८ चेंडूत फिफ्टी अन् रचले तब्बल तीन विश्वविक्रम; सूर्यकुमारलाही टाकलं मागे

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

Maharashtra Live News : जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी; २ नोव्हेंबरला भारत बंदचा निर्णय

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT