Share Market Today Sakal
Share Market

Share Market Today: जागतिक तणावात आज कोणते शेअर्स असतील तेजीत? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

Share Market Investment Tips: शुक्रवारी भारतीय बेंचमार्क इंडेक्स निफ्टी सर्व क्षेत्रातील विक्रीमुळे 22,500च्या आसपास घसरणीसह बंद झाला. व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स 793.25 अंकांनी अर्थात 1.06 टक्क्यांनी घसरून 74,244.90 वर बंद झाला.

राहुल शेळके

Share Market Investment Tips (Marathi News): शुक्रवारी भारतीय बेंचमार्क इंडेक्स निफ्टी सर्व क्षेत्रातील विक्रीमुळे 22,500च्या आसपास घसरणीसह बंद झाला. व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स 793.25 अंकांनी अर्थात 1.06 टक्क्यांनी घसरून 74,244.90 वर आणि निफ्टी 234.40 अंकांनी म्हणजेच 1.03 टक्क्यांनी घसरून 22,519.40 वर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

बँक निफ्टी इंडेक्समध्ये अधिक विक्रीचा दबाव होता असे एलकेपी सिक्युरिटीजचे कुणाल शाह म्हणाले. हे दीर्घ कालावधीनंतर मंदीचे संकेत देते. बँक निफ्टीला सध्या 49,000 च्या पातळीवर जोरदार रझिस्टंसचा सामना करावा लागत आहे. ही पातळी ओलांडल्यानंतर इंडेक्स बंद झाल्यास त्याची 50,000 अंकांच्या दिशेने वाटचाल पुन्हा सुरू होऊ शकते. बँक निफ्टीला 48,000 च्या पातळीवर सपोर्ट दिसत आहे. हा सपोर्ट तुटल्यास विक्रीचा दबाव वाढेल.

मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाचा परिणाम जगभरातील बाजारपेठांवर होत आहे. इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाबाबत जागतिक बाजारपेठा सावध आहेत. अमेरिकन बाजारात मोठी घसरण दिसून आली. गिफ्ट निफ्टी सुमारे 150 अंकांच्या घसरणीसह 22500च्या खाली घसरला आहे. त्याचा परिणाम आज देशांतर्गत शेअर बाजारावरही दिसून येईल.

बाजार दिवसेंदिवस विक्रमी उच्चांक बनवत आहे. अशा परिस्थितीत, इथून बाजार वाढण्यासाठी मर्यादित ट्रिगर दिसतात. पीजीआयएम इंडिया म्युच्युअल फंडाचे सीआयओ विनय पहाडिया यांचा विश्वास आहे की बाजाराचे पुढील लक्ष पूर्णपणे कॅश फ्लो आणि कंपन्यांच्या अर्निंगवर असेल. या निकषांची पूर्तता करणाऱ्या कंपन्यांच्या निवडक गटाला सकारात्मक मॅक्रो इकोनॉमिक आणि डेमोग्रॉफिक परिस्थितीचा लाभ मिळत राहील.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

  • सनफार्मा (SUNPHARMA)

  • मारुती (MARUTI)

  • पॉवरग्रीड (POWERGRID)

  • टायटन (TITAN)

  • ओएनजीसी (ONGC)

  • पेज इंडिया (PAGEIND)

  • भारतीय कंटेनर निगम (CONCOR)

  • व्होल्टास (VOLTAS)

  • हिंदुस्थान पेट्रोलियम (HINDPETRO)

  • फेडरल बँक (FEDERALBNK)

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today : सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगात; IT शेअर्सवर दबाव; मात्र ICICI आणि हिंदुस्तान झिंक चर्चेत

आता शेणातून होणार हजारो रुपयांची कमाई! योगी सरकारचा 'मास्टर प्लॅन' वाचून तुम्हीही थक्क व्हाल

Nagpur News: बॅगमध्ये आढळले नवजात बाळ; लाखनी तालुक्यात उडाली खळबळ, बाळ जिवंत असून उपचार सुरु!

MPSC Exam : कोणतीही शिकवणी (क्लास) न लावता जिद्द चिकाटीच्या जोरावर तुषार ठेंबे झाला वनपरिक्षेत्र अधिकारी

Latest Marathi News Live Update : संक्रांतीनिमित्त हॉट एअर बलून द्वारे मतदानाचा संदेश

SCROLL FOR NEXT