Share Market Today Sakal
Share Market

Share Market Today: या आठवड्यात कोणत्या शेअर्समध्ये कमाईची संधी? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

Share Market Investment Tips (Top Shares): शुक्रवारी अर्थात 21 जूनला अत्यंत अस्थिर व्यापार सत्रात भारतीय बेंचमार्क इंडेक्समध्ये घसरण झाली. निफ्टी 23,500 च्या आसपास बंद झाला. ट्रेडिंग सत्राच्या शेवटी सेन्सेक्स 269.03 अंकांच्या अर्थात 0.35 टक्क्यांच्या घसरणीसह 77,209.90 वर बंद झाला

राहुल शेळके

Share Market Investment Tips: शुक्रवारी अर्थात 21 जूनला अत्यंत अस्थिर व्यापार सत्रात भारतीय बेंचमार्क इंडेक्समध्ये घसरण झाली. निफ्टी 23,500 च्या आसपास बंद झाला. ट्रेडिंग सत्राच्या शेवटी सेन्सेक्स 269.03 अंकांच्या अर्थात 0.35 टक्क्यांच्या घसरणीसह 77,209.90 वर बंद झाला आणि निफ्टी 65.90 अंकांच्या म्हणजेच 0.2 टक्क्यांच्या घसरणीसह 23,501.10 वर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

बँक निफ्टी इंडक्समध्ये अस्थिर व्यवसाय दिसून आला, पण तो एका फ्लॅट नोटवर बंद झाल्याचे एलकेपी सिक्युरिटीज कुणाल शाह म्हणाले. बँक निफ्टीसाठी 52,000 वर रझिस्टंस दिसत आहे. या स्तरावर, कॉल साइडवर जास्तीत जास्त ओपन इंटरेस्ट दिसून येत आहे.

इंडेक्सला त्याचा वरचा कल सुरू ठेवण्यासाठी यावर मात करणे आवश्यक आहे. त्याच वेळी, डाउनसाइडवर 51,000 वर सपोर्ट आहे जेथे पुट साइडवर जास्तीत जास्त ओपन इंटरेस्ट राहील. जर बँक निफ्टी या सपोर्ट लेव्हलच्या दिशेने घसरला तर त्याकडे खरेदीची संधी म्हणून पाहिले पाहिजे असेही ते म्हणाले.

कमकुवत जागतिक संकेतांमुळे 6 ट्रेडिंग सत्रांच्या वाढीनंतर गुंतवणूकदारांनी शुक्रवारी आंशिक नफा बुक केल्याचे मेहता इक्विटीजचे प्रशांत तपासे म्हणाले. जुलैचा केंद्रीय अर्थसंकल्प बाजारासाठी सर्वात मोठा ट्रिगर असेल. अर्थसंकल्प बाजारपेठेला अनुकूल असेल अशी गुंतवणूकदारांना आशा आहे.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

  • अल्ट्राटेक सिमेंट (ULTRACEMCO)

  • अदानी एन्टरप्रायझेस (ADANIENT)

  • एल अँड टी (LT)

  • नेसले इंडिया (NESTLEIND)

  • टाटा मोटर्स (TATAMOTORS)

  • हिंदुस्थान पेट्रोलिमय (HINDPETRO)

  • भारत फोर्ज (BHARATFORG)

  • फेडरल बँक (FEDERALBNK)

  • पीआय इंडस्ट्रीज (PIIND)

  • एमआरएफ (MRF)

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT