Investment Tips in marathi Which 10 shares perform today  Sakal
Share Market

Share Market Today: शेअर बाजारातील तेजी आजही कायम राहील का? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

Share Market Investment Tips: सोमवारी भारतीय शेअर बाजार तेजीसह बंद झाला. मागील ट्रेडिंग सत्रातील तोटा वसूल करत निफ्टी 22,600 च्या वर बंद झाला. व्यवहाराच्या शेवटी, सेन्सेक्स 941.12 अंकांच्या अर्थात 1.28 टक्क्यांच्या वाढीसह 74,671.28 वर बंद झाला.

राहुल शेळके

Share Market Investment Tips (Marathi News): सोमवारी भारतीय शेअर बाजार तेजीसह बंद झाला. मागील ट्रेडिंग सत्रातील तोटा वसूल करत निफ्टी 22,600 च्या वर बंद झाला. व्यवहाराच्या शेवटी, सेन्सेक्स 941.12 अंकांच्या अर्थात 1.28 टक्क्यांच्या वाढीसह 74,671.28 वर बंद झाला. त्याच वेळी, निफ्टी 223.40 अंकांच्या म्हणजेच 1 टक्क्यांच्या वाढीसह 22,643.40 वर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

आता निफ्टी 22,800-22,850 च्या दिशेने जाण्याची शक्यता असल्याचे एलकेपी सिक्युरिटीजचे रुपक डे म्हणाले. निफ्टीची वाढ कायम राहिली आणि तो मजबूत वाढीसह बंद झाला. निफ्टी 21 ईएमएच्या वर राहिला जो तेजीचा ट्रेंड चालू ठेवण्याचे संकेत आहे.

मोमेंटम इंडिकेटर आरएसआय तेजीचा क्रॉसओव्हर दाखवत आहे. निफ्टीला 22,550 वर सपोर्ट दिसत आहे. लवकरच आपण निफ्टी 22,800-22,850 च्या दिशेने जाताना पाहू शकतो.

निफ्टी 22,770 च्या दिशेने जाण्यासाठी तयार असल्याचे प्रोग्रेसिव्ह शेअर्सचे संचालक आदित्य गग्गर म्हणाले. आयसीआयसीआय आणि ॲक्सिस बँकेमुळे निर्देशांकात वाढ झाली. जसजसा दिवस पुढे सरकत गेला तसतसा पीएसयू बँकाही वाढीत सहभागी झाल्या.

व्यवहाराच्या सत्राअखेर निफ्टी 223.45 अंकांच्या वाढीसह 22,643.40 वर बंद झाला. निफ्टीने 22,600 वर त्याचा रझिस्टंस ओलांडला आहे आणि 22,770 च्या त्याच्या पूर्वीच्या उच्चांकाकडे वाटचाल करण्यासाठी सज्ज आहे, तर खालचा सपोर्ट आता 22,460 कडे सरकला आहे.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

  • आयसीआयसीआय बँक (ICICIBANK)

  • इंडसइंड बँक (INDUSINDBK)

  • स्टेट बँक ऑफ इंडिया (SBIN)

  • अल्ट्राटेक सिमेंट (ULTRACEMCO)

  • ऍक्सिस बँक (AXISBANK)

  • ए यू बँक (AUBANK)

  • हिंदुस्थान पेट्रोलियम (HINDPETRO)

  • इंडियन हॉटेल (INDHOTEL)

  • एम फॅसिस (MPHASIS)

  • फेडरल बँक (FEDERALBNK)

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhishek Sharma Health Update: अभिषेक संघासोबत स्टेडियममध्ये दिसला, पण का नाही खेळला? पाकिस्तानविरुद्ध खेळणार की नाही? BCCI ने दिले महत्त्वाचे अपडेट्स

जिनिलियाला पहिल्यांदा घरात पाहिल्यावर काय होती विलासराव देशमुखांची प्रतिक्रिया? रितेशने सांगितला तो प्रसंग

Latest Marathi News Live Update : संजय राऊत यांनी डोळ्यावर पट्टी बांधली का हे पाहावे लागेल - संदीप देशपांडे

Pune Cyber Fraud : पुण्यात आरटीओच्या बनावट चलनाद्वारे व्यावसायिकाची सायबर फसवणूक; तीन लाखांचा गंडा

T20 World Cup IND vs NAM : अभिषेक शर्मा मुकला, टीम इंडियाने प्लेइंग इलेव्हनमध्ये केले दोन बदल; नामिबियाने टॉस जिंकून....

SCROLL FOR NEXT