Share Market Investment Tips Sakal
Share Market

Share Market Today: शेअर बाजारातील घसरणीच्या काळात 'या' 10 शेअर्सवर ठेवा लक्ष

Share Market Investment Tips: देशांतर्गत बाजारात सलग दुसऱ्या दिवशी विक्रीचा दबाव दिसून आला. देशांतर्गत इक्विटी बेंचमार्क इंडेक्स सेन्सेक्स आणि निफ्टी अर्ध्या टक्क्यांहून अधिक घसरणीसह बंद झाले. बुधवारी सेन्सेक्स 535.88 अंकांनी अर्थात 0.75 टक्क्यांनी घसरून 71356.60 वर बंद झाला

राहुल शेळके

Share Market Investment Tips: देशांतर्गत बाजारात सलग दुसऱ्या दिवशी विक्रीचा दबाव दिसून आला. देशांतर्गत इक्विटी बेंचमार्क इंडेक्स सेन्सेक्स आणि निफ्टी अर्ध्या टक्क्यांहून अधिक घसरणीसह बंद झाले. बुधवारी सेन्सेक्स 535.88 अंकांनी अर्थात 0.75 टक्क्यांनी घसरून 71356.60 वर बंद झाला आणि निफ्टी 0.69 टक्क्यांनी घसरून 21517.35 वर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

निफ्टी 21650 च्या सपोर्ट लेव्हलच्या खाली आला आहे आणि तो 21500 च्या दिशेने घसरल्याचे एलकेपी सिक्युरिटीजचे रूपक डे म्हणाले. अशा स्थितीत, येत्या ट्रेडिंग दिवसांत तो 21500 च्या खाली आला तर नेगिटिव्ह सेंटिमेंट वाढेल. जोपर्यंत ते 21650 च्या खाली राहिल, तोपर्यंत सेल-ऑन-राइजची रणनीती स्वीकारा असा सल्ला त्यांनी दिला.

बँकिंग आणि आयटी या दोन महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये कमजोरी असूनही, बाजारातील करेक्शन हेल्थी असल्याचे रेलिगेयर ब्रोकिंगचे अजित मिश्रा म्हणाले.

अशा परिस्थितीत, जोपर्यंत निफ्टी 21200 च्या पातळीवर राहील, तोपर्यंत व्यापाऱ्यांनी घसरणीवर खरेदी करण्याचे धोरण अवलंबले पाहिजे.

जर आपण फार्मा आणि एफएमसीजीसारखे डिफेन्सिव सेक्टर्स आकर्षक दिसत आहेत. ट्रेडर्सने सध्या आक्रमक लॉन्ग पोझिशन घेणे टाळावे असा सल्लाही त्यांनी दिला.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

  • हिन्दाल्को (HINDALCO)

  • जेएसडब्ल्यू स्टील (JSWSTEEL)

  • टाटा स्टील (TATASTEEL)

  • एल टी माइंडट्री लिमिटेड (LTIM)

  • टेक महिन्द्रा (TECHM)

  • एम फॅसिस (MPHASIS)

  • ऍस्ट्रल (ASTRAL)

  • कोफोर्ज (COFORGE)

  • पेज इंडिया (PAGEIND)

  • बालक्रिष्ण इंडस्ट्रीज (BALKRISIND)

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईच्या गजबजाटात हरवलेल्या दोन मुलींना शोधण्याची आईची धडपड, पोलिसांची रात्रंदिवस मेहनत

Mahashtra Farmers : अतिवृष्टीमुळे राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, उत्पादनात घट

Pune : आंदोलन करण्यावरून राष्ट्रवादीच्या दोन गटात बाचाबाची; शरद पवारांच्या आमदाराला धक्काबुक्की

Uddhav Thackeray : सत्ताधाऱ्यांना माध्यमांनी प्रश्‍न विचारावेत, उद्धव ठाकरे यांची अपेक्षा; भाजपला सोडले की हिंदुत्व जाते का?

आजचे राशिभविष्य - 5 ऑक्टोबर 2025

SCROLL FOR NEXT