Investment Tips Sakal
Share Market

Share Market Today: शेअर बाजाराच्या विशेष सत्रात आज कोणते शेअर्स असतील तेजीत? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

Share Market Investment Tips: भारतीय शेअर बाजार शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी तेजीसह बंद झाले. निफ्टी 22,450 च्या वर बंद झाला आणि ब्रॉडर मार्केट देखील तेजीत राहिला. बीएसई मिडकॅप निर्देशांकाने नवीन विक्रमी उच्चांक गाठला.

राहुल शेळके

Share Market Investment Tips (Marathi News): भारतीय शेअर बाजार शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी तेजीसह बंद झाले. निफ्टी 22,450 च्या वर बंद झाला आणि ब्रॉडर मार्केट देखील तेजीत राहिला. बीएसई मिडकॅप निर्देशांकाने नवीन विक्रमी उच्चांक गाठला, तर बीएसई स्मॉलकॅप त्याच्या सर्वकालीन उच्चांकापासून फक्त 100 अंक दूर आहे. व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स 0.34 टक्क्यांनी वाढून 73,916 अंकांवर बंद झाला.

तर निफ्टी 0.27 टक्क्यांनी वाढून 22,464 च्या पातळीवर बंद झाला. बीएसई मिडकॅप 1.2 टक्क्यांनी वधारला आणि स्मॉलकॅप निर्देशांक 1.4 टक्क्यांनी वधारला. स्टॉक मार्केटमध्ये शनिवारी अर्थात आज स्पेशल सेशनचे आयोजन करण्यात आले आहे.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

यूएस आणि युरोपीय बाजारातील नकारात्मक भावना असूनही सेन्सेक्स आणि निफ्टीने शुक्रवारी आपली वाढ कायम ठेवली असे मेहता इक्विटीजचे प्रशांत तापसे म्हणाले. गुंतवणूकदारांनी देशांतर्गत मूलभूत गोष्टींकडे अधिक लक्ष दिले आणि मेटल, ऑईल अँड गॅस, ऑटो आणि रिऍल्टीमधील स्टॉक्स खरेदी केले. दिवसभर चढ-उतार सुरूच होता.

पण, निवडणुकीच्या काळात गुंतवणूकदारांच्या सावध वृत्तीमुळे गेल्या काही सत्रांमध्ये नफा मर्यादित राहिला आहे. पुढील काही आठवड्यांमध्ये बाजारातील अस्थिरता वाढू शकते, पण बेंचमार्क इंडेक्स, मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये निवडक खरेदी सुरू राहील.

डॉलरच्या तुलनेत रुपयाची तीव्र घसरण ही चांगली बातमी आहे, त्यामुळेच FPIs ने भारतीय बाजारातून मोठ्या प्रमाणात विक्री केली आहे. रुपयातील कोणतीही नवीन घसरण FPI गुंतवणूकदारांना बाजारात परत येण्यासाठी आकर्षित करू शकते.

बँक निफ्टी इंडेक्स 48,000 च्या वर बंद करण्यात यशस्वी झाल्याचे एलकेपी सिक्युरिटीजचे कुणाल शाह म्हणाले. पण 48,200 वर असलेल्या 20-डे मूव्हिंग सरासरी (20-DMA) ओलांडण्यात ते अयशस्वी झाले. ही पातळी ओलांडल्यानंतर इंडेक्स 49,000 च्या दिशेने जाईल, शॉर्ट कव्हरिंगची शक्यता आहे. डाउनसाइडवर, इंडेक्सला 47,600-47,500 च्या पातळीवर त्वरित सपोर्ट आहे. जोपर्यंत इंडेक्स या पातळीच्या वर राहील तोपर्यंत तेजीचा कल कायम राहू शकतो.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

  • महिन्द्रा अँड महिन्द्रा (M&M)

  • ग्रासिम (GRASIM)

  • अल्ट्राटेक सिमेंट (ULTRACEMCO)

  • जेएसडब्ल्यू स्टील (JSWSTEEL)

  • बीपीसीएल (BPCL)

  • भारतीय कंटेनर निगम (CONCOR)

  • कमिन्स इंडिया (CUMMINSIND)

  • ऍस्ट्रल (ASTRAL)

  • हिंदुस्थान पेट्रोलियम (HINDPETRO)

  • ऑरो फार्मा (AUROPHARMA)

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Rankala Lake Case : मुलीची हळद काढण्यापूर्वीच वडिलांनी रंकाळा तलावात उडी घेत संपवलं जीवन; घरापासून अवघ्या 300 मीटरवर घडलं भयंकर

IPL 2026: दुखापतींचं ग्रहण अन् जर-तरचं समीकरण! चेन्नई प्लेऑफमध्ये पोहोचणार का? पाहा संपूर्ण गणित, आज चेन्नई गुजरात आमने सामने

KKR vs MI: 'माहित नाही मैदानात काय सुरूये, संपूर्ण सिजनमध्येच आम्ही...', हार्दिक पांड्या मुंबईच्या पराभवानंतर संतापला

Maharashtra Weather: कोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्रात पुढील ५ दिवस पावसाची शक्यता; मराठवाड्यातही पावसाचा अंदाज..

Latest Marathi News Live Update : विदर्भात उष्णतेच्या लाटेचे उग्र रूप; वर्ध्यात पारा ४७ अंशांवर

SCROLL FOR NEXT