Share Market Today Sakal
Share Market

Share Market Today: आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग दिवशी 'या' शेअर्समध्ये कमाईची संधी; काय आहे तज्ज्ञांचा अंदाज?

Share Market Investment Tips (Top Shares): गुरुवारी अर्थात एक्स्पायरीच्या दिवशी सेन्सेक्स 570 अंकांनी वाढला. त्याच वेळी, निफ्टी 24,000 च्या वर बंद झाला. गुरुवारी आयटी शेअर्समध्ये जोरदार वाढ दिसून आली. भारतीय बेंचमार्क इंडेक्स विक्रमी उच्चांकावर बंद झाले.

राहुल शेळके

Share Market Investment Tips: गुरुवारी अर्थात एक्स्पायरीच्या दिवशी सेन्सेक्स 570 अंकांनी वाढला. त्याच वेळी, निफ्टी 24,000 च्या वर बंद झाला. गुरुवारी आयटी शेअर्समध्ये जोरदार वाढ दिसून आली. भारतीय बेंचमार्क इंडेक्स विक्रमी उच्चांकावर बंद झाले.

निफ्टी गुरुवारी पहिल्यांदा 24,000 पार करताना दिसला. व्यवहाराच्या सत्राच्या शेवटी सेन्सेक्स 568.93 अंकांनी अर्थात 0.72 टक्क्यांनी वाढून 79,243.18 वर आणि निफ्टी 175.70 अंकांनी म्हणजेच 0.74 टक्क्यांनी वाढून 24,044.50 वर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

भारतीय इक्विटी मार्केटने गुरुवारी मंथली एक्स्पायरीच्या दिवशी जोरदार सुरुवात केली आणि त्याचा वेग कायम ठेवल्याचे प्रोग्रेसिव्ह शेअर्सचे संचालक आदित्य गग्गर म्हणाले. बँकिंग काउंटर तेजीत राहिले पण मिड आणि स्मॉलकॅप सेगमेंटमध्ये अचानक घट झाल्याने इंडेक्स खाली गेले. पण, आयटी काउंटर बचावासाठी आले आणि निफ्टीला 24,000 चा अडथळा पार करण्यास मदत केली. निफ्टी 175.70 अंकांच्या वाढीसह 24,044.50 वर बंद झाला.

मिड आणि स्मॉलकॅप्सने पुन्हा एकदा आघाडीच्या इंडेक्सपेक्षा कमकुवत कामगिरी केली. डेली चार्टवर, निफ्टीने सलग चौथ्या सत्रात बुलिश कँडल तयार केली आहे जी ओवरस्ट्रेच्ड अपमूव्हचे संकेत आहे. घसरणीवर खरेदी करणे हे यावेळी सर्वोत्तम धोरण असेल. आता निफ्टीसाठी 24,240 वर रझिस्टंस आहे. तर 23800 वर मजबूत सपोर्ट दिसत आहे.

बँक निफ्टी इंडेक्समध्ये चढ-उतार दिसून आल्याचे एलकेपी सिक्युरिटीजचे कुणाल शाह म्हणाले. 52,700 वर सपोर्ट आणि 53,100 वर रझिस्टंस एका मोठ्या रेंजमध्ये ट्रेडींग दिसून आली. 53,400/53,700 च्या टारगेटकडे जाण्यासाठी इंडेक्सला 53,000 वर कायम राहावे लागेल. पण, बँक निफ्टी ओव्हरबॉट झोनमध्ये ट्रेड करत आहे. अशा परिस्थितीत, जर तो 53,000 च्या वर टिकून राहण्यात अपयशी ठरला तर 52,500/52,000 पातळीपर्यंत घसरु शकतो.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

  • अल्ट्राटेक सिमेंट (ULTRACEMCO)

  • एटी माइंडट्री लिमिटेड (LTIM)

  • ग्रासिम (GRASIM)

  • एनटीपीसी (NTPC)

  • विप्रो (WIPRO)

  • आयडिया (IDEA)

  • कमिन्स इंडिया (CUMMINSIND)

  • पर्सिस्टंट (PERSISTENT)

  • कोफोर्ज (COFORGE)

  • गोदरेज प्रॉपर्टीज (GODREJPROP)

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT