Share Market Investment Tips Sakal
Share Market

Share Market Today: शेअर बाजारातील घसरणीच्या सत्रात कोणते शेअर्स मिळवून देतील नफा?

Share Market Investment Tips: बुधवारी बाजारात गेल्या दीड वर्षांतील सर्वात मोठी एकदिवसीय घसरण पाहायला मिळाली. या घसरणीत निफ्टी 21,600 च्या खाली आला आहे. व्यवहाराच्या शेवटी, सेन्सेक्स 1,628.01 अंकांनी अर्थात 2.23 टक्क्यांनी घसरून 71,500.76 वर बंद झाला.

राहुल शेळके

Share Market Investment Tips: बुधवारी बाजारात गेल्या दीड वर्षांतील सर्वात मोठी एकदिवसीय घसरण पाहायला मिळाली. या घसरणीत निफ्टी 21,600 च्या खाली आला आहे. व्यवहाराच्या शेवटी, सेन्सेक्स 1,628.01 अंकांनी अर्थात 2.23 टक्क्यांनी घसरून 71,500.76 वर बंद झाला. त्याच वेळी, निफ्टी 460.30 अंकांनी म्हणजेच 2.09 टक्क्यांनी घसरून 21,572 वर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

बेअर्सने पूर्ण ताकदीने हल्ला केला आणि बुधवारच्या व्यवहारावर वर्चस्व गाजवल्याचे प्रोग्रेसिव्ह शेअर्सचे संचालक आदित्य गग्गर यांनी सांगितले. व्यवहाराच्या शेवटी निफ्टी 460.35 अंकांच्या घसरणीसह 21,571.95 वर बंद झाला. ब्रॉडर मार्केटमध्येही करेक्शन दिसून आले पण मिड आणि स्मॉलकॅप्सने आघाडीच्या इंडेक्सना मागे टाकले.

बँकिंग शेअर्सना सर्वाधिक फटका बसला. बँक निफ्टीमध्ये हेड अँड शोल्डर फॉर्मेशनपासून ब्रेकडाउन दिसून आले आहे. या पॅटर्ननुसार बँक निफ्टीचे डाउनसाइड टार्गेट 45,500 वर येते. ही मोठी घसरण लक्षात घेता, बाजारात दिलासादायक तेजी अपेक्षित आहे, पण बाजार वरच्या पातळीवर टिकेल का हे पाहणे बाकी आहे.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

  • एचडीएफसी बँक (HDFCBANK)

  • टाटा स्टील (TATASTEEL)

  • कोटक बँक (KOTAKBANK)

  • ऍक्सिस बँक (AXISBANK)

  • हिन्दाल्को (HINDALCO)

  • भारतीय कंटेनर निगम लिमिटेड (CONCOR)

  • आयडीएफसी फर्स्ट बँक (IDFCFIRSTB)

  • एचडीएफसी ऍसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड (HDFCAMC)

  • ए यू बँक (AUBANK)

  • ऑरो फार्मा (AUROPHARMA)

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT