Share Market Investment Tips Sakal
Share Market

Share Market Today: शेअर बाजारात आज खरेदी होणार की विक्री? 'या' शेअर्सवर ठेवा लक्ष

Share Market Investment Tips: कमकुवत जागतिक संकेतांमुळे मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला. सेन्सेक्स-निफ्टी जवळपास 0.5 टक्क्यांनी घसरले. मंगळवारी सर्वात मोठी घसरण रियल्टी, इन्फ्रा इंडेक्समध्ये झाली तर आयटी, बँकिंग आणि मेटल शेअर्स दबावाखाली बंद झाले.

राहुल शेळके

Share Market Investment Tips (Marathi News): कमकुवत जागतिक संकेतांमुळे मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला. सेन्सेक्स-निफ्टी जवळपास 0.5 टक्क्यांनी घसरले. मंगळवारी सर्वात मोठी घसरण रियल्टी, इन्फ्रा इंडेक्समध्ये झाली तर आयटी, बँकिंग आणि मेटल शेअर्स दबावाखाली बंद झाले.

व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स 456 अंकांनी घसरला आणि 72,944 वर बंद झाला. त्याचवेळी निफ्टी 125 अंकांनी घसरून 22,148 च्या पातळीवर बंद झाला. बँक निफ्टी 288 अंकांनी घसरून 47,485 वर बंद झाला. मिडकॅप निर्देशांक 44 अंकांनी घसरून 49,237 वर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

निफ्टी 21,930 च्या सपोर्टसह 22,400 पर्यंत वाढताना दिसत असल्याचे एलकेपी सिक्युरिटीजचे रूपक डे म्हणाले. तांत्रिकदृष्ट्या, निर्देशांक 21 इएमएच्या खाली आल्याने कल कमकुवत झाला आहे.

पण तीव्र घसरणीनंतर, निफ्टीला 21,930-22,030 बँडमध्ये शॉर्ट टर्म सपोर्ट मिळू शकेल. हा सपोर्ट कायम ठेवला नाही तर बाजारात तणाव वाढू शकतो. वरच्या बाजूने, निफ्टीसाठी 22,400च्या पातळीवर शॉर्ट टर्म रझिस्टंस दिसून येत आहे.

बँक निफ्टी 47,300 च्या खाली गेल्यास विक्री आणखी वाढू शकते असे एलकेपी सिक्युरिटीजचे कुणाल शाह म्हणाले. अस्थिर सुरुवातीनंतर, बँक निफ्टी इंडेक्सने ट्रेडिंग सत्राच्या शेवटच्या भागात रिकव्हरी पाहिली आणि 47,500 वर असलेल्या त्याच्या 20-डे मूव्हिंग ॲव्हरेजवर (20DMA) बंद करण्यात यशस्वी झाला.

जर इंडेक्स 47,500-47,400 च्या मर्यादेच्या वर राहिला तर तो 48,000 पातळीच्या दिशेने पुलबॅक दिसू शकतो. क्लोजिंग बेसिसवर 47,300 च्या खाली ब्रेक केल्यास विक्रीचा आणखी दबाव वाढू शकतो. ज्यामुळे बँक निफ्टी 46,500 च्या पातळीपर्यंत खाली जाऊ शकतो.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

  • इन्फोसिस (INFY)

  • एल टी माइंडट्री लिमिटेड (LTIM)

  • इंडसइंड बँक (INDUSINDBK)

  • बजाज फिनसर्व्ह (BAJAJFINSV)

  • विप्रो (WIPRO)

  • एम फॅसिस (MPHASIS)

  • कोफोर्ज (COFORGE)

  • पर्सिस्टंट (PERSISTENT)

  • ए यू बँक (AUBANK)

  • इंडियन हॉटेल (INDHOTEL)

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur : शेतकऱ्यानं म्हशी घ्यायला ७ लाख साठवले, सहावीत शिकणाऱ्या लेकानं गेमवर ५ लाख उडवले; बँक स्टेटमेंट बघून बसला धक्का

India Vs England : दुसऱ्या कसोटीतील लाजीरवाण्या पराभवानंतर इंग्लंडचा मोठा निर्णय, 'या' वेगवान गोलंदाजाचा केला संघात समावेश

Weekly Astrology 7 to 13 July 2025: या आठवड्यात कोणत्या राशींना होणार आर्थिक लाभ अन् नोकरी व्यवसायत मिळेल उत्तम संधी, वाचा साप्ताहिक राशिभविष्य

Latest Maharashtra News Updates : मुंबईत वाहतूक ठप्प! मोनो रेल सेवा बंद, मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाडाने प्रवाशांचे हाल

Global Club Championship: पाकिस्तानला डावलण्याची शक्यता; जागतिक क्लब अजिंक्यपद स्पर्धा : पाच संघांचा सहभाग

SCROLL FOR NEXT