Share Market Latest Update Sakal
Share Market

Share Market Today: आज आरबीआयच्या निर्णयावर बाजाराची नजर; कोणते शेअर्स असतील तेजीत?

Share Market Investment Tips (Top Shares): बुधवारी भारतीय बेंचमार्क इंडेक्स तेजीसह बंद झाले. आरबीआयच्या पॉलिसीपूर्वी निफ्टी 24300 च्या आसपास बंद झाला होता. ट्रेडिंग सत्राच्या शेवटी, सेन्सेक्स 874.94 अंकांनी अर्थात 1.11 टक्क्यांनी वाढून 79,468.01 वर बंद झाला.

राहुल शेळके

Share Market Investment Tips: बुधवारी भारतीय बेंचमार्क इंडेक्स तेजीसह बंद झाले. आरबीआयच्या पॉलिसीपूर्वी निफ्टी 24300 च्या आसपास बंद झाला होता. ट्रेडिंग सत्राच्या शेवटी, सेन्सेक्स 874.94 अंकांनी अर्थात 1.11 टक्क्यांनी वाढून 79,468.01 वर आणि निफ्टी 305 अंकांनी म्हणजेच 1.27 टक्क्यांनी वाढून 24,297.50 वर बंद झाला.

बुधवारी सर्व सेक्टरल इंडेक्स हिरव्या रंगात बंद झाले. ज्यामध्ये मेटल, हेल्थ सर्व्हिसेस, मीडिया, पॉवर, टेलीकॉम, ऑइल अँड गॅस आणि कॅपिटल गुड्समध्ये 2-3 टक्के वाढ झाली. बीएसई मिडकॅप इंडेक्स आणि स्मॉलकॅप इंडेक्स 2 टक्क्यांहून अधिक वाढले आहेत.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

मजबूत सुरुवातीनंतर निफ्टीने छोट्या रेंजमध्ये वाटचाल सुरू ठेवली आणि शेवटी 304.95 अंकांच्या वाढीसह 24,297.05 च्या पातळीवर बंद झाल्याचे प्रोग्रेसिव्ह शेअर्सचे संचालक आदित्य गग्गर यांनी सांगितले.

सर्व सेक्टर्स हिरव्या रंगात बंद झाले, मेटल आणि मीडियाने सर्वोत्तम कामगिरी केली. मिड आणि स्मॉल कॅप अनुक्रमे 2.45 टक्के आणि 2.86 टक्क्यांनी वाढले. त्यांनी बेंचमार्क इंडेक्सपेक्षा चांगली कामगिरी केली.

निफ्टी 50 ने बुधवारी ग्रीन कँडल तयार केली आहे, पण त्याचा लॉन्ग लेग्ड डोजी पॅटर्न अजूनही बाजाराची दिशा स्पष्ट नसल्याचे दर्शवत आहे. आदित्य यांचा विश्वास आहे की जोपर्यंत निफ्टी 23,960 ची सपोर्ट लेव्हल कायम ठेवतो तोपर्यंत त्याला 24,550 आणि नंतर 24,700 वर जाण्याची शक्यता आहे.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

  • ओएनजीसी (ONGC)

  • कोल इंडिया (COALINDIA)

  • अदानी एन्टरप्रायझेस (ADANIENT)

  • अदानी पोर्ट्स (ADANIPORTS)

  • पॉवरग्रीड (POWERGRID)

  • कमिन्स इंडिया (CUMMINSIND)

  • पॉलीकॅब (POLYCAB)

  • लुपिन लिमिटेड (LUPIN)

  • ऑरोफार्मा (AUROPHARMA)

  • पीआय इंडस्ट्रीज लिमिटेड (PIIND)

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : पुण्यात महात्मा गांधीजींच्या पुतळ्याचे शिर उडवण्याचा प्रयत्न; एकाला पोलिसांनी घेतले ताब्यात

Lottery Scam : लॉटरीच्या नावाखाली दाम्पत्याने 600 लोकांना 40 कोटींचा घातला गंडा; लोकांनी 5 ते 10 लाखांपर्यंत केली होती गुंतवणूक

Maharashtra Rain Update News : राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस, पुढील पाच दिवस महत्वाचे; ११ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी

IT Park:'जमीन पसंत पडेना, आयटी पार्क होईना'; प्रशासनाचा कागदी खेळ, कृषि महाविद्यालयला पर्यायी प्रस्ताव मान्य नाही

Indian Railways: मिनिटाला निघणार दीड लाख तिकिटे; रेल्वे प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय,आरक्षण केंद्रातील यंत्रणेत बदल

SCROLL FOR NEXT