World Economy: 2075मध्ये चीन पहिल्या क्रमांकावर तर अमेरिका सर्वात श्रीमंत असेल, भारत कुठे असणार?

World Top Economy in 51 Years: अमेरिका ही पुढील काही वर्षात सर्वात मोठी अर्थव्यवस्था राहणार नाही असे भाकीत जगभरातील देशांच्या आर्थिक वाढीवर लक्ष ठेवणाऱ्या गोल्डमन सॅक्सने वर्तवले आहे. 2075 पर्यंत चीन आणि भारत अमेरिकेला मागे टाकून जगातील सर्वात मोठी महासत्ता बनतील.
World Top Economy in 2075 US richer than India China Largest Economy after 51 years
World Top Economy in 2075 US richer than India China Largest Economy after 51 years Sakal
Updated on

World Top Economy in 2075: अमेरिका ही पुढील काही वर्षात सर्वात मोठी अर्थव्यवस्था राहणार नाही असे भाकीत जगभरातील देशांच्या आर्थिक वाढीवर लक्ष ठेवणाऱ्या गोल्डमन सॅक्सने वर्तवले आहे. अहवालात म्हटले आहे की, पुढील 51 वर्षांत म्हणजे 2075 पर्यंत चीन आणि भारत अमेरिकेला मागे टाकून जगातील सर्वात मोठी महासत्ता बनतील.

अहवालात असेही म्हटले आहे की चीन आणि भारताचा जीडीपी अमेरिकेपेक्षा जास्त असला तरी संपत्तीच्या बाबतीत दोघेही अमेरिकेच्या मागे राहतील. दोघांची संपत्ती जरी एकत्र केली तरी अमेरिकेच्या जवळपास असणार नाही.

अहवालातील अंदाजे आकडेवारी पाहिल्यास, 2020 ते 2070 या काळात अमेरिकेचा जीडीपी दर दहा वर्षांनी 5 ते 6 ट्रिलियन डॉलरने वाढेल, तर चीनच्या जीडीपीमध्ये या काळात 7 ते 10 ट्रिलियन डॉलर्सची वाढ होईल. भारताच्या जीडीपीमध्ये 2020 ते 2070 दरम्यान प्रत्येक दशकात सर्वाधिक वाढ होईल.

World Top Economy in 2075 US richer than India China Largest Economy after 51 years
Jet Airways: जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांच्या पत्नी अनिता यांचे कर्करोगामुळे निधन; मुंबईत घेतला अखेरचा श्वास

या कालावधीत भारताचा जीडीपी दर दहा वर्षांनी 12-13 ट्रिलियन डॉलरने वाढेल, असा अहवालाचा अंदाज आहे. 2070 ते 2075 दरम्यान जीडीपी वाढीबद्दल बोलायचे झाल्यास, अमेरिकेत 3 ट्रिलियन डॉलर्स, चीनमध्ये सुमारे 4 ट्रिलियन डॉलर्स आणि भारतात सुमारे 5 ट्रिलियन डॉलर्सची वाढ होईल.

गोल्डमन सॅक्सच्या अहवालानुसार 2075 मध्ये चीन जगातील सर्वात मोठी महासत्ता बनेल, तर भारत दुसऱ्या क्रमांकावर असेल. त्याचवेळी अमेरिका तिसऱ्या स्थानावर घसरेल. चीनची अर्थव्यवस्था 57 ट्रिलियन डॉलरवर असेल आणि भारताचे सकल देशांतर्गत उत्पादन (GDP) 52.5 ट्रिलियन डॉलर असेल, तर अमेरिकेचा जीडीपी 51.5 ट्रिलियन डॉलर असेल. सध्या अमेरिकेचा जीडीपी भारताच्या सातपट आहे.

World Top Economy in 2075 US richer than India China Largest Economy after 51 years
Medicine Rate: केंद्र सरकारचा मोठा निर्णय! 41 औषधांच्या किमती होणार कमी, सर्वसामान्यांना मोठा दिलासा

अहवालात असा अंदाज आहे की भारत आणि चीनच्या अर्थव्यवस्था अमेरिकेच्या तुलनेत वेगाने वाढत आहेत, ज्याचा परिणाम येत्या काही वर्षांत दिसून येईल. सध्या अमेरिकेचा जीडीपी 21.8, चीनचा 15.5 आणि भारताचा जीडीपी 2.8 ट्रिलियन डॉलर आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.