Share Market Investment Tips Sakal
Share Market

Share Market Today: शेअर बाजार उघडताच 'हे' 10 शेअर्स असतील अ‍ॅक्शनमध्ये; काय सांगतात तज्ज्ञ?

Share Market Investment Tips: भारतीय बेंचमार्क इंडेक्स गुरुवारी अस्थिर व्यापार सत्रात किंचित वाढीसह बंद झाले. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप इंडेक्स 0.7 टक्क्यांनी वाढले. व्यवहाराच्या शेवटी, सेन्सेक्स 63.47 अंकांनी अर्थात 0.09 टक्क्यांनी वाढून 71,721.18 वर बंद झाला.

राहुल शेळके

Share Market Investment Tips: भारतीय बेंचमार्क इंडेक्स गुरुवारी अस्थिर व्यापार सत्रात किंचित वाढीसह बंद झाले. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप इंडेक्स 0.7 टक्क्यांनी वाढले. व्यवहाराच्या शेवटी, सेन्सेक्स 63.47 अंकांनी अर्थात 0.09 टक्क्यांनी वाढून 71,721.18 वर बंद झाला. तर निफ्टी 28.50 अंक म्हणजेच 0.13 टक्क्यांच्या वाढीसह 21,647.20 वर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

निफ्टीला 21700-21750 च्या रेंजमध्ये विक्रीचा दबाव होता, तरीही तो मजबूत राहिला आणि त्याच्या 10-डे मुव्हिंग एव्हरेजच्या वर राहिल्याचे एलकेपी सिक्युरिटीजचे कुणाल शाह म्हणाले. निफ्टीचा सपोर्ट आता 21600 वर गेला आहे.

तर टेक्निकल चार्टवर निफ्टीचा रझिस्टंस 21730 वर दिसत आहे. त्याच वेळी, 21500 वर यासाठी एक मोठा पोझिशनल सपोर्ट दिसत आहे.

बँक निफ्टीमध्येही तेजी आणि मंदी यांच्यात संघर्ष पाहायला मिळाला, ज्यामुळे गुरुवारच्या ट्रेडिंग सत्रात त्यात बरीच अस्थिरता दिसून आली. या इंडेक्ससाठी 48000 वर एक मोठा रझिस्टंस दिसत आहे.

या लेव्हलवर मोठ्या प्रमाणात कॉल रायटिंग झाले. बँक निफ्टीने हा रझिस्टंस पार करून ताकद दाखवली, तर त्यात शॉर्ट कव्हरिंग रॅली सुरू होण्याची आशा आहे. त्याच वेळी, खाली बँक निफ्टीला 46900 वर सपोर्ट कायम आहे. जर हा सपोर्ट कोणत्याही करेक्शन दरम्यान तुटला तर बाजारात विक्रीचा दबाव वाढू शकतो.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

  • हिरो मोटो कॉर्प (HEROMOTOCO)

  • बजाज ऑटो (BAJAJ-AUTO)

  • रिलायन्स (RELIANCE)

  • बीपीसीएल (BPCL)

  • ऍक्सिस बँक (AXISBANK)

  • व्होल्टास (VOLTAS)

  • हिंदुस्थान पेट्रोलियम (HINDPETRO)

  • आयडीएफसी फर्स्ट बँक (IDFCFIRSTB)

  • ऍबॉट इंडिया (ABBOTINDIA)

  • एचडीएफसी ऍसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड (HDFCAMC)

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayakwadi Dam: ‘जायकवाडी’ धरणातून आज सकाळी ९,४३२ क्युसेक विसर्ग; गोदावरी खोऱ्यातील गावांना सतर्कतेचा इशारा

Nagpur Crime : महिलेला करायला लावली नग्न पूजा, व्हिडिओ बनवला अन्...नागपुरात भोंदूबाबाचा प्रताप उघड, 'असं' शोधायचा सावज

Neeraj Chopra: ऑलिंपिक पदकविजेता नीरज चोप्राची ब्रुसेल्स स्पर्धेतून माघार, पण अंतिम फेरीत दाखवणार आपला दम

Mahabaleshwar Rain Update; 'महाबळेश्वर तालुक्यात मुसळधार पाऊस'; भिलारमधील शाळेचा स्लॅब कोसळला, ग्रामस्थांची धावपळ

ICC T20 Rankings: टी-२० आयसीसी क्रमवारीत भारतीयांचेच वर्चस्व; आयसीसी क्रमवारी, अभिषेक, जसप्रीत, हार्दिक पहिल्या स्थानावर

SCROLL FOR NEXT