Share Market Investment Tips Sakal
Share Market

Share Market Today: शेअर बाजारात भरघोस नफा कमावण्याची मोठी संधी; आज 'या' शेअर्सवर ठेवा लक्ष

Share Market Investment Tips (Top Shares): भारतीय शेअर बाजार गुरुवारी सलग चौथ्या व्यापार सत्रात वाढीसह बंद झाला. निफ्टी इंट्राडे 24,800 वर पोहोचला. ट्रेडिंग सत्राच्या शेवटी सेन्सेक्स 626.91 अंकांनी अर्थात 0.78 टक्क्यांनी वाढून 81,343.46 वर बंद झाला.

राहुल शेळके

Share Market Investment Tips: भारतीय शेअर बाजार गुरुवारी सलग चौथ्या व्यापार सत्रात वाढीसह बंद झाला. निफ्टी इंट्राडे 24,800 वर पोहोचला. ट्रेडिंग सत्राच्या शेवटी सेन्सेक्स 626.91 अंकांनी अर्थात 0.78 टक्क्यांनी वाढून 81,343.46 वर आणि निफ्टी 187.80 अंकांनी म्हणजेच 0.76 टक्क्यांनी वाढून 24,800.80 वर बंद झाला.

सेक्टर्सचा विचार केल्यास बँक, ऑटो, आयटी, एफएमसीजी आणि टेलिकॉम 0.3-2 टक्क्यांनी वधारले, तर कॅपिटल गुड्स, मेटल, पॉवर, मीडिया 1-3.5 टक्क्यांनी घसरले. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप इंडेक्स प्रत्येकी 1 टक्क्यांनी घसरले.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

गुरुवारी सकाळच्या व्यवहारात बरीच अस्थिरता होती आणि इंडेक्स दोन्ही दिशेने वळत होता असे प्रोग्रेसिव्ह शेअर्सचे संचालक आदित्य गग्गर यांनी सांगितले.

दुपारच्या सत्रापासून, एफएमसीजी आणि आयटी शेअर्सच्या खरेदीमुळे निफ्टीमध्ये एकतर्फी वाढ झाली आणि अखेरीस निफ्टी 187.85 अंकांच्या वाढीसह 24,800.85 या नवीन विक्रमी उच्चांकावर बंद झाला.

क्षेत्रीय आघाडीवर, मीडिया दिवसअखेर 3 टक्क्यांहून अधिक घसरला आणि त्यापाठोपाठ मेटल सेक्टर राहिले. स्मॉलकॅप आणि मिडकॅप शेअर्समध्ये रिकव्हरी दिसून आली. मिड आणि स्मॉलकॅप 0.96 टक्के आणि 1.22 टक्क्यांनी घसरले.

मागील कँडल घेरून, इंडेक्सने एक मोठी ग्रीन कँडल तयार केली आहे, जी बुल्सच्या मजबूत पुनरागमनाचे संकेत देत आहे. आता 25,000 ची पातळी निफ्टीसाठी रझिस्टंस म्हणून काम करेल. तर खालच्या स्तरावर त्याला 24,500 सपोर्ट दिसत आहे.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

  • एलटी माइंडट्री (LTIM)

  • ओएनजीसी (ONGC)

  • टिसीएस (TCS)

  • विप्रो (WIPRO)

  • बजाज फिनसर्व्ह (BAJAJFINSV)

  • पर्सिस्टंट (PERSISTENT)

  • कोफोर्ज (COFORGE)

  • एचडीएफसी ऍसेट मॅनेजमेंट कंपनी (HDFCAMC)

  • एम फॅसिस (MPHASIS)

  • पीआय इंडस्ट्रीज (PIIND)

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tatya Tope Letter: तात्या टोपेंची सही असलेलं 1857 चं पत्र सापडलं; ऐतिहासिक क्रांतीचं गुपित झालं उघड

९० वर्षीय महिलेला दिलासा, २० वर्षे सुनावणी घेऊ नये म्हणणाऱ्या हायकोर्टानं बदलला आदेश, दिली पुढची तारीख

Latest Marathi News Live Update : गडचिरोली जिल्ह्यातील सर्वात मोठा मेडिगट्टा लक्ष्मी धरण 70% कोरडं

IPL 2026: ऑरेंज असो वा पर्पल कॅप, SRH चेच खेळाड़ू आहेत सध्या ऑन टॉप; पाहा सर्वाधिक धावा अन् विकेट्स घेणारे ५ खेळाडूंची लिस्ट

Vedanta Share: एका दिवसात Vedanta कंपनीचे शेअर्स तब्बल 62 टक्यांनी घसरले! नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT