Share Market Today Sakal
Share Market

Share Market Today: आज कसा असेल शेअर बाजार? कोणत्या शेअर्समध्ये गुंतवणूक करावी, जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

Share Market Investment Tips (Top Shares): मंगळवारच्या सत्रात भारतीय शेअर बाजार सपाट बंद झाला. दिवसाखेरीस सेन्सेक्स 33.49 अंकांनी म्हणजे 0.04 टक्क्यांनी घसरून 76,456.59 वर बंद झाला. तर दुसरीकडे निफ्टी 5.60 अंकांनी म्हणजे 0.02 टक्क्यांनी वधारून 23,264.80 वर बंद झाला.

राहुल शेळके

Share Market Investment Tips: मंगळवारच्या सत्रात भारतीय शेअर बाजार सपाट बंद झाला. दिवसाखेरीस सेन्सेक्स 33.49 अंकांनी म्हणजे 0.04 टक्क्यांनी घसरून 76,456.59 वर बंद झाला. तर दुसरीकडे निफ्टी 5.60 अंकांनी म्हणजे 0.02 टक्क्यांनी वधारून 23,264.80 वर बंद झाला.

निफ्टी 50 मधील ONGC, L&T, अदानी पोर्ट्स, मारुती सुझुकी आणि टाटा मोटर्स हे शेअर्स कालच्या सत्रात टॉप गेनर्स राहिले तर तर, कोटक महिंद्रा बँक, डॉ. रेड्डीज लॅब्स, एशियन पेंट्स, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि डिव्हिस लॅब्स हे टॉप लूजर्स होते.

सेक्टोरिअल इंडेक्सवर नजर टाकल्यास बँक, एफएमसीजी, हेल्थकेअर आणि मेटल शेअर्समध्ये विक्री दिसून आली. तर कॅपिटल गुड्स, ऑइल अँड गॅस आणि रियल्टीमध्ये 1-1 टक्के वाढ झाली.

आज 12 जून रोजी कशी असेल बाजाराची स्थिती?

एचडीएफसी सिक्युरिटीजचे नागराज शेट्टी यांच्या मते, निफ्टीतील चढ-उतार मंगळवारच्या सत्रातही सुरु होते. दिवसाखेरीस शेवटी बाजार पॉझिटिव्ह ट्रेंडसह सपाट बंद झाला. डेली चार्टवर, निफ्टीने निगेटिव्ह कँडल तयार केली आहे.

नुकत्याच झालेल्या तेजीनंतर गेल्या दोन ट्रेडिंग सत्रांमध्ये बाजारात दिसून आलेली अशी रचना म्हणजे अल्पावधीत बाजारात थोडीशी घसरण होण्याची शक्यता दर्शवणारी आहे. निफ्टीवर 23400-23500 या लेव्हल वर रेझिस्टन्स तर खाली 23050 लेव्हलवर सपोर्ट पाहायला मिळतोय.

आज 'या' शेअर्सवर ठेवा लक्ष

  • आयआरसीटीसी (IRCTC)

  • गेल (GAIL)

  • आयआरएफसी (IRFC)

  • बॉश लिमिटेड (BOSCHLTD)

  • आयओसी (IOC)

  • कॉनकॉर (CONCOR)

  • अशोक लेलँड (ASHOKLEY)

  • आयडिया (IDEA)

  • पॉलिकॅब (POLYCAB)

  • एस्ट्रल (ASTRAL)

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गॅस अन् तेल कधी स्वस्त होईल? अमेरिका-इराण युद्ध संपायला किती वेळ लागेल?

आरोग्याचे ‘बाळ’कडू : थायराॅइडविषयक आजार

Koyna Dam: शासनाचा मोठा निर्णय! कोयना धरणातील पाणी उपशावर बंदी; परिस्थिती चिंताजनक, ३१ ऑगस्टपर्यंत पिण्याच्या पाण्याला प्राधान्य

ढिंग टांग : बैठकीची मसलत..!

Shiv Sena UBT: ठाकरेंच्या शिवसेनेत फूट पडणार?; ‘ऑपरेशन टायगर’ची पुन्हा चर्चा; पक्ष एकसंध असल्याचा राऊतांचा दावा

SCROLL FOR NEXT